मुंबई : शेअर बाजारांनी वाढीव सहा दिवसांच्या विस्तारलेल्या आठवड्याची सुरुवातही सोमवारी (२७ जानेवारी) गेली काही दिवस सुरू असलेल्या घसरणीला विस्तारून केली. तोटा वाढत जात, सेन्सेक्स ८२४ अंशानी आपटला, तर निफ्टी निर्देशांक दुपारपर्यंत पहिल्यांदाच २२,८५० च्या महत्त्वपूर्ण पातळीखाली घसरला. निर्देशांकांनी सात महिन्यांपूर्वी म्हणजे ७ जून २०२४ च्या नीचांक पातळीवर त्याने फेर धरला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गुंतवणूकदारांना तब्बल ८ लाख कोटी रुपयांपर्यंत झळ पोहोचविणाऱ्या या पडझडीने भारलेल्या दिवसाची अखेर, बीएसई सेन्सेक्सने ८२४.२९ अंशांच्या नुकसानीसह ७५,३६६.१७ वर केली. तर एनएसई निफ्टी २६३.०५ अंशांच्या तोट्यासह २२,८२९.१५ वर दिवसअखेरीस स्थिरावला. दोन्ही निर्देशांक अनुक्रमे १.०८% आणि १.१४% असे घरंगळले.
ताज्या तिमाही निकाल हंगामांचा सार पाहता, कंपन्यांच्या महसुली आणि नफ्याच्या कामगिरीत दीर्घकाळ मंदी राहण्याची भीती गुंतवणूकदारांमध्ये आहे. बरोबरीने चीनवरील आर्थिक मंदीला खुणावत असल्याची सोमवारी आकडेवारी आली. एकीकडे तेथील कारखानदारी क्षेत्रातील सक्रियता मापणाऱ्या पीएमआय निर्देशांकातील घसरणीने आशियाई बाजारांना घसरणीचा धक्का दिला. हे व तत्सम प्रतिकूल जागतिक संकेत, अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाच्या व्यापार धोरणासंबंधीची अनिश्चितता आणि परकीय गुंतवणूकदारांकडून निरंतर सुरू असलेला विक्रीचा मारा यामुळे बाजारातील नकारात्मक भावनेत भर पडली.
बजेट तेजीची आस स्वप्नवतच!
चालू आठवड्यात दोन प्रमुख घटनांची शेअर बाजारातील व्यवहारांवर छाया राहिल. एक म्हणजे, भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प (१ फेब्रुवारी) आणि दुसरी, अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचा व्याजदरासंबंधी निर्णय (२९ जानेवारी) बाजाराची दिशा निश्चित करतील. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडला जाणार असल्याने शनिवारीही शेअर बाजारात नित्य वेळेत व्यवहार सुरू राहतील.
अर्थसंकल्पाबाबत आशा-अपेक्षांचे तोरणे बांधली जात असली, तरी त्याचे शेअर बाजारात तूर्त तरी कोणतेही प्रतिबिंब उमटताना दिसलेले नाही. अर्थसंकल्पातून प्राप्तिकर कपातीद्वारे आर्थिक प्रोत्साहनाची अपेक्षा शेअर बाजार करत आहे. जर या अपेक्षा पूर्ण झाल्या तर बाजारात दिलासादायक तेजी येऊ शकते. परंतु जर ती तेजी टिकवायची असेल तर आपल्या कंपन्यांच्या नफा आणि उत्पन्नाच्या कामगिरीत दृश्य स्वरूपात उभारी दिसणे आवश्यक आहे, असे जिओजित फायनान्शिय सर्व्हिसेस मुख्य गुंतवणूक-धोरणकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले.
घसरणीचा फटका कुणाला?
गेल्या काही दिवसांप्रमाणे विक्रीचा जोर आणि सर्वाधिक नुकसान हे व्यापक बाजारावर अधिक प्रमाणांत दिसून आले. परिणामी बीएसई मिडकॅप निर्देशांक जवळजवळ २.६८ टक्क्यांनी आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक ३.५१ टक्क्यांपर्यंत घसरला. निफ्टी एनर्जी, आयटी, मेटल, मीडिया आणि फार्मा या सर्व १३ प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये प्रत्येकी २ ते ३ टक्क्यांची घसरण झाली.
सोमवारी निकाल जाहीर करणाऱ्या कंपन्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नसल्याने, आयडीएफसी फर्स्ट बँक घसरण ८.९०%, एनटीपीसी ग्रीन एनर्जी ४%, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ३% घसरणीसह बंद झाले, त्या उलट शनिवारी अपेक्षेप्रमाणे तिमाही निकाल आलेल्या आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समध्ये १.५५% वाढ दिसून आली. मागील दिवसांतील घसरणीच्या प्रवाहाविरूद्ध वाढ दर्शविणारे आयटी क्षेत्रातील इन्फोसिस, टेक महिंद्र, विप्रो, एचसीएल टेक हेही २ ते ३ टक्क्यांनी आपटले.
मुंबई शेअर बाजारात ५६० शेअर्स वधारले, तर घसरण झालेल्या शेअर्सची संख्या ३,३८३ इतकी मोठी होती. या महिन्यात आतापर्यंत देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DIIs) जवळपास ६७,००० कोटी रुपये शेअर्समध्ये खरेदीसह गुंतवणूक केली असली तरी, परकीय गुंतवणूकदारांनी (FPIs) याच काळात एकंदर ६९,००० कोटी रुपयांपर्यंतच्या अविरत विक्रीमुळे बाजारावर घसरणीचा ताण निर्माण केला आहे. अनिश्चित वातावरणांत, अल्पसा का होईना पण नफा पदरी पाडून घेण्याच्या गुंतवणूकदारांमध्ये वाढलेल्या प्रवृत्तीने बाजारातील अस्थिरतेला खतपाणी मिळत आहे.