विविध क्षेत्रात उच्च पदांवर महिलांनी उत्तुंग भरारी केलेली असताना एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांत रिटेल उद्योगांमध्ये रिक्त असलेल्या मोठ्या पदांवर फक्त पुरुष कर्मचाऱ्यांचीच वर्णी लागली आहे. Gap, Stitch Fix, Victorias Secret, Kohl’s, The Vitamin Shoppe आणि Real Real आदींसारख्या रिटेल उद्योगांनी सीईओपदी (मुख्य कार्यकारी अधिकारी) पुरुषांची नियुक्ती केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेल्या ३० वर्षांपासून रिटेल उद्योगात कार्यरत असलेल्या Bumbershoot चे मुख्य कार्यकारी अधिकारी किम्बर्ली ली मायरन म्हणाल्या की, “ही बाब मला बार्बी चित्रपटाची आठवण करून देतेय. ग्राहक खर्चावर स्त्रीयांचं नियंत्रण असतं. खर्चाबाबतचा निर्णय महिलांकडून घेतला जातो. तरीही याच क्षेत्रात महिला पुढे गेलेल्या नाहीत.”

आकडेवारी काय सांगते?

महिलांचे करिअर पुढे नेण्यासाठी शेकडो कंपन्यांसोबत काम करणार्‍या Catalyst च्या विश्लेषणानुसार, “मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महिलेने जाणे दुर्मिळ आहे.” गेल्या काही वर्षांत महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असताना फॉर्च्युन ५० कंपन्यामध्ये ९० टक्के पुरुष मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. तर, फॉर्च्युन १००० मधील ८६ रिटेल उद्योगांमध्ये १३ जुलै २०२३ पर्यंत फक्त एक महिला कार्यकारी अधिकारी होती. गेल्यावर्षीपेक्षा हा आकडा घसरलेला असल्याचं निरिक्षण हेड्रिग अॅण्ड स्ट्रगल या रिक्रूटींग कंपनीने नोंदवलं आहे. ब्युरो ऑफ लेबर स्टॅटिटिक्सनुसार, उद्योगातील एंट्री लेव्हल वर्कफोर्स महिला आहेत. ७२ टक्के कॅशिअर आणि सेल्सपर्सन या महिला आहेत.

यामागचं कारण काय?

गेल्या काही दिवसांत अनेक कंपन्या आर्थिक तणावाला सामोरे जात आहेत. त्यामुळे अशा अनिश्चिततेच्या काळात कंपन्या अधिक जोखीम टाळतात. तसंच, तज्ज्ञ आणि अनुभवी अधिकाऱ्यांनाच नियुक्ती देतात. काही ठिकाणी तर जुन्या आणि अनुभवी अधिकाऱ्यांनाच कायम ठेवण्यात आले आहे.

फॉर्च्युन कंपन्यांमध्ये महिलांची संख्या वाढली

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर कॅटॅलिस्टचे मुख्य कार्यकारी लॉरेन हॉरेटन यांनी नमूद केल्याप्रमाणे फॉर्च्युन ५०० कंपन्या चालवणाऱ्या महिलांची टक्केवारी गेल्या पाच वर्षांत दुप्पट झाली आहे. पूर्वी ही टक्केवारी ४.८ टक्के होती, आता १०.४ टक्के महिला फॉर्च्युन कंपन्या चालवतात.

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mens monopoly on corporate ceo positions the number of female officers decreased what is the real reason sgk