आशीष ठाकूर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या महिन्यात १५ सप्टेंबरला निफ्टी निर्देशांकाने २०,२२२ चा ऐतिहासिक उच्चांक नोंदवलेला, त्या वेळच्या उत्साहाचे, आनंदाच्या वातावरणाला का कुणास ठाऊक मोडता घालून, तेजीने काढता पाय घेतला. आनंदाच्या, भारावलेल्या वातावरणातून, तेजीच लुप्त झाल्याने हसती, खेळती मैफल एकदम सुन्यासुन्या मैफिलीत बदलली. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव: सेन्सेक्स:- ६५,९९५.६३ निफ्टी:- १९,६५३.५०

या स्तंभातील, ‘चित्राचित्रातील फरक’ (अर्थ वृत्तान्त, ११ सप्टेंबर २०२३) या लेखात ‘तेजीची १,००० अंशांची वाटचाल’ या उप-शीर्षकांतर्गत आता चालू असलेल्या मंदीचे सूतोवाच केलेले… “आताच्या घडीला निफ्टी निर्देशांक सातत्याने १९,८०० चा स्तर राखत असल्याने, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे २०,००० ते २०,१०० असेल. या स्तरावरून एक घसरण अपेक्षित असून निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य अनुक्रमे १९,८००, १९,५००, १९,२५० असे असेल,” असे भाकीत त्यात मांडले होते. सरलेल्या सप्ताहातील बुधवारी निफ्टी निर्देशांकाने १९,२५० च्या समीप, १९,३३३ नीचांक नोंदवला आणि सुधारणा सुरू झाली.

आणखी वाचा-क.. कमॉडिटीचा : हळद परिषदेच्या निमित्ताने…

आता बाजारात जी सुधारणा चालू आहे तिचे वरचे लक्ष्य निफ्टी निर्देशांकावर १९,७५० ते १९,९५० असे असेल. या २०० अंशांच्या परिघाला (बॅण्डला) भविष्यात ‘अनन्यसाधारण महत्त्व’ असून यावर भविष्यकालीन तेजी-मंदीचे आडाखे अवलंबून आहेत. जसे की… निफ्टी निर्देशांकावर आता चालू झालेल्या सुधारणेत निफ्टी निर्देशांक सातत्याने १९,९५० च्या स्तरावर १५ दिवस टिकल्यास, निफ्टी निर्देशांकाचे वरचे लक्ष्य हे २०,२००… २०,५००… २०,८०० असे असेल. ही नाण्याची एक बाजू – तेजीची बाजू आपण समजून घेतली.

आता नाण्याची दुसरी बाजू म्हणजे, निफ्टी निर्देशांक १९,७५० ते १९,९५० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरल्यास, निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य १९,२५० ते १९,००० असे असेल. दुर्दैवाने तेजीची कमान ज्या १९,००० च्या निफ्टी निर्देशांकाच्या स्तरावर आधारलेली आहे त्या स्तराखाली निफ्टी निर्देशांक सातत्याने टिकल्यास निफ्टी निर्देशांकाचे खालचे लक्ष्य हे १८,८०० ते १८,६५० असे असेल.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित लक्ष्य या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up downs in share market know about last week nifty and sensex print eco news mrj