शनिवार (२९ मार्च) आणि रविवार (३० मार्च) दोन दिवस ट्रेडिंग बंद राहिल्यानंतर आज सोमवारी ३१ मार्च रोजीही बॉम्बे स्टॉक एक्स्जेंच (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्जेंच (NSE) बंद राहणार आहे. ईद उल फित्र २०२५ च्या पार्श्वभूमीवर बाजार बंद ठेवण्यात आला आहे.

मंगळवार १ एप्रिल रोजी हे दोन्ही स्टॉक एक्स्जेंच सुरू होतील. या सुट्टीदरम्यान,इक्विटी, डेरिव्हेटिव्हज, चलन बाजार, सिक्युरिटीज लेंडिंग आणि बोरिंग आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स याह सर्व बाजार व्यवहार बंद आहेत.

भारतीय शेअर बाजार आठवड्याच्या शेवटी आणि नियोजित सार्वजनिक सुट्ट्या वगळून आठवड्याच्या दिवशी काम करतात. त्यामुळे एप्रिल महिन्यातील एकूण सुट्ट्या पाहुयात.

१० एप्रिल २०२५ (गुरुवार) – महावीर जयंती
१४ एप्रिल २०२५ (सोमवार) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१८ एप्रिल २०२५ (शुक्रवार – गुड फ्रायडे)

२०२५ मधील अतिरिक्त सुट्ट्या

महाराष्ट्र दिन १ मे, स्वातंत्र्य दिन (१५ ऑगस्ट), गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) या दिवशी स्टॉक एक्स्चेंज बंद राहणार आहेत.

वर्षाच्या शेवटच्या तिमाहित गांधी जयंती आणि दसरा (२ ऑक्टोबर), दिवाळी (२१-२२ ऑक्टोबर) गुरुपौर्णिमा (५ नोव्हेंबर) आणि ख्रिसमस २५ डिसेंबर यादिवशीही बाजार बंद राहील.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार धोरणासंबंधाने अनिश्चिततेमुळे जागतिक पातळीवर गोंधळाचे वातावरण असल्याने त्याचे प्रतिकूल पडसाद शुक्रवारी (२८ मार्च) स्थानिक भांडवली बाजारावर उमटले. परिणामी आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या अखेरच्या सत्राची सांगता प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स-निफ्टीने घसरणीने केली.

२८ मार्च रोजी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १९१.५१ अंशांच्या घसरणीसह ७७,४१४.९२ पातळीवर बंद झाला. दिवसभरात त्याने ४२०.८१ अंश नुकसानीसह ७७,१८५.६२ या सत्रातील नीचांकी पातळीला स्पर्श केला होता. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये ७२.६० अंशांची घसरण झाली आणि तो २३,५१९.३५ पातळीवर बंद झाला. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, सेन्सेक्स ३,७६३.५७ अंश म्हणजेच ५.१० टक्क्यांनी वधारला, तर निफ्टीने १,१९२.४५ अंशांची ५.३४ टक्क्यांची कमाई केली आहे.