शेअर बाजारात भागधारक कसे निर्माण झाले? नाशिक जिल्ह्याला डोळ्यांसमोर ठेवून काही शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो शोध जशाचा तसा आणि त्यातून घ्यावयाचा बोधच येथे लिहिलेला आहे. या अंगाने महाराष्ट्रातल्या अगदी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घ्यायचे ठरविले तर थोड्या फार फरकाने मुख्य माहितीत फारसा बदल होणार नाही असे वाटते. महाराष्ट्रात कंपन्यांच्या ठेवींमध्ये पैसा घालणारे ठेवीदार मोठ्या प्रमाणात होते (आजही आहेतच!) शेअर्स आणि म्युच्युअल फंडाच्या योजनांच्या अगोदर अशा ठेवीदारांचे प्रमाण मोठे होते हे निश्चित. म्हणून महाराष्ट्रात ‘इक्विटी कल्चर’ म्हणजेच समभागांमध्ये गुंतवणुकीची संस्कृती ही कंपन्यांच्या ठेव योजनांमुळे सुरू झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे कशामुळे घडले आणि यामागचे कारणही समजून घेऊ.

सर्वसाधारण ठेवीदारांसाठी आणि कंपनीचे समभागधारक यांसाठी कंपनीच्या मुदत ठेवींवरील व्याजदर वेगवेगळे राखले जात होते. हे वैशिष्ट्य लक्षात घेता, कंपन्यांच्या ठेव योजनांचे विक्रेते त्यांच्याकडे दोन पाच शेअर्सचे सर्टिफिकेट आणि ट्रान्सफर फॉर्मदेखील त्याकाळात ठेवत असल्याचे दिसून येई. जास्त व्याज मिळण्यासाठी ठेवीदाराला प्रथम भागधारक करून घ्यायचे आणि मग त्यानंतर त्याच्या पैशाच्या ठेवी करून घ्यायच्या, असे ही मंडळी करत असत. शिवाय कधी कधी ठेवी स्वीकारण्याचे जे नियम होते, त्यात भागधारकांकडून किती रक्कम ठेव म्हणून घेता येईल याचेही नियम होते आणि सर्वसाधारण ठेवीदारांकडून किती ठेव घेता येईल याचेदेखील नियम होते. बऱ्याच वेळा भागधारकांसाठी असलेला हिस्सा पूर्ण करण्यासाठी या वैशिष्ट्याचा क्लृप्ती म्हणून वापर केला जात असे. अगदी याच धर्तीवर, साखर उत्पादन करणाऱ्या कंपन्या भागधारकांना एक किलो साखर फुकट देत असत. साखर मिळवण्यासाठी कंपनीचे समभाग गाठीशी ठेवून तिचे भागधारक बनणे लोकांना आकर्षक वाटत असे. दुसरा प्रकार असा होता की, कापड उत्पादन करणाऱ्या कंपन्यांद्वारे लाभांशाच्या धनादेशाबरोबर कापड खरेदीसाठी डिस्काउंट कूपनही भागधारकांना पाठवायच्या. शेअर बाजाराच्या बाहेर हे डिस्काउंट कूपन्ससुद्धा डिस्काउंटला विकत मिळत, बाटा कंपनी पादत्राणे खरेदीसाठी २० टक्क्यांच्या डिस्काउंट कूपन्स धनादेशाबरोबर पाठवायची. त्याचप्रमाणे बॅाम्बे डाईंग ही कंपनीदेखील १५ टक्क्यांचे डिस्काउंट देणारी कूपन्स भागधारकांना पाठवत असे.

Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
Petrol and Diesel Prices on 27 December
Petrol And Diesel Prices : महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! तुमच्या शहरांत एक लिटरसाठी किती रुपये मोजावे लागतील?
Mechanism to assess the effects of earthquakes in 30 dams in Maharashtra
राज्यातील ३० धरणांमध्ये भूकंपाचे परिणाम जोखण्यासाठी यंत्रणा
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य

हेही वाचा – माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलियोसाठी शेअर्स निवडताना : ‘बीटा’चे सांगणे

वेगवेगळ्या डाॅक्टरांकडे औषध कंपन्याचे वैद्यकीय प्रतिनिधी जात असत. एखाद्या औषध निर्माण कंपनीच्या शेअर्सची विक्री असली की ही मंडळी त्या कंपनीचे अर्जही डॅाक्टरांना पाठवत असत. हे अर्ज भरून शेअर्सची खरेदी डॉक्टर करतदेखील असत आणि अशा तऱ्हेने मिळविलेले शेअर्स सांभाळले जात असत. नाशिकमध्ये पूर्वी डॅाक्टर असलेले आणि नंतर नगराध्यक्ष झालेले डॉ. वसंत गुप्ते यांच्याकडे अशा प्रकारे अनेक औषध कंपन्यांचे शेअर्स गोळा झाले होते. नाशिकच्या एका डाॅक्टरांकडे जीई शिपिंगचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेअर्स गोळा झालेले होते की, या कंपनीच्या हक्कभाग विक्रीच्या (राइट्स इश्यू) समयी पोस्टमन हक्कभागांचे अर्ज पोत्यात भरून ते पोते त्यांच्याकडे घेऊन आला होता. उत्सुकतेपोटी माहिती मिळवण्याचा सहज प्रयत्न केला असता पुढे आलेले मासले खरोखरच आश्चर्य वाटावे असे आहेत.

