गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अनेक चांगले संकेत मिळत आहेत. शेअर बाजारातील सेन्सेक्सपाठोपाठ आता NSE मधील बेंचमार्क निफ्टीने सोमवारी प्रथमच २०,००० चा टप्पा ओलांडला. दुसरीकडे BSE वर सेन्सेक्स ०.७९ टक्क्यांनी वाढून ६७,१२७.०८ वर बंद झाला, म्हणजे प्रथमच ६७,००० च्या वर गेला. भारत ही जगातील सर्वात महागडी बाजारपेठ म्हणून उदयास येत असतानाच वाढत्या क्रूडच्या किमतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्या क्रूड ऑइल ९० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यवहार करीत आहे. दुसरीकडे निफ्टी आणि सेन्सेक्स वाढल्याचा गुंतवणूकदारांना कशा पद्धतीनं फायदा मिळणार आहे ते जाणून घेऊयात.

बाजार का वाढत आहे?

येत्या काही दशकात भारतीय अर्थव्यवस्था चांगली वाढणार असून, उच्च अपेक्षित वाढीबद्दल गुंतवणूकदारांचा उत्साह कायम आहेच. विशेष म्हणजे भारतीय समभागांमध्ये सतत परकीय चलनाची वाढ होत आहे. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) इक्विटीमध्ये ११०,५७९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे सेन्सेक्समध्ये १३.८ टक्क्यांची वाढ झाली आहे.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
indian stock market nifty sensex
अमेरिकी महागाई दराच्या प्रतीक्षेत निर्देशांकात नगण्य वाढ
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
rbi governor shaktikanta das
उच्च व्याजदर केवळ विकासदर मंदावण्याचे कारण नव्हे – दास
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

ऑगस्टमध्ये जाहीर झालेल्या GDP वाढीच्या आकड्यांवरून असे दिसून आले आहे की, जागतिक मागणी कमी असूनही जून २०२३ मध्ये संपलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्था ७.८ टक्क्यांनी विस्तारली आहे. सेवा क्षेत्रातील मजबूत पुनरुज्जीवनासह देशांतर्गत वापर आणि गुंतवणुकीच्या हालचालींमुळे एकूण आर्थिक उत्पादनाच्या ५० टक्क्यांहून अधिक वाढीला पाठिंबा मिळाला आहे. देशांतर्गत गुंतवणुकीनेही ताकद दाखवली असून, एकूण भांडवल निर्मिती ७ टक्के झाली आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ एएमसीचे एमडी आणि सीईओ बालसुब्रमण्यम म्हणाले, “पुढील १० ते १५ वर्षे आर्थिक वाढ टिकवून ठेवण्याचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा गुंतवणूक करत राहण्याचा विश्वासही हळूहळू वाढत आहे. खरं तर बाजारात एक सुव्यवस्थित हालचाल असून, आपण चक्रिय वर्तुळातून एका चांगल्या व्यासपीठाकडे जात आहोत.”

हेही वाचाः रिलायन्स समूहाच्या ‘या’ कंपनीचे मूल्यांकन ८ लाख कोटींच्या पुढे, आता KKR करोडोंची गुंतवणूक करणार

नेमकी चिंता काय आहे?

पाश्चिमात्य अर्थव्यवस्था प्रदीर्घ मंदीतून जात असल्याने बाहेरील मागणीच्या वाढीवर एक दबाव राहील, अशी अपेक्षा आहे. Fitch ने पुढील तीन वर्षात अपेक्षित आर्थिक बिघाड, सरकारी कर्जाचा उच्च आणि वाढता बोजा, तसेच गेल्या २० वर्षात प्रशासनात सातत्याने होत असलेली घसरण या कारणांमुळे यूएस सार्वभौम रेटिंग AAA वरून AA+ वर घसरले आहे.

भारतातील कृषी वाढ मंदावली आहे, कारण जूनमधील कमी पाऊस पडला असून, पेरण्याही उशिराने करण्यात आल्यात. अपुरा मान्सून देशांतर्गत मागणीला सर्वात मोठा धोका निर्माण करतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावर रेपो रेट वाढवण्याचा दबाव आणत अन्नधान्य चलनवाढ उच्च राहण्याची अपेक्षा आहे. तसेच एप्रिल २०२२ पासून २५० बेसिस पॉइंटने कमी झालेला रेट मागणीतील कमतरतेत मोजला जाईल. खरं तर भारत सरकारचा भांडवली खर्च काही प्रमाणात वाढीला चालना देईल, अशी अपेक्षा आहे.

