सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात मागील दीड वर्षातील सर्वात मोठी म्हणजेच सव्वा दोन टक्क्यांची पडझड बुधवारी दिसून आली. या निर्देशांकात वजनदार स्थान असलेल्या एचडीएफसी बँकेच्या समभागाने घेतलेली ८ टक्क्यांची गटांगळी या पडझडीचे प्रमुख कारण आहे. बँकेच्या तिमाही वित्तीय कामगिरीनंतरच्या दोन दिवस समभाग १० टक्क्यांहून अधिक आपटला आहे. गुंतवणूकदारांनी अकस्मात इतका धसका घ्यावा अशी कोणती गोष्ट एचडीएफसी बँकेसंबंधाने पुढे आली आहे?

एचडीएफसी बँकेच्या समभागाची सद्य:स्थिती काय?

एचडीएफसी बँकेच्या समभागांत बुधवारी दिसून आलेली तब्बल ८.४ टक्क्यांची घसरगुंडी ही धडकी भरवणारी आणि पर्यायाने सर्वात मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे. देशाच्या खासगी क्षेत्रातील बँकेने गेल्या कैक वर्षात इतकी मोठी घसरण अनुभवलेली नाही. इतकेच नाही गुरुवारीही पडझ़ड सुरू राहिल्याने समभागातील घसरण साडे दहा टक्क्यांहून अधिक वाढली आहे. परिणामी बँकेचे बाजार भांडवलात एक लाख कोटी रुपयांहून जास्त घसरून ११.६ लाख कोटी रुपयांवर आले आहे. मुंबई शेअर बाजारात गुरुवारी मध्यान्हापर्यंत एचडीएफसी बँकेचा समभाग २ टक्क्यांच्या घसरणीसह १,५०५.९० रुपयांवर व्यवहार करीत होता. कंपनीचे बाजार भांडवल १,०७,८५१.२४ कोटींनी घसरून ११,६६,८८८.९८ कोटी रुपयांवर आले.

Sensex gains , stock market rise , Sensex ,
मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
rupee recovered 8 paise from its historic low against the us dollar to settle at 86.62
नीचांकी पातळीवरून रुपया ८ पैशांनी सावरला
Stock market today BSE Sensex crashes over 1000 points
मुंबई शेअर बाजार हजार अंशांनी कोसळला; डॉलरच्या तुलनेत भारतीय चलन विक्रमी नीचांकावर
Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
Third consecutive losing session for Sensex Nifty
‘आयटी’ वगळता सारेच घसरणीला! सेन्सेक्स-निफ्टीसाठी सलग तिसरे नुकसानीचे सत्र
Big concern over rupee falling to 86 against dollar
डॉलरमागे ८६ च्या गर्तेत गेलेल्या रुपयातून मोठी चिंता;  परकीय चलन गंगाजळीला अब्जावधी डॉलरचा फटका
Rupee VS Dollar
Rupee VS Dollar : डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकावर; कारण काय?

हेही वाचा : सेन्सेक्समध्ये १६२८ अंशांची पडझड का झाली?

एचडीएफसीतील घसरणीने शेअर बाजाराचीच गटांगळी कशी?

बाजार भांडवलाच्या दृष्टीने पहिल्या पाचात स्थान असलेल्या एचडीएफसी बँकेचा समभाग हा सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही मुख्य निर्देशांकाचा महत्त्वाचा घटक आहे. इतकेच नव्हे तर यै समभागाचे दोन्ही निर्देशांकात अनुक्रमे १४.७ टक्के आणि १२.७ टक्के इतके भारमान आहे. इतक्या वजनदार समभागाच्या पडझडीतून निर्देशांकांनाही वाकवणारा ताण येणे स्वाभाविकच होते आणि बुधवारी तसे घडलेही. सेन्सेक्सने १,६२८.०१ अंशांनी म्हणजेच २.२३ टक्क्यांनी मूल्य गमावून ७१,५००.७६ पातळी गाठली. एचडीएफसीसारख्या बड्या बँकेतील घसरणीची लागण अन्य बँकिंग समभागांनाही झाली. परिणामी सेन्सेक्स-निफ्टीचा तोल आणखीच ढळत गेला. बँक समभागांचा प्रातिनिधिक निर्देशांक असलेला ‘बँक निफ्टी’ निर्देशांक जवळपास साडेचार टक्क्यांनी गडगडला. या निर्देशांकातही एचडीएफसी बँकेच्या समभागाचे २९ टक्के योगदानासह बाहुबली म्हणून स्थान आहे. अगदी महिना-दोन महिन्यांत १२ टक्क्यांनी म्हणजेच एकाच दिशेने तीव्र गतीने वाढलेल्या बाजार निर्देशांकांनी काहीशी विश्रांती आणि उसंत घेणे स्वाभाविकच होते. बाजाराचा उत्साह टिकवून ठेवणाऱ्या सकारात्मक बातम्यांचा अभाव असल्यास, किंचित खरचटणे देखील किती मोठा रक्तपात घडवते, याचे बुधवारची पडझड हा सर्वोत्तम नमुना ठरेल.

एचडीएफसी बँकेची तिमाही कामगिरी इतकी वाईट आहे काय?

एचडीएफसी लिमिटेड या देशातील गृह वित्त क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीचे एचडीएफसी बँकेत गेल्या वर्षी जुलैमध्ये विलीनीकरण पूर्णत्वाला गेले आहे. एकत्रीकरणाचा हा टप्पा म्हणजे एचडीएफसी बँकेसाठी खूप अवघड आणि नाजूक काळ आहे, असा विश्लेषकांमध्ये सूर आहे. डिसेंबर तिमाहीचे बँकेने जाहीर केलेले निकाल हे याच कसोटी पाहणाऱ्या काळाचा प्रत्यय देणारे आहेत. बँकेने १६,३७० कोटी रुपयांचा आणि मागील वर्षातील याच तिमाहीच्या तुलनेत ३३.५ टक्के वाढ दर्शवणारा निव्वळ नफा कमावला आहे, जो निश्चितच खूप चांगला आहे. तथापि कोणत्याही बँकेची तिच्या मालमत्तेवरील कमाई अर्थात नक्त परताव्याचे मोजमाप म्हणजे निव्वळ व्याज फरक (नेट इंटरेस्ट मार्जिन – निम) असते. या आघाडीवरील एचडीएफसी बँकेची कामगिरी फारशी उत्साहवर्धक नसणे ही अनेकांसाठी आणि बाजारासाठी चिंतादायी बाब ठरली आहे.

हेही वाचा : शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स १६०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २१,६०० च्या खाली

‘निम’ किती घटले आणि कशामुळे?

एक तर एचडीएफसीशी विलिनीकरणापश्चात बँकेच्या फुगलेल्या एकूण कर्ज मालमत्तेवरील निव्वळ व्याज फरक (‘निम’) हे लक्षणीयरित्या प्रभावित होणे अटळच होते. मागील दोन तिमाहींपासूनच बँकेकडून जाहीर निकालांतून ते स्पष्टपणे दिसूनही आले आहे. ‘निम’ म्हणजे बँकेकडून संकलित ठेवींवर द्यावे लागणारे व्याज आणि बँकेकडून वितरीत कर्जांवर तिला मिळणारे व्याज उत्पन्न यातील फरक असते. बँकेची नफाक्षमता ठरवणारा हा महत्त्वाचा घटक असतो. विलीनीकरणाआधी पहिल्या तिमाहीत ४.१ टक्के पातळीवर असलेले ‘निम’ हे विलीनीकरणानंतर उत्तरोत्तर कमी होत ३.७ टक्के पातळीवर घसरले आणि डिसेंबर तिमाहीत या गुणोत्तराचे प्रमाण ३.४ टक्के राहिले आहे. पुढील काही तिमाहीत त्यात आणखी पाव ते अर्धा टक्के घसरण संभवते. तरी ‘निम’ची ही साडे तीन टक्क्यांची पातळी देखील अन्य कैक बँकांच्या या आघाडीवरील कामगिरीच्या तुलनेत सरसच म्हणता येईल. एचडीएफसी बँकेबाबत या समस्येचा उतारा म्हणजे अल्पखर्चिक किरकोळ ठेवींचे प्रमाण वाढवत नेणे आणि उद्योगधंद्यांना मोठ्या रकमेच्या कर्ज वितरणात वाढ करणे हा आहे.

विलीनीकरणापश्चात वाढीबद्दल विश्लेषकांमधील सूर काय?

गेली कैक वर्षे बाजाराच्या गळ्यातील ताईत असलेल्या एचडीएफसी समूहाबद्दल बाजाराने संवेदनशील असणे स्वाभाविकच आहे. परिणामी या समभागाबद्दल बाजाराच्या एकंदर अपेक्षाही मोठ्या असतात. अर्थातच एचडीएफसी बँकेची कामगिरीही नेहमीच असाधारण आणि अद्वीतीयच असणे शक्यच नाही. विलीनीकरणानंतर या बँकेने जागतिक कंपन्यांच्या तुलनेत आकारमान गाठले आहे. एचडीएफसी बँक ही बुडीत कर्जे अर्थात ‘एनपीए’ची (नॉन-परफॉर्मिंग अॅसेट) निम्न पातळी असलेल्या सर्वात निरोगी बँकांपैकी एक आहे. विलीनीकरणाच्या फायद्यांच्या बाबतीत शंका घेतली जावी अशी परिस्थिती सध्या नसली तरी इतक्या महाकाय बँकेला विलीनीकरणाचे फायदे योग्य वेळेत मिळणे सुरू व्हावेत अशा अपेक्षा मात्र आहेत. त्यावर ठाम धारणा असणाऱ्या गुंतवणूकदारांना थोडी कळ सोसणे मग क्रमप्राप्तच ठरेल. बँकेनेही आक्रमक शाखा विस्तार हाती घेतला असून पुढील तीन वर्षात नवीन १३ हजार शाखांची भर घातली जाणार आहे. सार्वजनिक क्षेत्राकडून खासगी क्षेत्रातील बँकांकडे ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात संक्रमण सुरू असून, ठेवींच्या बाबतीत खासगी बँकांचा बाजारहिस्सा लक्षणीय वाढत आहे. विलीनीकरणानंतर अपेक्षित मेळ साधणारे फायदे लक्षात घेऊन बँकेच्या सर्वंकष वाढीच्या शक्यतांबाबत खात्री निश्चितच बाळगता येईल, असे अनेक विश्लेषकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : Jyoti CNC Listing : ज्योती सीएनसी ऑटोमेशनच्या IPO ची बाजारात दमदार एन्ट्री, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल

गुंतवणूकदारांनी काय करावे? दलाली पेढ्यांचे म्हणणे काय?

बहुतांश दलाली पेढ्यांना एचडीएफसी बँकेच्या समभागाच्या कामगिरीबाबत सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला आहे. जेफरीज आणि एचएसबीसी या विदेशी दलाली पेढ्यांनी ‘खरेदी’ शिफारस कायम ठेवत, एचडीएफसी बँकेसाठी अनुक्रमे २,००० रुपये आणि १,९५० रुपये असे लक्ष्य निर्धारीत केले आहे. मोतीलाल ओसवालनेही १,९५० रुपये असे किमतीबाबत लक्ष्य ठेवले आहे. निर्मल बंगने १,९९४ रुपये, कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने १,८६० रुपये समभागाची न्याय्य किंमत ठरेल असे म्हटले आहे. नुवामा वेल्थ मॅनेजमेंटने अल्पावधीच्या दृष्टिकोन असणाऱ्या गुंतवणूकदारांना सावध करताना, दीर्घ मुदतीसाठी ‘सांभाळून ठेवा’ शिफारसीसह समभागांसाठी उचित किंमत १,७७० रुपयांवरून १,७३० रुपयांवर आणली आहे.
sachin.rohekar@expressindia.com

Story img Loader