गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. असे असतानाही टायर उत्पादक कंपनीच्या शेअर्सने नवा विक्रम केला आहे. शेअर बाजारातील सर्वात महाग समभाग असलेल्या एमआरएफच्या शेअरने एका वर्षातील उच्चांक गाठला आहे. त्याच्या एका शेअरची किंमत दीड लाख रुपयांच्या पुढे गेली आहे. मात्र, आज म्हणजेच गुरुवारी व्यापार सत्रादरम्यान त्याच्या शेअरच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. कधी काळी MRF च्या एका शेअरची किंमत ११ रुपये होती, जी आता १,३४,८०८.७० रुपये झाली आहे. कंपनीचा शेअर कधी सर्वात कमी पातळीवर राहिला आणि त्याने सर्वोच्च शिखर गाठले हे जाणून घेऊ यात.

सर्वात महागडा शेअर

MRF हा दीर्घकाळापासून भारतातील सर्वात महागडा स्टॉक राहिला आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये पहिल्यांदाच एमआरएफच्या शेअरची किंमत १ लाख रुपयांपेक्षा जास्त झाली होती. अशा प्रकारे MRF हा पहिला भारतीय शेअर बनला, ज्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे. बुधवारच्या व्यवहारात एमआरएफच्या शेअर्समध्ये १० टक्क्यांपर्यंत वाढ नोंदवली गेली. या वेगाने एका शेअरची किंमत दीड लाखांच्या पुढे पोहोचली आहे.

Loans from State Bank, HDFC,
एचडीएफसी पाठोपाठ स्टेट बँकेकडून कर्ज महाग
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर
HDFC Bank loan rate hike installment of home loan car loan increase print eco news
एचडीएफसी बँकेच्या कर्जदरात वाढ; तुमच्या गृह कर्ज, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार काय?
Shiv Nadar is the most philanthropic industrialist in the country print eco news
शिव नाडर देशातील सर्वांत दानशूर उद्योगपती; आर्थिक वर्षात २,१५३ कोटी रुपयांचे दातृत्व
swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?

किंमत ५२ आठवड्यांच्या नवीन उच्चांकावर

नंतरच्या व्यवहारात MRF समभागांच्या किमतीत काही सुधारणा पाहायला मिळाली आहे. व्यवहार बंद झाल्यानंतर एमआरएफचे शेअर्स बुधवारी १.४६ टक्क्यांनी घसरून १,३४,६००.०५ रुपयांवर बंद झाले. तसेच गुरुवारी ते १,३६,३५४ वर उघडले आणि या काळात ते १,३६,५९९.८० वर पोहोचले. बुधवारी दिवसाच्या व्यवहारात एमआरएफचे शेअर्स एकदा १,५०,२५४.१६ रुपयांवर पोहोचले होते. एमआरएफ समभागांची ही ५२ आठवड्यांची नवीन उच्च पातळी आहे.

हेही वाचाः प्रवाशांच्या खाण्या-पिण्याकडे दुर्लक्ष केल्यास पडणार महागात, विमान कंपन्यांना सरकारकडून मिळाल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना

MRF चा भारतातील सर्वात महाग शेअर्स

अजूनही भारतात MRF व्यतिरिक्त कोणत्याही शेअरने लाख रुपयांची पातळी गाठलेली नाही. सध्या भारतातील दुसरा सर्वात महाग शेअर पेज इंडस्ट्रीजचा आहे, ज्याची किंमत ३७,७७० रुपये आहे. तिसऱ्या क्रमांकावर हनीवेल ऑटोमेशन इंडिया आहे, ज्याची किंमत प्रति शेअर ३७,२१९ रुपये आहे. त्यानंतर चौथ्या स्थानावर 3M इंडिया आहे, ज्याच्या शेअरची किंमत सध्या ३४,२६३ रुपये आहे. पाचव्या क्रमांकावर श्री सिमेंट आहे, त्यातील एक शेअर सध्या २६,५२७ रुपये आहे.

कधी काळी ‘या’ शेअरची किंमत ११ रुपये होती

शेअर बाजारात एमआरएफचा शेअर आधी खूप सामान्य होता. १९९३ च्या सुरुवातीला MRF च्या एका शेअरची किंमत फक्त ११ रुपये होती. जर एखाद्याने त्यावेळी MRF चे १०० शेअर्स देखील विकत घेतले असते, तर तो करोडपती झाला असता.