हेही वाचाः पीएम मोदींचे ‘हे’ मोठे स्वप्न येत्या ४ वर्षांत पूर्ण होणार, भारत अनेक बड्या देशांना मागे टाकणार, IMF च्या गीता गोपीनाथ यांच्याकडून शिक्कामोर्तब

अर्थव्यवस्था आणि बाजारपेठेसाठी पुढे जाण्यासाठी काय महत्त्वाचे?

गुंतवणुकीची वाढ मजबूत राहिली तर निवडणुकीपूर्वी सरकारी भांडवली खर्चाच्या फ्रंट लोडिंगचा फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष २०२४ च्या पहिल्या तिमाहीत केंद्र सरकारचे भांडवल ५९ टक्क्यांनी वाढले. महत्त्वाच्या १९ राज्यांद्वारे कॅपेक्समध्ये जवळपास ७६ टक्के वाढ झाली आहे. गुंतवणुकीच्या मागणीतील गती कायम राखण्यासाठी खासगी गुंतवणुकीत सातत्यपूर्ण वाढ महत्त्वाची ठरते. केअर रेटिंगच्या अहवालानुसार, उत्पादन क्षेत्रातील क्षमतेची वापर पातळी सुधारणे आणि कॉर्पोरेट्स आणि बँकांचे निरोगी ताळेबंद हे घटक अर्थव्यवस्थेला सक्षम करीत आहेत. अर्थव्यवस्थेसाठी आणि बाजारासाठी इतर गंभीर घटक म्हणजे चांगला मान्सून पाऊस, कच्च्या तेलाच्या स्थिर किमती आणि वापर आणि गुंतवणुकीत वाढ आहेत. पुढील दशकात भारताचा ७ ते ८ टक्के दराने विकास होण्यासाठी उत्पादन क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असणे आवश्यक आहे. प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह (पीएलआय) योजनेचा लाभ अधिकाधिक कंपन्या मिळवू पाहत असल्याने उत्पादनाला चालना मिळेल, असे अनेकांना वाटते.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

भारतीय बाजारपेठा इतरांच्या तुलनेत महाग आहेत, अशी चिंता असली तरी भारत सर्वाधिक वाढीव अर्थव्यवस्थांपैकी एक असेल, अशी अपेक्षा आहे; IMF आणि जागतिक बँक या दोघांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. चलनवाढीबाबत चिंता कायम असली तरी तज्ज्ञांना वाटते की, चलनवाढ आणि व्याजदरातील घसरणीमुळे उपभोग आणि गुंतवणुकीच्या वाढीला चालना मिळू शकते. मालमत्ता वर्ग म्हणून इक्विटी १०-१५ वर्षांच्या गुंतवणुकीसाठी चांगली राहील, गुंतवणूकदारांनी मूल्यांकनाची जास्त काळजी करू नये आणि मालमत्ता वाटपावर लक्ष केंद्रित करू नये. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी सध्याच्या बाजारात एकरकमी गुंतवणुकीऐवजी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) द्वारे गुंतवणूक करण्यावर भर द्यावा, कारण ते सर्वकालीन उच्चांकावर व्यवहार करत आहे, असंही बालसुब्रमण्यम यांनी सांगितले आहे. गुंतवणूकदारांनी मिड आणि स्मॉल कॅपबाबत सावध राहावे. १ एप्रिलपासून सेन्सेक्स १३.८ टक्क्यांनी वाढल्याने मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांक अनुक्रमे ३७.४ आणि ४३ टक्क्यांनी वाढले. तज्ज्ञ म्हणतात, की गुंतवणूकदारांनी त्या जागेत गुंतवणूक करण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे आणि त्याऐवजी गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड योजनांकडे जावे, लार्ज कॅप किंवा ब्लू चिप कंपन्या किंवा मल्टी अॅसेट ऍलोकेशन फंडांमध्ये गुंतवणूक वाढवावी.

“मूल्यांकनावर आधारित लार्ज आणि मिड कॅप समभागांसाठी हिरवा सिग्नल आहे. जेव्हा ते हिरव्या रंगात असतात, तेव्हा गुंतवणूक करणे अर्थपूर्ण आहे. जोखीम परताव्याच्या दृष्टिकोनातून गुंतवणूकदारांसाठी मोठा किंवा बहु मालमत्ता वाटप निधी जमा करून ठेवणे अधिक योग्य असेल,” असंही कोटक महिंद्रा एएमसीचे एमडी नीलेश शाह म्हणाले.सध्याच्या मूल्यमापनानुसार आम्हाला वाढीची पूर्तता करावी लागणार असून, समवयस्क गटापेक्षा प्रशासनाचे मानक चांगले ठेवावे लागतील,” असंही शाह यांनी अधोरेखित केले आहे.

Story img Loader