रिलायन्स इंडस्ट्रीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी कोलानंतर आता आइस्क्रीम मार्केटमध्ये उतरणार आहेत. ही बातमी समोर आल्यानंतर देशातील सर्व प्रसिद्ध आइस्क्रीम कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. Reliance Consumer Products, Reliance Retail Ventures ची FMCG कंपनी लवकरच नवीन ब्रँड “Independence” सह वेगाने वाढणाऱ्या आइस्क्रीम मार्केटमध्ये प्रवेश करू शकते. जी गेल्या वर्षी गुजरातमध्ये लॉन्च करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संघटित आइस्क्रीम मार्केटमध्ये स्पर्धा तीव्र होणार

सूत्रांच्या हवाल्याने मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कंपनी गुजरातमधील एका आईस्क्रीम निर्मात्यांशी उत्पादन आऊटसोर्स करण्यासाठी बोलणी करीत आहे. रिलायन्सच्या प्रवेशामुळे संघटित आइस्क्रीम मार्केटमध्ये स्पर्धा पाहायला मिळेल, असे उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याप्रकरणी रिलायन्सकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही.

आइस्क्रीम निर्मात्यांशी चर्चा अंतिम टप्प्यात

TOI ने आपल्या अहवालात सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, कंपनी गुजरात आधारित आइस्क्रीम निर्मात्यांसोबत चर्चेच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. अशा परिस्थितीत कंपनी या उन्हाळ्यात आपल्या किराणा दुकानांद्वारे आपले आईस्क्रीम लॉन्च करू शकते. इंडिपेंडन्स ब्रँड खाद्यतेल, कडधान्ये, तृणधान्ये आणि पॅकेज केलेले खाद्यपदार्थ यांसारखी उत्पादने ऑफर करतो.

हेही वाचाः IMF ने मान्य केली भारताची ताकद; २०२३ मध्ये चीनसोबत मिळून करणार जागतिक विकास

आइस्क्रीम बाजाराचा आकार २०,००० कोटी रुपये

तज्ज्ञांच्या मते, रिलायन्सच्या प्रवेशामुळे आइस्क्रीम मार्केटमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडतील आणि स्पर्धा तीव्र होईल, अशी अपेक्षा आहे. उत्पादनांची श्रेणी आणि त्याद्वारे लक्ष्यित बाजार एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचेल. भारतीय आईस्क्रीम बाजाराचा आकार २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे आणि संघटित प्रतिस्पर्धेत त्यात सुमारे ५० टक्के वाटा आहे.

वाढती ग्रामीण मागणी

चांगल्या विद्युतीकरणामुळे तसेच डिस्पोजेबल उत्पन्नात वाढ झाल्यामुळे भारतीय आइस्क्रीम मार्केटमध्ये पुढील पाच वर्षांत दुहेरी अंकी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ग्रामीण भागात मागणीही वाढत आहे. अशा स्थितीत नवीन स्पर्धेक या बाजारात येण्याची अपेक्षा आहे. हॅवमोर आइस्क्रीम, वाडिलाल इंडस्ट्रीज लिमिटेड आणि अमूल यांसारख्या आइस्क्रीम उत्पादक वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी त्यांची क्षमता वाढवू शकतात.

हेही वाचाः विश्लेषण: दुय्यम बाजार व्यापारासाठी ASBA सारखी सुविधा ग्राहकांना फायदेशीर ठरणार का? जाणून घ्या

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukesh ambani will now enter into ice cream business worth 20 thousand crores vrd
Show comments