१९ नोव्हेंबर २०२१ रोजी ६० वर्षीय चंद्रा शेट्टी त्यांची पत्नी सुमती शेट्टी आणि मुलगी दीक्षिता शेट्टी यांच्यासह इंडिगोची फ्लाइट पकडण्यासाठी बंगळुरूच्या केम्पागौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते. विमानतळावर पोहोचताच चंद्रा शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागले. पत्नीने तात्काळ इंडिगोच्या कर्मचाऱ्यांकडे मदत मागितली, मात्र वेळीच मदत न मिळाल्याने चंद्रा शेट्टी यांचा मृत्यू झाला. आता या प्रकरणी ग्राहक न्यायालयाने बंगळुरू विमानतळ प्रशासन आणि इंडिगोला १२ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे संपूर्ण प्रकरण?

२०२१ मध्ये चंद्रा शेट्टी आपल्या कुटुंबासह मंगळुरूला जाण्यासाठी बंगळुरूच्या केम्पागौडा विमानतळावर पोहोचले. त्यांच्याकडे इंडिगो एअरलाइन्सचे तिकीट होते. विमानतळावर चेक इन केल्यानंतर अचानक चंद्रा शेट्टी यांची प्रकृती ढासळू लागली. ते बेशुद्ध होऊन जमिनीवर पडले. पत्नी आणि मुलीने इंडिगोच्या ग्राऊंड स्टाफकडे व्हीलचेअर मागितली, जेणेकरून त्यांना वेळेवर हॉस्पिटलमध्ये नेता येईल. इंडिगो आणि विमानतळ कर्मचाऱ्यांकडून वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: युरोपियन सेंट्रल बँकेची गोल्डमन सॅक्सवर कठोर कारवाई, माहिती लपविल्याबद्दल ठोठावला ७२ लाख डॉलरचा दंड

विमान कंपनी आणि विमानतळ कर्मचाऱ्यांकडून वेळेवर मदत न मिळाल्याने त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत, त्यामुळेच चंद्रा शेट्टी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यांनी इंडिगो आणि विमानतळावर गुन्हा दाखल केला आणि प्रकरण ग्राहक न्यायालयात पोहोचले. न्यायालयाने विमान कंपनी आणि विमानतळाला फटकारले आणि कुटुंबाला १२ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश दिले. न्यायालयाने नाराजी व्यक्त करत प्रवाशांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही विमानतळ प्रशासनाची जबाबदारी असल्याचे सांगितले.

हेही वाचाः सरकारने पेट्रोलियम क्रूडवरील विंडफॉल टॅक्स आणला शून्यावर, तेल कंपन्यांना मोठा दिलासा