Mutual Fund SIP: निवृत्तीनंतर टेन्शन फ्री आयुष्य जगावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा परिस्थितीमध्ये व्यक्ती सर्वप्रकारे इतरांवर अवंलबून असतो. याच काळात आजार बळवण्याची शक्यता देखील अधिक असते. तेव्हा निवृत्ती घेतल्यानंतर स्वत:ला आणि आपल्या जोडीदाराला त्रास होऊ नये यासाठी आधीपासून प्रयत्न करणे आवश्यक असते. बचत आणि गुंतवणूक या दोन गोष्टींची मदत घेतल्यास भविष्याची चिंता मिटते असे म्हटले जाते. पगारातील ठराविक रक्कम बचत करुन योग्य प्रकारे गुंतवल्यास म्हातारपणात आर्थिक आधार मिळतो.
भविष्यामध्ये आर्थिक स्थिरता असावी यासाठी कामाला लागल्यापासून बचत करणे योग्य असते अशी काहींची समजूत असते. सुरुवातीपासून बचत-गुंतवणुक केल्यास नंतर फायदा होता. अनेकजण यासाठी म्युच्युअल फंडच्या योजनांची मदत घेतात. आज अशाच एका योजनेची माहिती देणार आहे, ज्यामध्ये फक्त १६६ रुपयांची गुंतवणूक केल्यास तब्बल १.८ कोटी रुपये मिळवू शकता.
सध्या बाजारामध्ये अनेक म्युच्युअल फंडच्या योजना उपलब्ध आहेत. यातील दर महिन्याला ५ हजार रुपये गुंतवणूक असलेली योजनेची निवड केल्यास त्याचा भविष्यात नक्की फायदा होईल. महिन्याला पाच हजार म्हणजे दिवसाला १६६ रुपये बचत करुन गुंतवावे लागतील. या योजनेचा कालावधी ३० वर्षांचा आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास ग्राहकांना १२ टक्के रिटर्स मिळू शकतो. म्हणजेच ३० वर्षांनंतर ग्राहकांच्या खात्यामध्ये १.८ कोटी रुपयांचा निधी सहज जमा होऊ शकतो. या पैश्यांमुळे म्हातारपणी कोणत्याही गोष्टीची चिंता करावी लागणार नाही.
आणखी वाचा – PM Kisan Samman Nidhi : १४व्या हप्त्याबाबत मोठे अपडेट; ‘या’ महिन्यात येऊ शकतात पैसे
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवलेले पैसे बाजाराच्या जोखमीच्या अधीन असतात. यामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. अपुऱ्या माहितीसह यामध्ये पैसे गुंतवल्यास आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. या आर्थिक गुंतवणूकीद्वारे मिळणारा रिटर्न्स हा तेव्हाच्या बाजाराच्या स्थितीवर अवलंबून असतो.