अजय वाळिंबे

‘ग्रो अँड डिलिव्हर’ योजनेची फळे

mutual fund investment
Money Mantra Investment माझी गुंतवणूक केल्या केल्या का घसरते?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
bmc undertaken major projects some awaiting funds from state government
पालिकेच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांना राज्य सरकारच्या निधीची प्रतीक्षा,अधिमूल्यातील ५० टक्केच भाग महापालिकेला
Do you know the supply chain system that can deliver any item to your doorstep
कोणतीही वस्तू तुमच्या दारात आणून पोहोचणारी यंत्रणा तुम्हाला माहीत आहे का?
Take stringent action against those who trouble harass industries Fadnavis directs police
द्योजकांना त्रास देणाऱ्यांवर ‘मकोका’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आदेश
Chinese company DeepSeek an existential threat to America
अग्रलेख : ती ‘एआय’ होती म्हणुनी…
Financial provisions in Union Budget affect the wooden toy business in Sawantwadi
विश्लेषण : अर्थसंकल्पातील तरतूद लाकडी खेळणी उद्योगाला तारेल?
Magna opens new manufacturing facility in Chakan
मॅग्ना इंटरनॅशनलचा चाकणमध्ये उत्पादन प्रकल्प; ३०० जणांना नोकरीच्या संधी

अक्झो नोबेल इंडिया लिमिटेड (बीएसई कोड ५००७१०)
प्रवर्तक : अक्झो नोबेल एनव्ही
बाजारभाव : रु. २,२७२/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय : डेकोरेटिव्ह आणि ओद्योगिक रंग

भरणा झालेले भाग भांडवल : रु. ४५.५० कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ७४.७६
परदेशी गुंतवणूकदार २.१२
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार ९.६१
इतर/ जनता १३.५१

पुस्तकी मूल्य : रु. २७३/-
दर्शनी मूल्य : रु. १०/-
लाभांश : ७५०%

प्रति समभाग उत्पन्न : रु. ६६.०३
पी/ई गुणोत्तर : ३४.६
समग्र पी/ई गुणोत्तर : ५७.८
डेट इक्विटी गुणोत्तर : ०.०६
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: २८.३
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : २८.४
बीटा : ०.२
बाजार भांडवल : रु. १०,३४२ कोटी (मिड कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक : २,२६०/ १,६८५

अक्झो नोबेल पेंट्स म्हणजेच पूर्वाश्रमीची आयसीआय लिमिटेड. नेदरलँडसच्या अक्झो नोबेल एनव्हीची ही उपकंपनी असून ती जगातली तिसऱ्या क्रमांकाची मोठी पेंट कंपनी आहे. भारतीय कंपनीत प्रवर्तक कंपनीचा ७४.७६ टक्के हिस्सा आहे. अक्झो आपली डेकोरटिव्ह रंग उत्पादने ड्युलक्स या प्रसिद्ध ब्रॅण्डअंतर्गत विक्री करते. कंपनीची उत्पादने विविध श्रेणीत उपलब्ध असून, प्रीमियम श्रेणीत कंपनीचा बाजारहिस्सा चांगला आहे. आपले विस्तारीकरण करताना कंपनीने पेंट व्यवसायाखेरीज पुट्टी, वॉटरप्रूफिंग, वूडकेअर तसेच अधेसिव्ह इ. उत्पादनांत प्रवेश केला आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी जवळपास ६५ टक्के उत्पन्न पेंट व्यवसायापासून असून उर्वरित उत्पन्न कोटिंग व्यवसायातून आहे. वाहन उद्योग तसेच इलेक्ट्रोनिक क्षेत्रातील कोटिंग व्यवसायात अक्झो नोबेलचे स्थान लक्षणीय आहे.

व्यवसाय वृद्धीसाठी आपली उत्पादन श्रेणी वाढवतानाच कंपनीने गेल्या आर्थिक वर्षापासून ‘ग्रो अँड डिलिव्हर’ ही नवीन संकल्पना राबवयाला सुरुवात केली आहे. या संकल्पनेअंतर्गत कंपनी आपली टियर टू-थ्री शहरातील तसेच मोठ्या गावातील आपली उपस्थिती मजबूत करेल, ग्राहकांशी संवाद वाढवून त्यांच्या गरजेप्रमाणे आणि योग्य किमतीत उत्पादने पुरवेल. या व्यवसायात आपले स्थान अजून मजबूत करण्यासाठी कंपनीने डिजिटल रोड-मॅप आखला असून त्याची अंमलबजावणी योग्यरित्या होत आहे. कंपनीने आपले नेटवर्क आता ५,००० शहरांपर्यंत विस्तारले आहे. गेल्या तीन तिमाहीत कंपनीने सातत्याने उत्तम कामगिरी करून आपला बाजारहिस्सा वाढवला आहे.

गेल्या आर्थिक वर्षात उत्तम आर्थिक कामगिरी करून दाखवणाऱ्या अक्झो नोबेलचे दुसऱ्या तिमाहीचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. कंपनीने ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतच्या कालावधीत ९२६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर (गेल्या वर्षीच्या तिमाहीत ७४१ कोटी), १७ टक्के वाढीसह ६५ कोटी (गेल्या वर्षीच्या तिमाहीत ५६ कोटी) रूपयांचा नक्त नफा कमावला आहे. कच्च्या तेलाच्या किमती आता स्थिरावत असून कंपनीने तिच्या उत्पादनांच्या किमतीत देखील २१ टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. तर गेल्या वर्षीच्या सहामाहीच्या तुलनेत कंपनीने उलाढालीत ३६ टक्के वाढ साध्य करून ती १८,६३९ कोटींवर गेली आहे. कंपनीने बाजारात आणलेली नवीन उत्पादन श्रेणी तसेच ‘ग्रो अँड डिलिव्हर’ योजना याची सकारात्मक फळे आगामी कालावधीत दिसू लागतील. त्यामुळे यंदा तसेच २०२३-२४ मध्ये कंपनीची प्रगतीची घोडदौड वाढेल अशी अपेक्षा आहे.

अनुभवी प्रवर्तक, उत्तम ब्रॅंड आणि ‘ईएसजी’ तत्त्व सांभाळणारी तसेच अत्यल्प बिटा असलेली अक्झो नोबेल पेंट्स एक मध्यमकालीन गुंतवणूक म्हणून आकर्षक वाटते.

सध्याची शेअर बाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचविलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

-अजय वाळिंबे
Stocksandwealth@gmail.com

Story img Loader