मुंबईः जागतिक पातळीवर शेअर बाजारातील एकंदर कमकुवत वातावरणाचा शुक्रवारी (१७ जानेवारी) मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टीतील घसरणीतही प्रतिबिंब उमटले. तीन दिवस सलग तेजी सुरू राहिल्याने, नफावसुलीलाही गुंतवणूकदारांनी प्राधान्य दिल्याने ही घसरण दिवसभर विस्तारत गेली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ४२३.४९ अंशांच्या घसरणीने ७६,६१९.८३ वर दिवसअखेर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०८.६० अंशांनी घसरून २३,२०३ पातळीवर बंद झाला. दोन्ही निर्देशांकांत साधारण अर्धा टक्क्यांचे नुकसान सप्ताहाअखेरच्या व्यवहारात सोसले. शुक्रवारच्या संपूर्ण सत्रावर पुन्हा एकदा अस्थिरतेची छाया दिसून आली.
हेही वाचा >>>मार्केट वेध : शेअर बाजाराची सलग तिसऱ्या दिवशी आगेूकूच; अदानींच्या शेअर्समध्ये उत्साही भरते कशाने?
घसरण कशामुळे?
मुख्यतः आयटी आणि बँकांच्या शेअर्समधील विक्रीचा मारा शेअर बाजाराच्या घसरणीचे कारण ठरले. Bank Nifty निर्देशांकात तब्बल ७३८ अंश अर्थात २ टक्क्यांची आपटी, तर Fin Nifty निर्देशांकातील दीड टक्क्यांहून मोठी घसरगुंडी या दोन्ही क्षेत्रातील शेअर्समधील वाढलेल्या विक्रीला दर्शवितात.
डिसेंबरच्या सुरुवातीला बँक निफ्टी निर्देशांकाने ५३,८०० अंशांचा उच्चांक गाठला होता. त्या पातळीपासून त्याचा शुक्रवारचा ४८,५४० हा बंद स्तर तब्बल ११ टक्क्यांची आपटी दर्शविणारा आहे. अॅक्सिस बँकेने डिसेंबरअखेर तिमाहीमध्ये नफ्यात ४ टक्के वाढ करून, तो ६,३०४ कोटी रुपयांवर गेल्याची कामगिरी गुरुवारी नोंदविली. खासगी क्षेत्रातील प्रमुख बँकेची ही कामगिरी बाजाराच्या पसंतीस उतरली नाही. शेअरचा भाव सकाळच्या सत्रात जवळपास साडेपाच टक्क्यांनी गडगडला. दिवसअखेर बीएसईवर तो ४.७१ टक्के घसरणीसह ९९१.२५ रुपयावर स्थिरावला. खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या एचडीएफसी बँकेतही जवळपास १ टक्क्यांची घसरण झाली आणि सर्व बँकांचे समभाग विक्रीमुळे नरमलेले दिसून आले.
हेही वाचा >>>मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
बरोबरीने इन्फोसिसची ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीतील, ११.५ टक्क्यांच्या वाढीसह ६,८०६ कोटी रुपयांचा निव्वळ नफ्याची कामगिरी, त्याच्या शेअरसाठी उपकारक ठरू शकली नाही. हा शेअर शुक्रवारच्या सत्रात ५.८ टक्क्यांनी आपटला. दिवसअखेर तो १,८१५ रुपयांवर स्थिरावला. बाजारातील सर्वच आयटी समभागांमध्ये निराशेच्या वातावरणास ही घसरण कारणीभूत ठरली.
सकारात्मक बाजू काय?
अमेरिकेतील वॉल स्ट्रीटवर रात्री दिसून आलेल्या नरमाईने, पहाटे खुल्या झालेल्या आशियाई शेअर बाजारांनी तोटा नोंदवला. देशांतर्गत गुंतवणूकदारांसाठी सुवार्ता म्हणजे अमेरिकी रोख्यांवरील परताव्याचा दरही घटल्याने, जूनमध्ये तेथील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात करेल अशा शक्यतेनेही पुन्हा डोके वर काढले आहे. यातून भारतीय बाजाराबद्दल परकीय गुंतवणूकदारांचे आकर्षण कायम राहून, त्यांच्या खरेदीचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अॅण्ड टुब्रो, बीपीसीएल, इंडियन ऑइल या काही बड्या कंपन्यांचे शेअर त्यामुळे वधारलेले दिसून आले.
रिलायन्स इंडस्ट्रीजः अपेक्षेपेक्षा सरस अशी निव्वळ नफ्यात ७.४ टक्के वाढीची कामगिरी आणि विशेष म्हणजे किराणा व्यवसायातील महसुली कामगिरीत दिसलेली उभारी तसेच दूरसंचार व डिजिटल व्यवसायाची उन्नत वाटचाल, या घटकांमुळे शुक्रवारी कंपनीच्या शेअरने सुमारे तीन टक्क्यांची झेप घेतली. अलिकडच्या दिवसांत रिलायन्समध्ये अशा प्रकारची तेजी अपवादानेच दिसून आली आहे. दिवसअखेर २.८३ टक्के वाढीसह शेअरचा भाव १,३०२.३५ रुपयांवर स्थिरावला. सकाळच्या सत्रात त्याने १,३२६ रुपयांपुढे मजल मारली होती.
स्टर्लिंग अँड विल्सन रिन्युएबल्स एनर्जीः गेल्या वर्षी डिसेंबर तिमाहीत ६२.३९ कोटी रुपयांचा तोटा, यंदा डिसेंबरअखेर तिमाहीत १७.१४ कोटी रुपये नफ्यात बदलण्याची कंपनीची कामगिरी बाजारासाठी उत्साहवर्धक ठरली नाही आणि सकाळच्या सत्रात शेअरची ७.५ टक्क्यांहून अधिक घसरगुंडी दिसून आली.
पुढे काय?
नजीकच्या काळात शेअर बाजारात अस्थिरता राहू शकते. परकीय गुंतवणूकदारांची विक्री तर, १० दिवसांवर असलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदींवर सावध नजर ठेऊन देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या खरेदीलाही ओहोटी लागली आहे. वरच्या बाजूस, २३,३५० ते २३,४००, हा एक महत्त्वाचा अडथळ्याचा टप्पा आहे आणि २३,४०० च्या वर निर्णायक मुसंडीतूच निफ्टीला उच्च पातळी गाठता येईल. दरम्यान, २३,१५० / २३,००० वर निफ्टीला ठोस आधार दिसत आहे. अर्थात सामान्यपणे या पातळीखाली घसरणीची शक्यता अत्यल्प आहे, असे एलकेपी सिक्युरिटीजचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक रूपक डे म्हणाले.
निफ्टीने २३,४०० चा अडथळा निर्णायकपणे पार केल्यास, २३,६००, २३,८०० अशा वरच्या स्तराकडे तिची आगेकूच शक्य असल्याचे चॉइस ब्रोकिंगचे संशोधन विश्लेषक मंदार भोजने यांनीही म्हटले आहे.