Ola Electric Job Layoff: ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड वाढत्या आर्थिक तोट्याला नियंत्रणात आणण्यासाठी पुन्हा एकदा नोकर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ताज्या माहितीनुसार, आता एक हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची टांगती तलवार लटकत आहे. ब्लुमबर्गच्या सूत्रांच्या माहितीनुसार, प्रोक्युरमेंट, फुलफिलमेंट, कस्टमर रिलेशन आणि चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर अशा विविध विभागातून कर्मचारी कमी केले जाणार आहेत. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, वाढते आर्थिक नुकसान रोखण्यासाठी कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते. ओला इलेक्ट्रिक गेल्या काही दिवसांपासून आर्थिक तोट्यात असून त्यांच्या शेअर्समध्येही ५ टक्क्यांची घसरण झाली असून ५२ आठवड्यातील सर्वाच निच्चांकी तळ गाठला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओला इलेक्ट्रिककडून नोकर कपात करण्याची पाच महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. याआधी नोव्हेंबर २०२३ मध्ये ५०० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला गेला. आता मार्च २०२५ मध्ये एकूण ४००० कर्मचाऱ्यांपैकी जवळपास पाऊण म्हणजेच १००० कर्मचाऱ्यांना कमी केले जाणार आहे. नोकर कपातीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. पण त्यांची माहिती सार्वजनिक केली जाणार नाही. त्यामुळे अपेक्षेपेक्षा जास्त नोकर कपात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ऑटोमेशन आणि तोटा कमी करण्याचा प्रयत्न

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओला इलेक्ट्रिक त्यांच्या ग्राहक सेवा विभागाला स्वयंचलित (ऑटोमेशन) करत आहे. या कृतीमधून कार्यक्षमता सुधारणे, खर्च कमी करणे आणि ग्राहकांना चांगला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ओलाच्या प्रवक्त्यांनी म्हटले की, आम्ही फ्रंट-एंड ऑपरेशन्सची पुनर्रचना केली असून ते ऑटोमेटेड केले आहे. यामुळे ग्राहकांनाही चांगला अनुभव मिळत असून कंपनीचा खर्चही कमी झाला आहे. दरम्यान प्रवक्त्यांनी नोकर कपातीचा निश्चित आकडा सांगितला नाही.

शोरूम आणि गोदाम कर्मचाऱ्यांवरही कुऱ्हाड

ब्लुमबर्गच्या बातमीनुसार, ओलाकडून शोरुम, सर्विस सेंटर आणि गोदामात काम करणाऱ्या विक्री आणि इतर सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही हटविले जाणार आहे. यासह कंपनी आपल्या लॉजिस्टिक आणि डिलिव्हरी प्रक्रियेतही बदल आणणार आहे. ज्यामुळे खर्चात कपात करण्याचे ओलाचे ध्येय आहे.

IPO नंतर लगातार तोटा

ओला इलेक्ट्रिकने ऑगस्ट २०२४ मध्ये IPO आणला होता. आयपीओनंतर आता ओलाच्या शेअर्समध्ये ६० टक्क्यांची घसरण झाली आहे. अनेक ग्राहकांनी ओलाच्या सर्विसबद्दल तक्रार केली होती. तसेच सोशल मीडियावरही कंपनीला ट्रोल करण्यात आले. त्यानंतर कंपनीची बाजारातील भागीदारी कमी होत गेल्याचे दिसले.