आशीष ठाकूर

शुक्रवारचा बंद भाव : सेन्सेक्स: ६२,१८१.६७ / निफ्टी: १८,४९६.६०

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

निफ्टी निर्देशांकावर १८,९०० वरून अपेक्षित असलेली १८,४०० पर्यंतची हलकीफुलकी घसरण सरलेल्या सप्ताहात येऊन गेली. आजच्या घडीला जे गुतंवणूकदार २,००० अंशांच्या तेजीला हरवून बसले त्यांना डोळ्यासमोर ठेवून निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन पथाच्या आलेखनाचा प्रयत्न करूया. यासाठी या स्तंभात वाचकांसाठी पूर्वी विकसित केलेल्या तेजी-मंदीच्या सूत्रांचा / प्रमेयांचा आधार घेऊ.

प्रमेय १: निफ्टी निर्देशांकात नीचांकापासून २,००० अंशांची वाढ होते.
प्रमेय २: निफ्टी निर्देशांकात उच्चांकापासून १,००० अंशांची घसरण होते.
प्रमेय ३: निफ्टी निर्देशांकाचा ३०० अंशांचा परीघ.

मार्च २०२० ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीतील ७,५०० वरून १८,६०० पर्यंतच्या वाटचालीत, निफ्टी निर्देशांकाच्या भविष्यकालीन वाटचालीच्या आलेखनासाठी वरील प्रमेये विकसित केलेली होती. अशा या जुन्या प्रमेयांची वैधता आताच्या घडीला आपण तपासून बघूया. ती जर आजही काळाच्या कसोटीवर उतरत असतील तर त्यांचा स्वीकार करूया.

प्रमेय १: निफ्टी निर्देशांकात नीचांकापासून २,००० अंशांची वाढ होते. यासाठी याच महिन्यात घडलेल्या ऐतिहासिक उच्चांकाचे उदाहरण घेऊया. ३० सप्टेंबरला निफ्टी निर्देशांकाचा नीचांक १६,७४७ होता यात २,००० अंश मिळवले असता १ डिसेंबरला १८,८८७ चा उच्चांक नोंदवला गेला. या उच्चांकाअगोदर आपण १,००० अंशांची घसरणदेखील अनुभवली. निफ्टी निर्देशांकाने १३ सप्टेंबरला १८,०८८ चा उच्चांक नोंदवत ३० सप्टेंबरला १७,०९४ चा बंद भाव दिला (दिवसांतर्गत १६,७४२ चा नीचांक नोंदवत त्या दिवसाचा बंद भाव हा १७,०९४ होता).
तेव्हा आजही वाचकांसाठी दोन वर्षापूर्वी विकसित केलेली नीचांकापासून २,००० अंशांची वाढ, व उच्चांकावरून १,००० अंशांची घसरण ही दोन्ही सूत्रे/प्रमेये आजही काळाच्या कसोटीवर उतरत आहेत. आता याच सूत्राचा / प्रमेयाचा आधार घेत निफ्टी निर्देशांकाचा भविष्यकालीन आढावा घेऊया. आताच्या घडीला तेजीची कमान ही निफ्टी निर्देशांकाच्या १८,००० च्या स्तरावर आधारलेली आहे त्यात २,००० अंश मिळवले असता निफ्टी निर्देशांकाचा २०,००० चा ऐतिहासिक उच्चांकी स्तर दृष्टिपथात येतो. व तो मार्च ते मे २०२३ मध्ये साध्य होण्याची शक्यता आहे.
‘आता बडे बडे शहरों में छोटे छोटे हादसे होते है’ याप्रमाणे मध्यावधीतील घसरण किती याबद्दल दोन मतप्रवाह आहेत.

१) निफ्टी निर्देशांक २०,००० ते २०,५०० वरून २,००० अंशांची घसरण. या गृहीतकाला पुन्हा १८,००० चा भरभक्कम आधार आहे. तो आधार घेत निफ्टी निर्देशांक पुन्हा २२,००० चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवेल हा एक मतप्रवाह.
२) दुसरा मतप्रवाह निफ्टी निर्देशांकांत २०,००० च्या पातळीवरून अक्षरशः रक्तपात घडून येईल. त्यातून निफ्टी निर्देशांकावर १५,००० पर्यंत घसरगुंडी संभवते. येथे निफ्टी निर्देशांक २२,००० च्या पातळीवरूनदेखील १५,००० पर्यंत घसरणार आहे. (जागतिक अर्थव्यवस्थेला आलेली सूज आम्ही गांभीर्याने घेतली नाही आणि त्या संचित कर्माचे फळ त्या वेळेला उभं ठाकणार आहे.)

