‘एन्रॉन’च्या भागात अजून एका पात्राचा प्रवेश होणे बाकी आहे आणि तो म्हणजे अँड्र्यू फॅस्टोव. फेब्रुवारी २००१ मध्ये केनेथ ले मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावरून निवृत्त झाला आणि स्किल्लिंग कार्यकारी अधिकारी झाला आणि त्याची रिक्त झालेली जागा अँड्र्यू फॅस्टोवने घेतली. वर्ष २००१ हे ते वर्ष होते जेव्हा ‘एन्रॉन’ कोलमडून पडले. याचे कारण फक्त एक नव्हते, तर बऱ्याच दिवसांपासून बाजाराची माहिती ठेवणाऱ्यांचे लक्ष त्यावर होते. इतर अनेक कारणे होती, ज्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला. उद्योग चालवण्याच्या ज्या अडचणी असतात त्या तर होत्याच, पण त्यात भर पडली ती दाभोळ प्रकल्पाची. जो २००१ पर्यंत अत्यंत तोट्यात आला होता आणि हे सगळे आता लपविणे अशक्य झाले होते. एप्रिल २००१ मध्ये एका बैठकीत स्किल्लिंगने ‘वॉल स्ट्रीट’च्या एका वार्ताहराला चक्क ‘गाढव’ म्हणून संबोधले. कारण तो कंपनीच्या ताळेबंदाबद्दल अनेक प्रश्न विचारत होता. स्किल्लिंगने कित्येक वर्षांत कुठल्याच प्रश्नाला असे उत्तर दिले नव्हते. अखेरीस ऑगस्ट २००१ मध्ये स्किल्लिंगने देखील राजीनामा दिला आणि शेअर बाजारात त्याचे नकारात्मक पडसाद उमटले. केनेथ लेने परत एकदा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची सूत्रे ताब्यात घेतली. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. स्किल्लिंगने राजीनाम्याआधी आपले सुमारे ४.५ लाख समभाग विकून ३.३ कोटी डॉलर आपल्या गाठीला बांधले होते. त्यातच ९\११ चा हल्ला झाला. त्यामुळे कंपनीला फायदा एवढाच झाला की, त्यांचे मरण थोडेसे पुढे ढकलले गेले आणि माध्यमांमधील (कु)प्रसिद्धीपासून दूर राहिली. १६ ऑक्टोबर २००१ ला कंपनीने मागील चार वर्षातील सुधारित ताळेबंद प्रकाशित केले. २२ ऑक्टोबरला फेस्टोवने संचालक मंडळाला सांगितले की, त्याने ३ कोटी डॉलर एलजेएम या फर्मकडून मिळवले. या कंपनीची आद्याक्षरे त्याच्या बायको आणि मुलांच्या नावावर होती आणि ही विशेष कार्यासाठी बनवलेली कंपनी होती, जी ‘एन्रॉन’चे नुकसानीचे सौदे लपवण्यासाठी बनवली होती. २५ ऑक्टोबरला फेस्टोवची देखील हकालपट्टी करण्यात आली.

हेही वाचा : विदेशी गुंतवणूकदार माघारी, मे महिन्यात २२,००० कोटी मूल्याच्या समभागांची विक्री

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Bigg Boss 18
अशनीर ग्रोव्हरच्या ‘त्या’ वक्तव्यावर भडकला सलमान खान; विचारले खरमरीत प्रश्न
young girl fight with ola auto viral video
“ये आदमी पागल है”, तरुणीने रिक्षाचालकाला केली शिवीगाळ अन्…, पुढे जे घडलं ते खतरनाक, पाहा VIDEO
russian spy whale mystery
बहुचर्चित बेलुगा व्हेलचे रहस्य उलगडले; हा मासा खरंच रशियन गुप्तहेर होता का?
USS Edsall, World War II
Dancing Mouse: ८१ वर्षांनंतर सापडले ‘डान्सिंग माऊस’ या दुसऱ्या महायुद्धातील युद्धनौकेचे अवशेष; इतिहास नेमकं काय सांगतो?
Anshula Kapoor talks about parents Boney Kapoor Mona Kapoor divorce
“माझे आई-वडील वेगळे झाल्यावर…”, पालकांच्या घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच बोलली जान्हवी कपूरची सावत्र बहीण
History Of Tipu Sultan
एका रात्रीत ८०० मंड्यम अय्यांगारांची हत्या; ‘नरक चतुर्दशी’ हा दिवस शोकदिवस का ठरला?

या सगळ्यात ‘एन्रॉन’च्या चुकीच्या लेखापरीक्षणाला मदत करणारी ऑर्थर अँड अँडरसन नावाची लेखापरीक्षण संस्था देखील तितकीच दोषी होती, असे तेव्हा मानले गेले. असे म्हणतात की, जेव्हा ऑक्टोबर २००१ मध्ये केनेथ लेने पत्रकार परिषद आयोजित केली, त्यावेळी काही अंतरावर ऑर्थरचे कर्मचारी महत्त्वाची संगणकीय माहिती आणि टनावारी महत्त्वाची कागदपत्रे नष्ट करत होते. त्यांच्यावर हा ठपका इतका मोठा होता की, त्यांचे कित्येक ग्राहक त्यांना सोडून गेले आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला तरी तोपर्यंत ऑर्थरचा पुरता निक्काल लागला होता.

कंपनीचे मानांकन रसातळाला गेले. तरीही केनेथ लेने कंपनीसाठी एक ग्राहक आणला होता. तो देखील पुढे व्यवहार करण्यास तयार नव्हता. अखेरीस डिसेंबर २००१ मध्ये अनर्थ झालाच आणि कंपनीने आपली दिवाळखोरी जाहीर केली.

हेही वाचा : सीमेन्समधून सीमेन्स एनर्जी लिमिटेड वेगळी होणार

अमेरिकेच्या कायद्यानुसार सगळ्यांवर खटले भरले गेले. केनेथ लेने दोष दिला तो ‘शॉर्ट सेलर’, काही कर्मचारी आणि माध्यमांना. तरीही ह्यूस्टनच्या जुरीने त्याला २००६ साली दोषी ठरवले. पण काही दिवसातच त्याचे निधन झाले. स्किल्लिंगलासुद्धा २४ वर्षांची शिक्षा झाली. मात्र वर्ष २०१९ मध्ये त्याला सोडण्यात आले. सुटल्यानंतर त्याने काही उद्योगधंदे पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न केले. पण अमेरिकेच्या बाजार नियंत्रकाने त्यावर बंधने आणली. स्किल्लिंग सध्या काय करतो याची माहिती मिळत नाही. फेस्टोवला ६ वर्षांची शिक्षा झाली आणि वर्ष २०१२ मध्ये त्याची सुटका झाली. सध्या तो व्याख्याने देत असल्याची माहिती आहे. ‘एन्रॉन’ नावाचे महाकाय जहाज तिच्या २०,००० कर्मचाऱ्यांना आणि हजारो गुंतवणूकदारांना घेऊन बुडाले. सत्यमप्रमाणेच या घोटाळ्यानंतर अमेरिकी सरकारने त्यांच्या कायद्यांमध्ये बऱ्याच सुधारणा केल्या. असो, साठा उत्तराची कहाणी पाचा (दोना) उत्तरी सुफळ संपूर्ण !
डॉ. आशीष थत्ते @AshishThatte

ashishpthatte@gmail.com

लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाऊंटंट म्हणून कार्यरत आहेत.