RBI Monetary Policy 2023: गेल्या अनेक वर्षांपासून बऱ्याच ठेवी भारताच्या बँकांमध्ये पडून आहेत, ज्यावर अद्याप कोणताही दावा केलेला नाही. या रकमेवर दावा न करण्यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात, जसे की ठेवीदाराचा अचानक मृत्यू, नामनिर्देशित व्यक्तीचे नाव नसणे किंवा ठेवीदाराचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना याची माहिती नसते. मात्र, आता अशा ठेवी सहज शोधता येणार आहेत.

रिझर्व्ह बँकेने गुरुवारी विविध बँकांमध्ये ठेवीदारांनी किंवा त्यांच्या लाभार्थ्यांनी ठेवलेल्या आणि दावा न केलेल्या ठेवींचा तपशील मिळविण्यासाठी केंद्रीकृत पोर्टल स्थापन करण्याची घोषणा केलीय. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी चालू आर्थिक वर्षासाठी पहिले द्वि-मासिक चलनविषयक धोरण जाहीर करणारे वेब पोर्टल सुरू करण्याची घोषणा केली आहे.

Baba Siddiqui murder case, Baba Siddiqui,
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणः …या कारणामुळे हल्लेखोरांनी दुचाकी वापरली नाही
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Ratan Tatas significant investments helped startups to stand on thier own feet
स्टार्ट-अप्ससाठी रतन टाटा नेहमीच कसे ठरले ‘देवदूत’?
rbi urban cooperative banks
नागरी सहकारी बँकांना भांडवल उभारणीचे नवीन मार्ग, रिझर्व्ह बँकेकडून चर्चात्मक दस्ताचा प्रस्ताव
issue of house of police and service colonies is stalled
व्यथा पोलिसांच्या : घर व सेवा वसाहतींचा प्रश्न रखडलेला
Municipal Corporation employees instructed to gather feedback before closing citizen complaints on PMC Care App
तक्रारदाराची तक्रार बंद करताना पुणे महापालिकेचा मोठा निर्णय
pune vanchit Bahujan aghadi
शाळकरी मुलींशी अश्लील कृत्य प्रकरणात जप्त केलेली गाडी फोडली, वंचितच्या पदाधिकाऱ्यांसह नऊ जणांवर गुन्हा
sri lanka president leftist leader anura kumara dissanayake
लेख : श्रीलंकेसाठी ‘ग्रीक’ धडे!

हेही वाचाः Success Story : सिद्धार्थ यांचा ‘हा’ निर्णय! रॉयल एनफिल्ड निघाली ‘बुलेट’च्या वेगात; जाणून घ्या काय घडवली किमया?

फेब्रुवारीमध्ये अहवाल सादर करण्यात आला होता

हक्क नसलेल्या ठेवींचा तपशील फेब्रुवारीमध्येच घेण्यात आला होता. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (PSBs) सुमारे ३५,००० कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी फेब्रुवारी २०२३ पर्यंत RBI कडे पाठवल्या. यामध्ये १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ चालू नसलेली खाती समाविष्ट होती.

SBI कडे सर्वाधिक बेहिशेबी ठेवी

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) बँकांमध्ये पडून असलेल्या दावा न केलेल्या ठेवींच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. त्यात सुमारे ८,०८६ कोटी रुपयांच्या हक्क नसलेल्या ठेवी आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पंजाब नॅशनल बँक आहे, ज्यांच्याकडे ५,३४० कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यानंतर कॅनरा बँक ४,५५८ कोटी रुपयांसह आणि बँक ऑफ बडोदा ३,९०४ कोटी रुपयांसह तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने नवीन पतधोरण जाहीर केले आहे. RBI MPC ने यावेळी दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही आणि रेपो दर ६.५० टक्क्यांच्या पातळीवर कायम ठेवण्यात आला आहे.

हेही वाचाः Success Story : कधी काळी फ्लिपकार्टमध्ये काम करायचे आणि आता ९९,००० कोटींच्या कंपनीची स्थापना; कोण आहेत समीर अन् राहुल?