आता आपल्याला हवीहवीशी गोष्ट म्हणजे ‘सेन्सेक्स’ एक लाखाचा टप्पा कधी गाठणार? यासाठी आपण लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो या गृहीतकाचाच आधार घेत, त्यात सेन्सेक्स आणि निफ्टीच्या ३-३.५ ते १ या अंदाजे गुणोत्तराची जोड देऊ. जसे की सेन्सेक्स ३०० ते ३५० अंश वाढला की निफ्टी निर्देशांकात १०० अंशांची वृद्धी होते. आता एक लाख भागिले ३ अथवा ३.५ हे निफ्टी निर्देशांकाचे २८ ते ३३ हजारांचे वरचे लक्ष्य सुचविते. आता २०२४ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर निर्देशांक नीचांकापासून दुप्पट होतो हे मानायचे झाल्यास, नजीकच्या भविष्यात निफ्टी निर्देशांकाचा नीचांक हा १५,००० पर्यंत असू शकतो, हेच पुन्हा सूचित करते.

मागील आठवडाभराचे म्हणाल तर, गेल्या लेखात नमूद केलेली १८,८८७ वरून १८,४०० पर्यंतची हलकीफुलकी घसरण सद्य:स्थितीत चालू आहे. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकाने १८,००० चा स्तर राखल्यास निफ्टी निर्देशांक पुन्हा १८,६०० ते १८,९०० वर झेपावू शकेल.

(क्रमशः)

शिंपल्यातील मोती

एक वर्षाची प्रदीर्घ मंदी संपवल्याने ‘संगणक, माहिती तंत्रज्ञान’ क्षेत्रात आता सुधारणा अपेक्षित आहे. आपल्याला आठवत असेल की, १७ जूनला निफ्टी निर्देशांकाने १५,१८३ चा नीचांक मारलेला. तेव्हाच्या २७ जूनच्या ‘मन मनास उमगत नाही आधार कुठे शोधावा’ असे शीर्षक असलेल्या लेखात, त्या वेळेला ‘गॅन कालमापन पद्धती’चा आधार घेतला होता. त्याची सांगड त्या वेळेला साप्ताहिक आलेखावर आरएसआय (रिलेटिव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स) हा ३० एकांकावर पोहोचलेला जो मंदीचा अंत व तेजीची सुरुवात अशा दिशेचे निर्देशन करत होता. प्रत्यक्षात घडलेही तसेच १७ जून ते १३ सप्टेंबर अशा अवघ्या तीन महिन्यांत, निफ्टी निर्देशांकावर १५,१८३ ते १८,००० ची नितांतसुंदर तेजी अवतरली. हा इतिहास पाहता, याच इतिहासाची पुनरावृत्ती आता ‘संगणक, माहिती तंत्रज्ञान’ क्षेत्राबाबतीत घडत आहे (या क्षेत्राचा ‘आरएसआय ३०’ वर पोहोचलेला होता) व त्या दृष्टीने ‘संगणक, माहिती तंत्रज्ञान’ क्षेत्रातील सर्व आघाडीच्या, प्रमुख कंपन्या आपल्या पंखाखाली असलेल्या निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडचा ‘निफ्टी आयटी बीझ’ (एनएसई कोड ISIN INF204KB15V2) ‘शिंपल्यातील मोती’ रूपाने गुंतवणुकीसाठी सूचित केला. हा एनएसईवरच नोंदलेला म्युच्युअल फंड, समभागाच्या खरेदी-विक्रीसारखा गुंतवणूकयोग्य तरल साधन आहे. या म्युच्युअल फंडाच्या एका युनिटचीदेखील खरेदी-विक्री करता येते आणि ते युनिट आपल्या डीमॅट खात्यात जतन केले जातात.

(क्रमशः)

महत्त्वाची सूचना : वरील समभागात लेखकाची स्वतःची, अथवा जवळच्या नातेवाईकांची गुंतवणूक नाही. वरील समभागाचा तटस्थ दृष्टीने परीक्षण करून ते वाचकांसाठी सादर केलेले आहे.

आशीष ठाकूर

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती:- शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’आणि ‘इच्छित लक्ष्य’ (टार्गेट प्राइस) या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader