आताच्या घडीला तेजीच्या गोविंदांनी ‘निफ्टी’वर २४,००० चा भरभक्कम पाया रचला असून, २४,६५०च्या पहिल्या अडथळ्याचा थर पार करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आता तेजीचा गोविंदा २५,५०० च्या उच्चांकी थराची दहीहंडी फोडणार का? हाच काय तो प्रश्न. या पार्श्वभूमीवर या आठवड्याच्या वाटचालीकडे वळू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शुक्रवारचा बंद भाव:
सेन्सेक्स: ८१,०८६.२१
निफ्टी: २४,८२३.१५
एक महिन्याच्या म्हणजेच, २३ जुलै ते २३ ऑगस्ट या कालावधीत ६ ऑगस्टचा अपवाद वगळता निफ्टी निर्देशांक सातत्याने २४,०००चा स्तर राखण्यात यशस्वी ठरला आहे. तांत्रिक विश्लेषणातील सोनेरी नियमांचा आधार घेता, घसरण ही दोन स्वरूपात असते १) किंमत स्वरूपात (प्राइस वाइज) २) कालानुरूप स्वरूपात (टाइम वाइज) वरील सोनेरी नियम दैनंदिन उदाहरणावरून समजून घेऊ या.
आणखी वाचा-माझा पोर्टफोलियो : पटीपटीने वाढीच्या गुणाकाराचे ‘रसायन’
किंमत स्वरूपातील घसरण ही आपण प्रत्यक्ष स्वरूपात अनुभवू शकतो. जसे की गुंतवणूकदारांनी एखादा समभाग भांडवली बाजारात १०० रुपयांना खरेदी केला, त्या समभागाचा भाव १०० रुपयांवरून ५० रुपयांवर घसरला. यात मुदलातच घट आली. गुंतवणूकदार किंमत स्वरूपातील घसरणीचे ‘आर्थिक व मानसिक’ पडसाद प्रत्यक्षपणे अनुभवू शकतात, घसरण झाल्यावर तोंडातून हमखास बाहेर पडणारे वाक्य – ‘आम्ही शेअर्स विकत घेतले की भाव कोसळतात.’
कालानुरूप स्वरूपातील घसरण मात्र, पाया रचत, संथ गतीने, निराशाजनक घटनांचे मळभ स्थितप्रज्ञासारखे स्वीकारत, जे काही आर्थिक हादरे, भूकंप घडत असतात ते सहन करत असते. या प्रक्रियेत पायाभरणीला जराही धक्का लागत नाही. आहे त्या स्तरावर पाय रोवून उभे राहणे, म्हणजे कालानुरूप स्वरूपातील घसरण. कालानुरूप स्वरूपातील घसरण सखोल, विस्तृतपणे उद्याच्या ‘दहीहंडी फोडणाऱ्या’ गोविंदाच्या समर्पक उदाहरणावरून समजून घेऊ या.
दहीहंडी फोडणारा वरच्या थरावर एकच मुलगा अथवा मुलगी असते. पण त्यांना सावरण्यासाठी जमिनीवर पाय रोवून खंबीरपणे बाळगोपाळांचं वर्तुळ भरभक्कमपणे उभं असतं. हे गोविंदाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवत निफ्टीची कालानुरूप स्वरूपातील वाटचाल समजावून घेऊ या.
आणखी वाचा-निर्देशांकांची सलग सातव्या सत्रात वाढ; पॉवेल यांच्या भाषणापूर्वी मात्र सावध पवित्रा
ऑगस्ट महिन्याची सुरुवातच मुळात एकापाठोपाठ एक हादरा देणाऱ्या घटनांनी झाली. श्वास घेण्यास जराही उसंत न देता त्या घडत होत्या. यात अमेरिका, जपान, तैवान, द.कोरिया, हाँगकाँग या देशातील भांडवली बाजारांचं कोसळणं. आपल्या शेजारच्या बांगलादेशातील सरकार विरुद्ध जनतेचा उठाव, इराण-इस्रायल युद्ध, हिंडेनबर्ग आरोपांच्या मालिकेचा भाग- २ या सर्व घटनांनी बाजाराला आर्थिक हादरे बसत होते, निफ्टी निर्देशांकावर घातक चढ-उतार होत होते. बाजारात त्याही परिस्थितीत खरेदी, विक्रीचे व्यवहार चालू होते. या धक्क्यांत वाचकांसाठी विकसित केलेला निफ्टी निर्देशांकावरील २४,००० चा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ जराही न डळमळता, त्याने स्थितप्रज्ञासारखे २४,००० च्या स्तरावर पाय रोवून एक महिना उभे राहणे / टिकणे म्हणजे कालानुरूप स्वरूपातील घसरण.
दहीहंडी फोडणारा मुलगा / मुलीचा तोल गेल्यास, त्यांच्या वरच्या चढाईला क्षणिक खीळ बसते, पण जमिनीवरच्या बाळ गोपाळांच्या भरभक्कम वर्तुळाकार रचनेमुळे त्याला/ तिला वेळीच सावरलंही जातं, सावरल्यानंतर तो / ती पुन्हा दहीहंडी फोडण्यास सरसावतो.
आता वरील दहीहंडीचं चित्र बाजाराच्या परिभाषेत रूपांतरित केल्यास… भारतीय गुंतवणूकदार म्युच्युअल फंडात आपले महिन्याचे आर्थिक उत्तरदायित्व (एसआयपी) करतच आहेत. किंबहुना वाढीव प्रमाणात गुंतवत असल्याने, या आर्थिक वादळवाऱ्यात निफ्टी निर्देशांकावर २४,००० चा पाया भरभक्कम होत होता. हा पाया थोडेथोडके दिवस नव्हे तर तब्बल एक महिना – २३ जुलै ते २३ ऑगस्ट दरम्यान निफ्टी निर्देशांक २४,००० चा स्तर राखून आहे. हीच ती जमिनीवर पाय रोवून, वीस हजार कोटींच्या ‘एसआयपी’चे मासिक आर्थिक उत्तरदायित्व निभावणारी, भारतीय गुंतवणूकदारांचे वर्तुळ या आर्थिक वादळवाऱ्यात बाजाराच्या पाठीशी भरभक्कमपणे उभे आहे. येणाऱ्या दिवसात निफ्टी निर्देशांकावर २४,६५० ते २४,३५० पर्यंत हलक्याफुलक्या घसरणीची अपेक्षा असून, या स्तराचा आधार घेत निफ्टी निर्देशांकाचे प्रथम वरचे लक्ष्य २४,९५० ते २५,२००, तर द्वितीय वरचे लक्ष्य २५,५०० असेल.