मुलीने शाळेतूनच वडिलांना फोन करून विचारले, ‘डॅड, आर्थिक अरिष्ट म्हणजे नेमके काय असते?’ मुलीकडून आलेल्या या अनाहूत प्रश्नाने जेपी मॉर्गन चेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमन जराही विचलित झाले नाहीत. तिला शांतपणे उत्तर देत त्यांनी सांगितले – ‘अर्थव्यवस्थेत प्रत्येक पाच ते सात वर्षांच्या कालावधीत असे काही संकटमय घडते की त्याला आर्थिक अरिष्ट म्हटले जाते.’

अर्थव्यवस्था अशीच अरिष्ट चक्रात फसली असताना, जेमी यांनी २००८ साली बेअर स्टर्न ही कंपनी खरेदी केली. हा खरेदी व्यवहार करताना त्यांनी काय सांगावे? ते म्हणाले, ‘लोक घर खरेदी करतात. पण त्यात विशेष असे काही नाही. पण मी माझ्या कंपनीसाठी जळते घर विकत घेत आहे.’

amazon 15 minutes delivery
ॲमेझॉन आता ब्लिंकइट, झेप्टोला टक्कर देणार, १५ मिनिटांत वस्तू घरपोच मिळणार; कंपन्या क्विक कॉमर्स क्षेत्रात प्रवेश करण्यास उत्सुक का?
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Puneri pati shopkeeper display puneri pati on borrow photo viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी रोखण्यासाठी जुगाड; दुकानात लावली अशी पाटी, लोकं स्वप्नातही मागणार नाही उधार 
Rahul narvekar
विरोधी पक्षनेतेपदासाठी अद्याप अर्जच नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
fake Goods Market Pune, fake Goods, Market Pune,
शहरबात… बनावट मालाच्या बाजारपेठांना रोखणार कोण?
governor scam marathi news
नाशिकच्या ठकबाजाकडून नागपुरात गोशाळा उभारण्यासाठी तीन कोटी
Man beaten Young woman on stage who was performing shocking video viral on social media
कोणाच्या परिस्थितीचा असा फायदा घेऊ नका! त्याने भरस्टेजवरच तरुणीबरोबर ‘असं’ काही केलं की…, VIDEO पाहून येईल संताप
loksatta money motra article Growth and Value strategy
तुमची रणनीती काय? ‘ग्रोथ की व्हॅल्यू’

हेही वाचा – माझा पोर्टफोलियो : रस्तेबांधणीतील सर्वंकष सामर्थ्य; जीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स लिमिटेड

अमेरिकेत २००८ सालात काय झाले, काही अमेरिकी कंपन्या कशा कोसळल्या, मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, तेथील मध्यवर्ती बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष यांनी अर्थव्यवस्थेला तारण्यासाठी योजलेले उपाय, व्यवस्थेलाच वाचवायचे तर बुडत्या कंपन्यांना वाचवले पाहिजे या हेतूने तेथे जे काही केले गेले ते योग्य होते की अयोग्य, अमेरिकी अर्थव्यवस्थेला आजही त्याचे कोणते परिणाम सोसावे लागत आहेत, वगैरे विषयांवर जगभरात अनेक लेख, पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शिवाय, त्याची मांडणी करण्यासाठी हा एक लेख पुरेसा ठरणार नाही आणि तसा कोणता हेतूही नाही. आज फक्त एकाच व्यक्तीवर आपल्याला लक्ष केंद्रित करावयाचे आहे आणि ती व्यक्ती म्हणजे जेमी डिमन.

अमेरिकी भांडवल बाजारावर प्रेम करा अथवा टीका करा. परंतु या बाजाराकडे दुर्लक्ष मात्र करता येणार नाही. बाह्य जगाला पुरेसे तर जेपी मॉर्गनचा जेमी डिमन काय करतो यावर लक्ष ठेवले तरी त्यातून बाजाराच्या कलाचा वेध घेता येतो.

भारतातील म्युच्युअल फंड व्यवसायातून बाहेर पडलेल्या ब्लॅकरॉक या कंपनीला पुन्हा भारताची वाट धरावी लागली. फिडॅलिटीलाही असाच परतीचा मार्ग लवकरच दिसेल आणि जेपी मॉर्गनलासुद्धा आज ना उद्या भारतात म्युच्युअल फंडासाठी यावेच लागेल. अमेरिकी भांडवली बाजारातील ब्रह्मा, विष्णू, महेश कोण असे जर विचारले तर, गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ले आणि जेपी मॉर्गन या तीन संस्थांची नावेच प्राधान्याने विचारात घ्यावीच लागतील. २५ वर्षांपूर्वी अमेरिकेत १३ हजार बँका कार्यरत होत्या, आज फक्त ४ हजार बँका अस्तित्वात आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्नियास्थित एसव्हीबी बँक नुकतीच कोसळली. मराठीत म्हण आहे – ‘शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले.’ त्याप्रमाणे अशा चालून आलेल्या संधीवर झडप टाकत जेमी यांनी या बुडत्या बँकेला ताब्यात घेतले.

