अजय वाळिंबे

‘माझा पोर्टफोलियो’ या साप्ताहिक सदरातून गुंतवणुकीसाठी शेअर्स सुचविले जातात. हे सुचविलेले शेअर्स म्हणजे खरेदीची ‘टीप’ नसून एक अभ्यासपूर्ण विवेचन असते. तुमचा ‘पोर्टफोलियो’ तयार करताना सदरात सुचविलेल्या शेअरचा देखील विचार केला जावा, परंतु तो स्वतः अभ्यासून. या सदराचे उद्दिष्ट केवळ सुचविलेले शेअर्स खरेदी करणे हे नसून वाचक गुंतवणूकदारांनी, लेखासोबत मांडण्यात आलेल्या गुणोत्तरांखेरीज आपलेही इतर निकष लावून मगच गुंतवणूक करावी हा आहे. अनेक वाचकांनी ‘पोर्टफोलियो म्हणजे काय?’ ‘तो कसा करावा?’ ‘शेअर्स कसे निवडावेत?’ किंवा ‘शेअर्स निवडताना इतर कुठले निकष लावावेत?’ असे प्रश्न विचारले होते. दर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे घेणार आहोत.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Archana Puran Singh reveals how Rekha responded when she asked about the mystery man in her life
अर्चन पूरन सिंगने रेखा यांना त्यांच्या आयुष्यातील ‘त्या’ मिस्ट्री मॅनबद्दल विचारलेला प्रश्न, काय उत्तर मिळालेलं? वाचा
Ageing affects your stomach
वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…

शेअर्सची निवड कशी?

पोर्टफोलियो’ हा मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यासाठी शेअर्स निवडताना कंपन्यांचे ‘फंडामेंटल अनॅलिसिस’ करून मगच निर्णय घ्यावा लागतो. ‘टेक्निकल अनॅलिसिस’ म्हणजेच तांत्रिक विश्लेषण हे मुख्यत्वे अल्प मुदतीच्या गुंतवणुकीसाठी उपयोगी पडते. कंपन्यांचे फंडामेंटल अनॅलिसिस करताना अनेक सूत्रे तसेच गुणोत्तरांचा आधार घ्यावा लागतो. यामध्ये कंपनीच्या आतापर्यंतच्या कामगिरीखेरीज बदलत्या परिस्थितीनुसार पुढील कामगिरी कशी असेल याचाही अंदाज घ्यावा लागतो. ‘माझा पोर्टफोलियो’ या सदरात काही महत्त्वाची गुणोत्तरे सादर केली जातात, मात्र आपण इतरही काही प्रमुख गुणोत्तरे अभ्यासणार आहोत.

सर्वप्रथम ‘पोर्टफोलियो’ सदरात समावेश केलेली गुणोत्तरे पाहूया:

पुस्तकी मूल्य (बूक व्हॅल्यू): प्रति शेअर पुस्तकी मूल्य हे प्रत्येक समभागाचे पुस्तकी मूल्य (किंवा अकाउंटिंग मूल्य) सूचित करते. पुस्तकी मूल्य हे कंपनीच्या प्रत्येक शेअरचे निव्वळ मालमत्ता मूल्य आहे. ते मिळविण्याचे सूत्र पुढीलप्रमाणे आहे:

भरणा झालेले भाग भांडवल राखीव निधी/ भरणा झालेल्या समभागांची संख्या

(Paid up Equity Share Capital Free Reserves/ Number of Equity Shares)

कुठल्याही शेअरचे पुस्तकी मूल्य त्या शेअरचा बाजार भाव समजण्याची गल्लत करता कामा नये. तसेच म्युच्युअल फंड युनिटचे ‘एनएव्ही’ आणि शेअरचे पुस्तकी मूल्य याची तुलना होऊ शकत नाही हेही लक्षात घ्यायला हवे.

कंपनीचे पुस्तक मूल्य हे शेअरहोल्डिंग मूल्याचे प्रतिनिधित्व करत असल्याने, शेअरच्या बाजार मूल्याशी पुस्तकी मूल्याची तुलना करून, समभागाचे मूल्यांकन योग्य पातळीवर आहे की नाही हे ठरवण्याचा हा प्रयत्न असतो. हे वस्तुत: एक प्रभावी मूल्यांकन तंत्र म्हणून काम करू शकते.

