रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. फोर्ब्सच्या यादीत मुकेश अंबानींना नववं स्थान मिळालं आहे. त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी गौतम अदाणी जागतिक यादीत २४ व्या स्थानावर घसरले आहेत. २४ जानेवारी रोजी अदाणी हे जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. त्यावेळी त्यांची संपत्ती १२६ अब्ज डॉलर होती. मात्र, हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालानंतर त्यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली.

यादीत नेमके कोण कुठे?

अदाणी यांची सध्या ४७.२ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे आणि ते अंबानीनंतर दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत भारतीय आहेत. ८३.४ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ६५ वर्षीय अंबानी अब्जाधीशांच्या यादीत नवव्या स्थानावर आहेत. एचसीएलचे शिव नाडर यांनी २५.६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह देशातील तिसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचे बिरुद मिरवता आहेत.

nagma actress link up with three married celebrities
तीन विवाहित पुरुषांच्या प्रेमात पडली होती ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री; बॉलीवूडसह दक्षिणेत केलेत अनेक सुपरहिट सिनेमे
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
wpi inflation hits 4 month high in october on rising food prices
भाज्यांमधील किंमतवाढ ६३.०४ टक्क्यांवर; घाऊक महागाई दराचाही चार महिन्यांतील सर्वोच्च स्तर
person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
Juhi Chawala
जुही चावला बॉलीवूडमधील सर्वांत श्रीमंत अभिनेत्री! चित्रपटांपासून दूर असूनही कसे कमावते पैसे? उत्पन्नाचा स्रोत काय? घ्या जाणून…

जगातील २५ श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती किती?

विशेष म्हणजे अदाणींचा मोठा भाऊ विनोद यांची अंदाजे एकूण संपत्ती १० अब्ज डॉलर आहे, परंतु त्यांच्याकडे सायप्रस पासपोर्ट आहे, ज्यामुळे भारतीय अब्जाधीशांच्या यादीत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीत १६९ भारतीय आहेत. गेल्या वर्षी ही संख्या १६६ होती. जगातील २५ सर्वात श्रीमंत लोकांची एकूण संपत्ती २.१ ट्रिलियन डॉलर आहे. २०२२ च्या २.३ ट्रिलियन डॉलर लक्ष्यापेक्षा हे २०० अब्ज डॉलर कमी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ श्रीमंतांपैकी दोन तृतीयांश लोकांनी संपत्ती गमावली. अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांना सर्वाधिक फटका बसला आहे, कारण त्यांच्या कंपनीचे शेअर्स ३८ टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे त्यांच्या संपत्तीत ५७ अब्ज डॉलरची घट झाली आहे. बेझोस ११४ अब्ज डॉलर्ससह अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

हेही वाचाः जागतिक बँकेने भारताच्या वाढीचा अंदाज घटवला; आर्थिक वर्ष २४ मध्ये GDP वाढ ६.३ टक्के राहण्याची शक्यता

एलन मस्कचे नुकसान

एलन मस्क अशी दुसरी व्यक्ती आहे, ज्यांना सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले आहे. ट्विटर विकत घेण्याच्या बदल्यात त्यांना टेस्लाचे शेअर्स विकावे लागले, ज्यामुळे त्यांची संपत्ती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत ३९ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. १८० अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह ते यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. फ्रान्सचा बर्नार्ड अर्नॉल्ट २११ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह या यादीत अव्वल स्थानी आहे. अब्जाधीशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचाः बँकांमध्ये जमा असलेले ३५ हजार कोटी तुमचे तर नाहीत ना, रक्कम परत कशी मिळवाल?