टीटीके प्रेस्टिज लिमिटेड (बीएसई कोड ५१७५०६)
प्रवर्तक: टीटीके समूह
बाजारभाव: रु. ८००/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : प्रेशर कुकर्स/ किचनवेअर
भरणा झालेले भागभांडवल: रु. १३.८६ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७०.४१
परदेशी गुंतवणूकदार ८.००
बँकस्/ म्यूचुअल फंडस्/ सरकार १३.४२
इतर/ जनता ८.१७
पुस्तकी मूल्य: रु. १४०
दर्शनी मूल्य: रु. १/-
गतवर्षीचा लाभांश: ६००%
प्रति समभाग उत्पन्न: रु. १६.१८
किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४८.९
डेट इक्विटी गुणोत्तर: ०.०७
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ६१.४
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: ३८.४
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड: १८.१
बीटा: ०.६
बाजार भांडवल: रु. १०,९६० कोटी (मिड कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ९८८/६५२
टीटीके प्रेस्टिज ही टीटीके समूहाची भारतातील सर्वात मोठी किचनवेअर कंपनी आहे. १९५५ मध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणून स्थापन झालेली टीटीके प्रेस्टिज स्वयंपाकघरातील उपकरणांच्या क्षेत्रात, विशेषत: प्रेशर कुकर विभागातील अग्रगण्य ब्रँड्सपैकी एक आहे. २०१२ मध्ये कंपनीने हाय-एंड कूकवेअर/स्टोअर वेअर/वॉटर फिल्टर्स/गॅस-टॉप्ससाठी जागतिक हाय-एंड ब्रँड्सशी युती केली होती. आज ‘प्रेस्टिज’ हा प्रेशर कुकर, कुकवेअर, व्हॅल्यू-ॲडेड गॅस स्टोव्ह, इंडक्शन कुकटॉप्स आणि राइस कुकरमध्ये आघाडीचा ब्रँड आहे. संपूर्ण इंडक्शन कुकिंग सोल्यूशन ऑफर करणारी टीटीके प्रेस्टिज भारतातील एकमेव कंपनी आहे. कंपनीने किचनवेरव्यतिरिक्त आता होम अप्लायन्सेस तसेच क्लीनिंग सोल्यूशन्समध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा… माझा पोर्टफोलियो : नवयुगातील अपरिहार्य ‘ऑटो-सक्षम’ गुंतवणूक
कंपनीचा उत्पादन पोर्टफोलियो वैविध्यपूर्ण आहे. गेल्या दहा वर्षांत कंपनीने हाय-एंड कूकवेअर/स्टोअर वेअर/वॉटर फिल्टर्स/गॅस-टॉप, मायक्रोवेव्ह कुकर प्रेशर कुकर, मिक्सर ग्राइंडर, नॉनस्टिक अप्लायन्सेस, वॉटर प्युरिफायरची श्रेणी तसेच ब्रिटनमधील उपकंपनी होरवूड होमेवेअर्सचा ‘जज’ ब्रॅंड प्रस्तुत केला. कंपनीच्या एकूण महसुलापैकी प्रेशर कुकरमधून ३२ टक्के, कूकवेअरमधून १७ टक्के, गॅस स्टोव्हमधून मिक्सर-ग्राइंडरमधून आणि स्वयंपाकघर, घरगुती उपकरणेमधून ४६.५८ टक्के तर उर्वरित ४.९८ टक्के इतर उपकरणे आणि साफसफाईच्या सोल्यूशन्समधून येते. कंपनीने २० कोटी रुपयांची गुंतवणूक करून मॉड्युलर किचन आणि किचन अप्लायन्सेसच्या व्यवसायात गुंतलेल्या अल्ट्राफ्रेश मॉड्युलर सोल्युशन्स लिमिटेडमध्ये ४१ टक्के भागभांडवल खरीदले आहे. टीटीके प्रेस्टिजचे भारतात होसूर, कोईम्बतूर, कर्जन, रुरकी आणि खर्डी येथे अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प असून ,दोन समर्पित संशोधन आणि विकास केंद्रे आहेत. कंपनी सातत्याने बदलत्या राहणीमानानुसार आपल्या उत्पादनात आवश्यक बदल आणि आधुनिकीकरण करत असते.
वितरण नेटवर्क
कंपनीची वितरण सेवा भारतभरात विस्तारली असून ती तिच्या २४ प्रादेशिक विक्री केंद्रांमधून होते. ६०,००० हून अधिक रिटेल स्टोअरखेरीज कंपनीची भारतभरात २८ राज्ये आणि ३७४ शहरांमध्ये ६५० हून अधिक प्रेस्टिज एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स आहेत.
गेल्या आर्थिक वर्षांत २,७७७ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २५४ कोटी रुपयांचा नफा कमावणाऱ्या टीटीके प्रेस्टिजचे सप्टेंबर २०२३ साठीच्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले आहेत. या दुसऱ्या तिमाहीत कंपनीने ७२९.४७ (-१३ टक्के) कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५९.२७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीच्या तुलनेत तो २९ टक्क्यांनी कमी आहे. हे निकाल फारसे उत्साहवर्धक नाहीत. मात्र भांडवली खर्चानंतरही कंपंनीकडे ८६० कोटींची अतिरिक्त रोकड आहे. आगामी सहा महिन्यांत कंपनी चांगली कामगिरी करून दाखवेल अशी अपेक्षा आहे. हा शेअर ७५० रुपयांपर्यंत खाली येऊ शकतो. एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून टीटीके प्रेस्टिजचा शेअर आकर्षक वाटतो.
सध्याची शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता सुचवलेले समभाग कमी बाजारभावात मिळू शकतात, त्यामुळे प्रत्येक मंदीत टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
stocksandwealth@gmail.com
प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
- लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.