पुस्तकी मूल्याचे दोन मुख्य उपयोग आहेत: हे कंपनीच्या मालमत्तेचे एकूण मूल्य म्हणून काम करते, जे भागधारकांना कंपनी अवसायानात (लिक्विडेशन) गेल्यास प्राप्त होऊ शकते.

कंपनीच्या शेअरचे पुस्तकी मूल्याची त्याच्या बाजार मूल्याशी तुलना केल्यास, तो शेअर कमी किमतीत उपलब्ध आहे की जास्त हे सूचित केले जाऊ शकते.

जितके पुस्तकी मूल्य जास्त तितका तो शेअर सबळ असे साधेसरळ गणित असले तरीही ते प्रत्येक वेळी खरेच असते असे नाही. उदाहरणार्थ, तुम्हाला जवळपास सर्वच सरकारी बँकाच्या समभागांचे पुस्तकी मूल्य त्याच्या बाजारभावापेक्षा जास्त आढळेल. परंतु याचा अर्थ ते शेअर खरेदीसाठी स्वस्त आणि उत्तम आहेतच असे नाही. कारण कंपनीचे सध्याचे कामकाज तितकेसे चांगले नसले तरीही त्यांचा राखीव निधी जास्त असू शकतो आणि त्यामुळे अर्थातच पुस्तकी मूल्य जास्त दिसते. त्यामुळेच हे गुणोत्तर अभ्यासताना कंपनीची गेल्या वर्षभरातील आर्थिक कामगिरी, यंदाचा तोटा तसेच तोट्यासाठी केलेली तरतूद याचाही विचार करायलाच हवा. पुस्तकी मूल्य अभ्यासताना समभागाचे दर्शनी मूल्य लक्षात घेणे जरुरी ठरते.

किंमत- पुस्तकी मूल्य गुणोत्तर (प्राइस टू बुक व्हॅल्यू रेशो):

हे गुणोत्तर पुस्तकी मूल्याशीच संबधित आहे आणि सोपेही आहे. नावाप्रमाणेच हे गुणोत्तर एखाद्या शेअरचा बाजारभाव त्याच्या पुस्तकी मूल्याच्या किती पट आहे ते सांगते. गुंतवणुकीसाठी शेअर निवडताना हे गुणोत्तर जितके कमी तितका तो शेअर स्वस्त. परंतु वर म्हटल्याप्रमाणे केवळ गुणोत्तर कमी हा एकमेव निकष लावू नये. हे गुणोत्तर शक्यतो ३ किंवा ४ च्या आत असावे. उत्तम कंपन्यांचे हे गुणोत्तर अनेकदा खूप जास्त असू शकते.

प्रति समभाग उत्पन्न (अर्निंग पर शेअर – ईपीएस): शेअर बाजारात ईपीएस किंवा प्रति शेअर मिळकत हे एक मूलभूत परिमाण आहे जे गुंतवणूकदार त्यांच्या गुंतवणुकीबद्दल माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी कंपनीचे विश्लेषण करण्यासाठी वापरतात. ‘ईपीएस फॉर्म्युला’ हा कंपनी प्रत्येक शेअरसाठी किती पैसे कमावत आहे हे दर्शवतो. कंपनीच्या निव्वळ उत्पन्नाला कंपनीतील एकूण समभागांच्या संख्येने भागून त्याचे मोजमाप केले जाते. उच्च ईपीएस कंपनीची नफा आणि चांगली कामगिरी दर्शवते. बोनस अथवा हक्कभाग विक्रीमुळे भागभांडवल वाढते आणि साहजिकच प्रती समभाग उत्पन्न कमी होते.

प्रति शेअर मिळकत = निव्वळ उत्पन्न – प्रेफरन्स लाभांश/ कालावधीच्या शेवटी सामान्य शेअर्स

(Earnings per Share= Net Income – Preference Dividend/ Total outstanding Shares)

stocksandwealth@gmail.com

Story img Loader