ICICI Bank Introduced EMI facility For UPI Payments : UPI पेमेंट ही सर्वात सोपी पद्धत आहे. म्हणूनच आजकाल सर्व प्रकारची पेमेंट करण्यासाठी फक्त UPI अॅप्सचा वापर केला जातो. परंतु अनेक वेळा जेव्हा एखाद्या वस्तूची किंमत जास्त असते, तेव्हा ती खरेदी करण्यासाठी आपण EMI चा पर्याय निवडतो, त्यासाठी आपल्याला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डचा जुगाड करावा लागतो. पण आता तुम्ही फक्त UPI च्या माध्यमातून EMI वर वस्तू खरेदी करू शकणार आहात. खरं तर ICICI बँकेने आता UPI पेमेंट करताना QR कोड स्कॅन करून मासिक EMI वर वस्तू खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. बाय नाऊ पे लेटर या सुविधेचा वापरकर्ते लाभ घेऊ शकणार आहेत.
EMI वर इलेक्ट्रॉनिक्स, किराणा सामान, कपडे खरेदी करता येणार
UPI पेमेंटवर EMI सुविधेचा लाभ घेऊन वापरकर्ते इलेक्ट्रॉनिक्स, किराणा सामान, फॅशन, कपडे, प्रवास आणि हॉटेल बुकिंग यांसारख्या अनेक गोष्टी करू शकतात. ग्राहक १०,००० रुपयांपेक्षा जास्त व्यवहार तीन, सहा किंवा नऊ महिन्यांत सुलभ हप्त्यांमध्ये करू शकतात. पे लेटरसाठीची ईएमआय सुविधा लवकरच ऑनलाइन खरेदी करताना देखील वापरता येणार आहे.
हेही वाचाः काही मुख्यमंत्री करोडपती तर काही लखपती; जाणून घ्या एकाच क्लिकवर संपूर्ण यादी
पे लेटरवर EMI सुविधा कशी मिळवायची?
Pay Later वर EMI सुविधेचा वापर करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम दुकानाला भेट द्यावी लागेल आणि एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी QR कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला पेमेंट करण्यासाठी iMobile Pay अॅप वापरण्यासाठी स्कॅन any QR चा पर्याय निवडावा लागेल. जर तुमची रक्कम १०,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला PayLater EMI पर्याय वापरावा लागेल. मग तुम्हाला तुमच्या EMI साठी ३, ६ किंवा ९ महिने निवडावे लागतील. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पेमेंटची खातरजमा करणारा व्यवहार पूर्ण करावा लागेल.
हेही वाचाः मोठ्या खासगी बँकेने FD वरचे व्याज वाढवले, जाणून घ्या नवे दर