बाजारातील चढ-उतार आता नेहमीच पाहायला मिळतात. कधी कधी बाजारातील अनिश्चितता एवढी वाढते की अनेक गुंतवणूकदारांचे नुकसानही होते. बाजार वाढला असला तरी घसरणही लागलीच होते. दीर्घकालीन गुंतवणुकीत बाजारातील जोखीम कव्हर केली जात असली तरी अनेक गुंतवणूकदार शेअर बाजारातील वाढ आणि घसरणीची जोखीम अजिबात घेऊ इच्छित नसतात. अशा गुंतवणूकदारांसाठी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे, ज्यामध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक ठेवण्यावर चक्रवाढीचा लाभ देखील मिळतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

म्युच्युअल फंडातील परतावादेखील इक्विटीइतका जास्त असू शकतो, तर शेअर्समध्ये थेट पैसे गुंतवण्यापेक्षा ते अधिक सुरक्षित आहेत. सिस्टीमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय मार्ग आहे. जर तुम्ही १५ वर्षे गुंतवणुकीसाठी तयार असाल तर SIP ची मदत घेऊन करोडपती होणे शक्य आहे का? या संदर्भात ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओसवाल यांनी त्यांच्या वेबसाइटवर १५x१५x१५ नियम किंवा धोरणाची माहिती दिली आहे, ज्याद्वारे तुम्ही जवळपास १ कोटींचा निधी उभारू शकता. फायनान्शिअल एक्सप्रेसने यासंदर्भात माहिती दिली आहे.

हेही वाचाः परमिंदर चोप्रा यांची पीएफसी अध्यक्ष अन् एमडी म्हणून निवड; महारत्न एनबीएफसीच्या प्रमुखपदी पहिल्यांदाच महिला

१५x१५x१५ नियम काय आहे?

जर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी एसआयपी करण्यास तयार असाल आणि १ कोटी निधी बनवण्याचे लक्ष्य असेल, तर म्युच्युअल फंडातील १५x१५x१५ चा नियम तुमचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नियमाचा अर्थ असा आहे की, १५ वर्षांपर्यंत अशा योजनेत दरमहा १५,००० रुपये गुंतवले पाहिजेत, ज्यामध्ये वार्षिक १५ टक्के व्याज मिळत असेल, तर मॅच्युरिटीवर तुमचा निधी ७ अंकांमध्ये असला पाहिजे म्हणजेच तो १ कोटी रुपये झाला पाहिजे. तुमची एकूण गुंतवणूक फक्त २७ लाख रुपये असेल. म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला सुमारे ७३ लाख रुपयांचा नफा मिळणार आहे. दुसरीकडे तुम्ही पुढील १५ वर्षे अशीच गुंतवणूक करत राहिल्यास तुमचा निधी १० कोटी रुपयांपर्यंत वाढेल.

हेही वाचाः टीसीएसने तेजस नेटवर्कला ‘इतक्या’ कोटी रुपयांची दिली ऑर्डर; कंपनी BSNL ला 4G/5G उपकरणे पुरवणार

१५ वर्षांच्या कार्यकाळावर

दरमहा SIP: १५,००० रुपये
कार्यकाळ: १५ वर्षे
अपेक्षित परतावा: १५ टक्के प्रतिवर्ष
मुदतपूर्तीवर निधी: १ कोटी

कार्यकाळ १५ वर्षांनी वाढवल्यास

दरमहा SIP: १५,००० रुपये
एकूण कार्यकाळ: ३० वर्षे
अपेक्षित परतावा: १५ टक्के प्रतिवर्ष
मुदतपूर्तीवर निधी: १० कोटी

चक्रवाढीचा लाभ मिळणार

१५x१५x१५ नियमाचा मुख्य उद्देश चक्रवाढ शक्तीचा फायदा घेणे हा आहे. हे एका लहान मासिक गुंतवणुकीचे मोठ्या निधीत रूपांतर करू शकते. पण जर तुम्हाला चक्रवाढीचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात करावी लागेल आणि दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवावे लागेल. गुंतवणूक जितकी जास्त वेळ ठेवली जाईल, तितका तुम्हाला चक्रवाढीचा लाभ मिळेल.

समजा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून SIP (सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) निवडली आहे. तुमची मालमत्ता खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठी तुम्ही १० टक्के गृहित व्याजदराने १० वर्षांसाठी ५००० रुपयांची मासिक SIP सुरू केली आहे. तुम्ही गुंतवलेली एकूण रक्कम १० वर्षांत ६ लाख रुपये असेल. ज्यावर ४,३२,७६० रुपयांचा परतावा मिळेल. म्हणजेच तुमच्याकडे मॅच्युरिटीवर १०,३२,७६० चा निधी मिळेल. तुम्ही पुढील १० वर्षांसाठी त्याच व्याजदराने त्याच योजनेत पुन्हा गुंतवणूक करत राहिल्यास २० वर्षांनंतर तुम्हाला ३० लाख रुपये मिळतील. विशेष म्हणजे यात तुम्हला कंपाऊंडिंगच्या शक्तीचा फायदा मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 crore fund then use the formula of 15 x 15 x 15 in mutual fund and then see vrd