डॉड-फ्रँक कायदा अर्थात ‘वॉल स्ट्रीट रिफॉर्म ॲण्ड कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट’ या कायद्याचा जन्म क्रिस्तोफर जे डॉड या सिनेटरमुळे झाला. कायद्याचा हेतू निश्चितच चांगला होता. २००७ आणि २००८ मधील अरिष्टातून ज्या प्रकारे वित्तीय संस्था कोसळल्या तसा प्रसंग पुन्हा येऊ नये म्हणून केलेली उपाययोजना हा या कायद्याचा मुख्य हेतू होता. परंतु माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या अध्यक्षीय कारकीर्दीत हा कायदा दुबळा कसा करता येईल याचे प्रयत्न केले. २०१८ मध्ये त्यात दुरुस्त्या करून नवीन कायदा आणला गेला. एसव्हीसी बँकेचे लयाला जाणे आणि आपल्याकडे बँकांचे कोसळणे हे एकसारखे नाही आणि त्यामागची कारणेही एकसारखी नाहीत. अमेरिकेत व्याजाचे दर वाढले आणि त्यामुळे या बँकेने केलेल्या सरकारी कर्जरोख्यांमध्ये केलेली गुंतवणुकीचे बाजारातील मूल्य घटले. त्यामुळे बँकेला या गुंतवणुकीत कागदावर नुकसान दिसू लागले. वस्तुतः हे खरेखुरे नुकसान नव्हते. मात्र त्याच्या परिणामी बँकेतून ठेवी काढल्या गेल्या आणि त्याचे प्रमाण इतके वाढले की बँकच अडचणीत आली.

जेमी डिमन यांनी वेगवेगळ्या तरतुदींचा फायदा घेऊन, योग्य ते डावपेच वापरून, राजकीय संबंधांना कामी आणून एसव्हीबी बँकेला जेपी माॅर्गनच्या कह्यात आणले. या बँकेचे महत्त्व काय याची जेमी यांना निश्चितच पूर्ण कल्पना आहे. गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ले, ब्लॅकरॉक या स्पर्धकांच्या तुलनेत जेपी मॉर्गन वेल्थ मॅनेजमेंट या विभागात मागे पडत चालली होती. त्यामुळे एसव्हीबी बँकेच्या संपादनासह, या बँकेच्या शाखांशी संबंधित वेल्थ मॅनेजमेंट व्यवसायात पारंगत संघ त्यांच्या ताब्यात आला आहे. प्रचंड मोठ्या ईर्षेने हा व्यवसाय विभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरूही झाले आहेत. २००८ साली त्यांनी ‘जळते घर’ कमी गुंतवणुकीत खरेदी केले आणि त्या संस्थेत चांगले बदल झाले. एसव्हीबी बँकेच्या बाबतीतही हा गुणात्मक बदल घडून येताना नक्कीच दिसेल.

या सर्व घटनांचा आपल्याशी काय संबंध, असा साहजिकच प्रश्न निर्माण झाला असेल. समजून घेण्यासारखे हेच की, आपल्याकडे एखादी संस्था आजारी पडते तेव्हा तिला लवकरात लवकर पुन्हा तब्येतीत उभी करणे हे होत नाही.

हेही वाचा – क…कमॉडिटीचा

जेमी डिमन यांचा जन्म १३ मार्च १९५६ सालचा. पदवी शिक्षण बी.ए. मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयातून, तर हार्वर्ड विद्यापीठातून एमबीए त्यांनी केले. वडील व आजोबा दोघेही शेअर दलाल होते. जेमी यांनी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप येथे सर्वप्रथम नोकरी केली. गोल्डमन सॅक्स, माॅर्गन स्टॅन्ले, लेहमन ब्रदर्स या ठिकाणी नोकरी करण्याची संधी होती, पण ती नाकारली. त्या ऐवजी अमेरिकन एक्स्प्रेस या ठिकाणी नोकरी स्वीकारली. हा निर्णय अतिशय योग्य ठरला आणि त्यानंतर मग २००५ मध्ये जेपी माॅर्गन मुख्य कार्यकारी अधिकारीपदापर्यंत ते पोहोचले. जगप्रसिद्ध टाइम्स मासिकाने २००६ ,२००८, २००९ आणि २०११ या वर्षांमध्ये जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींमध्ये एक म्हणून त्यांचा समावेश केला. जेमी यांनी बराक ओबामा यांचा सल्लागार म्हणून काम बघितले. हे सर्व करत असताना अमेरिकेतील सर्वात मोठी बॅंक तसेच इन्व्हेस्टमेंट बॅंकिंगमध्ये जगात सर्वात जास्त उत्पन्न मिळवणारी संस्था म्हणून जे पी माॅर्गनचे नाव शिखरावर नेले.

जे पी. माॅर्गनने २००४ मध्ये बॅंक वन ताब्यात घेतली, तर २००८ मध्ये १२०० कोटी डाॅलरची संस्था फक्त २६ कोटी डाॅलरमध्ये खरेदी करून आजारी संस्था स्वस्तात कशा विकत घ्यायच्या आणि त्या कशा मोठ्या करायच्या याचा वस्तुपाठ घालून दिला. निष्णात व्यावसायिक कौशल्य, बाजारावरचे प्रभुत्व आणि राजकीय क्षेत्रातील जवळीक या सगळ्यांचा त्रिवेणी संगम म्हणजे हा माणूस. बाजारातील असामान्य माणसे इतिहास घडवतात तो असा. खूप लिहिता येईल, परंतु आपल्या बाजारासाठी जेवढे महत्त्वाचे तेवढेच शब्दबद्ध केले.

(pramodpuranik5@gmail.com)

Story img Loader