Wipro buyback plan Share purchase : माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी विप्रो लिमिटेडच्या संचालक मंडळाने १२,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेची गुरुवारी घोषणा केली. कंपनीच्या भागधारकांना यातून त्यांच्याकडील समभागावर १९ टक्के लाभ मिळविता येणार आहे. यापूर्वी विप्रोने २०१६ सालात २,५०० कोटींची, २०१७ सालात ११,००० कोटींची आणि २०२० मध्ये ९,५०० कोटी रुपये अशा योजनांवर खर्च करून भागधारकांच्या पदरी भरभरून फायदा दिला आहे.

विप्रोच्या संचालक मंडळाने मंजुरी दिलेल्या योजनेनुसार, कंपनीकडून सुमारे २६.९६ कोटी समभाग प्रत्येकी ४४५ रुपये किमतीला खरेदी केले जाणार आहेत. म्हणजेच समभागाच्या गुरुवारच्या बीएसईवरील ३७४.४० रुपये बंद भावाच्या तुलनेत १९ टक्के अधिमूल्य भागधारकांना मिळेल. कंपन्यांकडील राखीव गंगाजळीतून भागधारकांना लाभ देण्याचा समभाग पुनर्खरेदी हा लाभांशापेक्षा करकार्यक्षम पर्याय ठरला असून, गेल्या काही वर्षांत टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजीज, माइंड ट्री, इन्फोसिस या विशेषत: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून हा मार्ग समर्पकपणे वापरात आला आहे. विप्रोकडून मागील काही वर्षांत सलगपणे भागधारकांना या पद्धतीतून लाभ दिला गेला आहे. ‘सेबी’च्या नियमानुसार, कोणत्याही कंपनीला समभाग पुनर्खरेदी ही १२ महिन्यांमध्ये एकदाच करता येते. विप्रोने यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये समभाग पुनर्खरेदी प्रक्रिया राबविली होती. त्यामुळे या नव्या पुनर्खरेदीचा कंपनीचा मार्ग खुला झाला आहे.

silver truck mankhurd
मुंबई: मानखुर्द येथे चांदीचा ट्रक अडवला, ८० कोटींची आठ हजार ४७६ किलो वजनाची चांदी जप्त
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
Reliance-Disney merger completed, Reliance-Disney,
रिलायन्स-डिस्ने यांचे ७०,३५२ कोटींचे महाविलीनीकरण पूर्ण
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
Mumbai Vehicle Number Purchase, Vehicle Number,
मुंबई : पसंतीच्या वाहन क्रमांकांची खरेदी कमी; महसूल जास्त, दोन महिन्यांत १० कोटी रुपयांचा महसूल
इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ
Tata Motors profit falls 11 percent as vehicle sales decline
वाहनांची विक्री घसरल्याने टाटा मोटर्सच्या नफ्यात ११ टक्के घट;  दुसऱ्या तिमाहीत ३,३४३ कोटी रुपयांवर

भागधारकांना लाभाचे दान

‘बायबॅक’ वर्ष             २०१६ २०१७ २०१९ २०२१ २०२३
आकारमान (रु. कोटी)      २,५००  ११,०००  १०,५०० ९,५०० १२,०००
प्रति समभाग किंमत (रु.) ६२५      ३२०      ३२५ ४०० ४४५
अधिमूल्य %             ४         १९         ३३ –             १९

तिमाहीत ३,०७४ कोटींचा नफा

विप्रोने गुरुवारी मार्च २०२३ अखेर सरलेल्या चौथ्या तिमाहीत ३,०७४.५ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत ०.४ टक्क्यांची किरकोळ घट नोंदवली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने ३,०८७.३ कोटी रुपयांचा नफा मिळविला होता. तर मार्च तिमाहीत महसूल ११.१७ टक्क्यांनी वधारून २३,१९०.३ कोटी रुपये झाला आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षात कंपनीने ११,३५० कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे.

समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणजे काय?

एखादी कंपनी तिच्या विद्यमान भागधारकांकडून एका निर्धारित किमतीला कंपनीचे समभाग खरेदी करते यालाच समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) म्हणतात. कंपनीकडून बाजारभावापेक्षा अधिक किमतीने गुंतवणूकदारांकडून समभाग खरेदी केले जातात. प्रारंभिक समभाग विक्रीच्या (आयपीओ) अगदी विरुद्ध अशी ही प्रक्रिया आहे.कंपन्या ‘बायबॅक’ का करतात?कंपन्यांकडून शेअर बायबॅक केली जाण्याची अनेक कारणे आहेत. बऱ्याचदा कंपन्यांच्या ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असते. बाजार नियंत्रक ‘सेबी’च्या नियमानुसार, एका ठरावीक कालावधीत कंपन्यांना शिल्लक गंगाजळीचा विविध कार्यांसाठी, गुंतवणुकीसाठी किंवा कंपनीच्या विस्तारासाठी वापर करावाच लागतो आणि त्याव्यतिरिक्तदेखील ठरावीक काळ कंपनीकडे अतिरिक्त निधी पडून असल्यास कंपनीला लाभांशाच्या माध्यमातून भागधारकांमध्ये तो वितरित करावा लागतो. शिवाय लाभांश वितरण करपात्र ठरविले गेल्यापासून, ताळेबंदात रग्गड राखीव गंगाजळी असलेल्या कंपन्यांकडून भागधारकांच्या पदरी लाभ पोहोचविताना, लाभांशापेक्षा समभागांच्या अधिमूल्यासह पुनर्खरेदीचा मार्ग अनुसरला जातो.