Multibagger Stock: शेअर बाजारात गुंतवणूक करणे जितके धोकादायक आहे, तितकेच ते फायदा मिळवण्याचे एक चांगले साधन आहे. योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास अगदी छोटी गुंतवणूकही तुम्हाला करोडपती बनवू शकते. असे अनेक मल्टिबॅगर स्टॉक्स (Multibagger Stock)आहेत, ज्यांनी छोट्या गुंतवणुकीचे कोट्यवधीत रूपांतर केले आहे. बजाज ग्रुपची कंपनी असलेल्या बजाज फायनान्स स्टॉक (Bajaj Finance Stock)च्या शेअर्सने २० वर्षांत १००००० टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
ऑगस्ट २००२ मध्ये बजाज फायनान्सच्या शेअरची किंमत फक्त ४ रुपये होती. तर गुरुवारी ६ एप्रिल २०२३ रोजी या शेअरची किंमत ५,९५१ वर पोहोचली. या दीर्घ कालावधीत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना १०३,३९५.६५ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने ऑगस्ट २००२ मध्ये बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपये गुंतवले असते आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर हे पैसे सध्या ११ कोटी रुपयांच्या वर गेले असते.
१४ वर्षात १ लाख रुपयांवरून ११ कोटी कमावले
१३ मार्च २००९ रोजी बजाज फायनान्सचे शेअर्स BSE वर ५.०३ रुपयांवर होते. बीएसईमध्ये ३ एप्रिल २०२३ रोजी कंपनीचे शेअर्स ५७१३ रुपयांवर बंद झाले. अशा परिस्थितीत जर एखाद्या गुंतवणूकदाराने १३ मार्च २००९ रोजी बजाज फायनान्सच्या शेअर्समध्ये १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर हे पैसे सध्या ११.३५ कोटी रुपये झाले असते. अशा प्रकारे कंपनीच्या शेअर्सनी गेल्या १४ वर्षात ११३४७८ टक्के परतावा दिला आहे.
हेही वाचाः रेल्वेकडून ऑर्डर मिळताच ‘या’ कंपनीचे शेअर सुस्साट, एका दिवसात बँकेच्या FDपेक्षाही जास्त परतावा
कर्जामध्ये १.१५ कोटी एवढी आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ
बजाज फायनान्सने सांगितले की, ३१ मार्च २०२३ पर्यंत त्याची ग्राहक फ्रँचायझी ३१ लाखांनी वाढून ६.९१ कोटी झाली आहे. कंपनीने ४ एप्रिल रोजी दिलेल्या नियामक फाइलिंगमध्ये म्हटले आहे की, कंपनीने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ग्राहक फ्रेंचायझीसाठी घेतलेल्या कर्जामध्ये १.१५ कोटी एवढी आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ नोंदवली आहे, जी गेल्या वर्षी याच तिमाहीत ६३ लाखांच्या तुलनेत २० टक्क्यांनी वाढून ७६ लाख झाली होती. बजाज फायनान्सने आर्थिक वर्ष २०२३ मध्ये आतापर्यंतचे सर्वाधिक २.९६ कोटींचे नवीन कर्ज घेतले आहे.
हेही वाचाः ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ बँकेने वाढवली विशेष एफडीची शेवटची तारीख