कोपरगावला चांगदेव शुगर मिल्स नावाची कंपनी होती. ए. बी. भिवंडीवाला ॲण्ड कंपनी साखरेची मोठ्या प्रमाणात निर्यात करायची. कोपरगावची कंपनी आणि भिवंडीवाला यांचे घनिष्ठ संबंध होते. त्या कंपनीच्या वकिलांना त्यांच्या सेवेसाठी फी मिळण्याऐवजी जीई शिपिंगचे शेअर्स दिले जायचे आणि वकीलसुद्धा बिनदिक्कत त्याचा स्वीकारही करत असत. यातून त्या वकिलांच्या मुलांना वारसा हक्काने जीई शिपिंगचे शेअर्स मिळाले. भिवंडीवाला आणि जीई शिपिंगचे वसंतशेठ हे एकमेकांशी संबंधित होते आणि या सलगीतूनच हे घडून आले. मालेगावला विठ्ठल बाकरे म्हणून अडत काम करणारे गृहस्थ होते. त्यांना व्यवसायानिमित्त सुरतला जावे लागायचे. सुरतचे वारे त्यांना लागले आणि पुढे ते सुताची अडत करता करता शेअर्सचे गुंतवणूकदारही झाले. नाशिकचा भांडी बाजार प्रसिद्ध आहे. या ठिकाणी श्यामलदास हिराचंद अंबानी या नावाचे एक स्टीलच्या भांड्यांचे दुकान होते. तांब्या पितळेच्या भांडी बाजारात हे स्टीलच्या भांड्यांचे दुकान वेगळेच होते. धीरुभाईंचे भाऊ नटूभाई अंबानी यांच्या नातेवाईंकाचे हे दुकान असल्यामुळे, त्यांच्या कुटुंबातील प्रफुल्ल अंबानी हे रिलायन्सचे भागधारक होते. म्हणून त्यांनी वेळोवेळी आलेल्या परिवर्तनीय कर्जरोख्यांचे अर्ज इतर दुकानदारांना भरायला सांगितले आणि यामुळे भांडी बाजार ते भांडवलबाजार असा या दुकानदारांचा यथासांग प्रवास झाला. प्राथमिक भांडवल बाजारपेठेत येणाऱ्या नव्या-जुन्या कंपन्यांचे समभाग, परिवर्तनीय कर्जरोखे विक्रीकरता अर्ज करून ते मिळवणे सोपे झाले होते. पण पैशांची गरज भासली आणि विक्रीचा प्रसंग आला तर काय? मुंबईचा एकही दलाल मुंबईबाहेरच्या भागधारकांचे समभाग खरेदी-विक्रीसाठी तयार नसायचा. भागधारकांची स्वाक्षरी जुळली नाही म्हणून विक्री झालेले समभाग परत येणे (बॅड डिलिव्हरी) हा प्रकार दलालांसाठी खूप त्रासदायक ठरत असे. तरीही त्या काळातसुद्धा मुंबईच्या ए. बी. पंडित, नाबर ॲण्ड कंपनी, बी. जे. शहा, एल. के. पांडे, भगीरथ मर्चंट या सारख्या दलालांनी निवडक भागधारकांना आपले खातेदार करून घेतले होते. त्यांच्या मार्फत खरेदी-विक्रीचे व्यवहारही सुरू झाले होते.

हेही वाचा –  बडे शहरों में छोटे छोटे हादसे…

तंत्रज्ञानातील प्रगती, डिपॉझिटरी संकल्पनेचा उदय, अगदी अमेरिकेतसुद्धा यशस्वी होण्यासाठी जास्त कालावधी लागला होता. भारतात त्या तुलनेत लवकर यश मिळाले. उप-दलाल हा नवीन वर्ग जन्माला आला. बँकांनीदेखील खरेदी-विक्री सेवा देण्यास सुरुवात केली. आता तर हे एवढे सोपे झाले आहे की. फक्त भ्रमणध्वनीचा वापर करून व्यवहार व्यवस्थित पार पडतो. व्यवहार करणे सुलभ व सोयिस्कर झाल्याने शेअर बाजार घराघरात पोहोचला. करोनाचा संकट काळ बाजाराचा व्याप वाढण्यासाठी इष्टापत्ती ठरला. तंत्रज्ञानामुळे माहिती अमाप मिळते, परंतु माहिती म्हणजे ज्ञान नाही आणि ज्ञान म्हणजे शहाणपण नाही. जेवढ्या वेगाने नवे गुंतवणूकदार आले त्यापेक्षा जास्त वेगाने ते बाहेरदेखील पडले. समुद्र मंथन होताना विष नि अमृत बाहेर आले, मग बाजाराचे मंथन होतानासुद्धा अमृतासह विषही बाहेर पडणारच! – प्रमोद पुराणिक

Story img Loader