Phonepe हे भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणार्या UPI पेमेंट प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. आता कंपनीने डिजिटल कर्ज देण्यासाठी पायलट प्रोजेक्टही सुरू केला आहे. याचा अर्थ पेटीएमला थेट फटका बसणार आहे. पण तुम्हाला माहीत आहे का PhonePe कोणी सुरू केलं आहे? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, ९९,००० कोटी रुपयांच्या या कंपनीचा पाया फ्लिपकार्टच्या २ माजी कर्मचाऱ्यांनी रचला होता. PhonePe ची सुरुवात २०१५ मध्ये समीर निगम, राहुल चारी यांनी केली होती. PhonePe मोबाईल रिचार्जपासून जवळपास सर्व प्रकारचे पेमेंट सोल्यूशन्स प्रदान करते.
PhonePe ची स्थापना करण्यापूर्वी समीर निगम फ्लिपकार्ट येथील अभियांत्रिकी विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष होते. निगम हे शॉपझिला नावाच्या कंपनीत उत्पादन संचालकही (product director)राहिले आहेत. त्यांनी Mime360 नावाच्या कंपनीतही काम केले आहे. २०११ मध्ये Mime360 ही कंपनी फ्लिपकार्टने विकत घेतली होती. या अधिग्रहणानंतरच कंपनीचे कामकाज फ्लिपकार्ट पाहू लागली. समीरने द व्हार्टन स्कूलमधून एमबीए केले आहे. त्यांनी अॅरिझोना विद्यापीठातून संगणकशास्त्रात पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.
कोण आहेत राहुल चारी?
राहुल चारी हे PhonePe चे सहसंस्थापक आहेत. ते सध्या PhonePe चे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी आहेत. चारी, ज्यांना दोन दशकांहून अधिक काळ अनुभव आहे, त्यांनी PhonePe ला खूप उंचीवर नेण्यात मोलाचे योगदान दिले आहे. PhonePe लॉन्च होण्यापूर्वी चारी फ्लिपकार्टमध्येही काम करीत होते. चारी हे फ्लिपकार्टचे अभियांत्रिकी उपाध्यक्ष होते. Flipkart पूर्वी चारी Mime360 मध्ये काम करत असे. फ्लिपकार्टने ही कंपनी ताब्यात घेतल्याने तेही फ्लिपकार्टमध्ये आले होते. चारी यांनी सिस्को सिस्टीम्समध्येही काम केले आहे. बॉम्बे विद्यापीठात संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या चारी यांनी अमेरिकेतील प्रड्यू विद्यापीठातून संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
हेही वाचाः RBI कडून मोठा दिलासा, आता EMI वाढणार नाही, व्याजदर जैसे थेच
PhonePe डिजिटल कर्जामध्ये पाऊल टाकणार
PhonePe चे CEO समीर निगम म्हणतात की, कंपनीने डिजिटल कर्ज देण्यासाठी पायलट प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे. या क्षेत्रात कंपनी विजय शेखर शर्मा यांच्या पेटीएमशी स्पर्धा करेल. कंपनी लवकरच NBFC च्या परवान्यासाठी अर्ज करेल.
कंपनीचे ९९,००० कोटी रुपयांचे मूल्यांकन
PhonePe ला या वर्षी ३५० दशलक्ष डॉलर निधी मिळाला आहे. कतार गुंतवणूक प्राधिकरण, मायक्रोसॉफ्ट, टेनसेंट आणि टायगर ग्लोबल यांनी या फंडिंग फेरीत भाग घेतला आणि ९९,००० कोटी रुपयांचे मूल्यांकन गृहीत धरून PhonePe ला निधी दिला. कंपनीचे सीईओ समीर निगम म्हणतात की, जेव्हा कंपनी फायदेशीर होईल तेव्हाच ते आयपीओ आणण्याचा विचार करतील.
हेही वाचाः ऐकावं ते नवलच! ४४ कोटींची लॉटरी जिंकली, पण कॉल करणाऱ्याला फेक समजून केलं ब्लॉक आणि मग…