Share Market Update : कमकुवत जागतिक संकेतांमुळे गुरुवारी ३ ऑगस्ट रोजी भारतीय शेअर बाजार सलग तिसऱ्या दिवशी लाल चिन्हात बंद झाला आहे. विशेष म्हणजे सेन्सेक्स ५४२ अंकांनी तुटला, तर निफ्टी १९,४०० च्या खाली घसरला. मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये काही प्रमाणात खरेदी झाली, ज्यामुळे बाजाराला थोडासा आधार मिळाला. फार्मा आणि युटिलिटी क्षेत्र वगळता इतर सर्व शेअर निर्देशांक लाल रंगात बंद झाले. रियल्टी, बँकिंग आणि मेटल समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे १.०१ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.

व्यवहाराच्या शेवटी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वरील ३० शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स ५४२.१० अंकांनी म्हणजेच ०.८२ टक्क्यांनी घसरून ६५,२४०.६८ वर बंद झाला. दुसरीकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी १४४.९० अंकांनी म्हणजेच ०.७४ टक्क्यांनी घसरून १९,३८१.६५ वर बंद झाला.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
sensex drops 110 points nifty settles at 23532
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले

हेही वाचाः सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन वाढणार का? पंतप्रधान कार्यालयानं दिलं उत्तर…

गुंतवणूकदारांचे १.०१ लाख कोटी रुपये बुडाले

आज BSE वर सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ३ ऑगस्ट रोजी ३०२.३२ लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच बुधवार २ ऑगस्ट रोजी ३०३.३३ लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे BSE मध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य आज सुमारे १.०१ लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. तसेच दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे १.०१ लाख कोटी रुपयांची घट झाली आहे.

हेही वाचाः बापरे! देशातील ‘या’ राज्यात टोमॅटो थेट ३०० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता, पण कारण काय?

सेन्सेक्स टॉप गेनर्स

ही घसरण एवढी झपाट्याने झाली असून, सेन्सेक्समधील ३० पैकी फक्त ६ शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले. यामध्येही इन्फोसिस(Infosys)च्या शेअर्समध्ये सर्वाधिक ०.६० टक्के वाढ झाली. याशिवाय एनटीपीसी (NTPC), सन फार्मा (Sun Pharma), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank) आणि जेएसडब्ल्यू स्टील (JSW Steel) यांच्या समभागांनी आज वेग घेतला आणि ते सुमारे ०.०५ टक्के ते ०.४३ टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

सेन्सेक्सचे ५ सर्वाधिक घसरलेले समभाग

दुसरीकडे सेन्सेक्समधील उर्वरित २४ समभाग आज घसरणीसह बंद झाले. यामध्येही टायटन(Titan)च्या शेअर्समध्ये सर्वाधिक २.४० टक्के घसरण झाली. यानंतर बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, नेस्ले इंडिया आणि अल्ट्राटेक सिमेंट सर्वात जास्त घसरले आणि जवळपास १.७८ टक्के ते २.२९ टक्क्यांपर्यंत घसरले.