Income Tax Refund: अनेक करदाते मुदतीच्या तारखेपूर्वी प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवर त्यांचे विवरणपत्र सादर करतात. परंतु बऱ्याचदा ते त्याची पडताळणी करायला विसरतात. नियमांनुसार सर्व आयटीआर फाइलर्सना त्यांचे रिटर्न ३० दिवसांच्या आत पडताळणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे करदात्याचा आयटीआर पडताळण्यात अयशस्वी झाल्यास तो रिटर्न प्रक्रियेसाठी घेतला जात नाही आणि परिणामी कर परतावा जारी केला जाऊ शकत नाही.

३१ लाख लोकांनी पडताळणी केलेली नाही

आयटीआर पडताळणी ही एक सोपी प्रक्रिया आहे, जी ऑनलाइन रिटर्न फाइल केल्यावर जास्त वेळ न घेता काही मिनिटांमध्ये करता येते. २३ ऑगस्टपर्यंतच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, ३१ लाखांहून अधिक करदात्यांनी त्यांच्या परताव्याची पडताळणी करणे बाकी आहे. प्राप्तिकर वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, २३ ऑगस्टपर्यंत ६.९१ कोटी रिटर्न भरले गेले आहेत, परंतु करदात्यांनी केवळ ६.५९ कोटी रिटर्नची पडताळणी केली आहे. रिटर्न व्हेरिफिकेशनची ३० दिवसांची मुदत काही दिवसांत संपणार असल्याने प्राप्तिकर विभागाने ट्विटरवर सावधगिरीने ते लवकरात लवकर पूर्ण करण्याचा इशारा दिला.

Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Singh said Modi treated Maharashtra like step mother running 2 lakh crore projects in Gujarat
“पंतप्रधान मोदी यांची महाराष्ट्राला सावत्र वागणूक,” संजय सिंह यांचा आरोप
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
indian rupee falls to all time low against us dollar
अग्रलेख : काका… मला वाचवा!
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
Loksatta explained What is the reason for the dissatisfaction of gig workers
‘गिग’ कामगारांनी साजरी केली ‘काळी दिवाळी’! त्यांच्या असंतोषाचे कारण काय? सामाजिक सुरक्षेचा लाभ किती?
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका

हेही वाचाः भारतात यंदा गेल्या ८ वर्षांतील सर्वात कमी पाऊस पडण्याची भीती; साखर, डाळी अन् भाज्यांचे भाव वाढण्याची शक्यता

आयटी विभागाने काय म्हटले?

आयटी विभाग म्हणाला, “प्रिय करदात्यांनो, तुमची ई-फायलिंग प्रक्रिया आजच पूर्ण करा! फाइल केल्याच्या ३० दिवसांच्या आत तुमच्या ITR ची पडताळणी करायला विसरू नका. प्राप्तिकर कायदा १९६१ च्या तरतुदींनुसार विलंबित पडताळणीसाठी विलंब शुल्क लागू शकते. उशीर करू नका, आजच तुमचा आयटीआर पडताळणी करू शकता. ITR ची पडताळणी न केल्याने केवळ परताव्यात विलंब होत नाही, तर ३० दिवसांच्या समाप्तीनंतर असा परतावा अवैध ठरतो.

हेही वाचाः व्याजदर वाढीमुळे बँकांना मोठा फायदा, ठेवींची वाढ अनेक वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचली

ITR पडताळणी कशी करावी?

तुम्ही तुमचा आयटीआर ओटीपी, नेटबँकिंग आणि ऑफलाइनद्वारेही आधारशी नोंदणीकृत मोबाइलवर सहजपणे पडताळू शकता. आधार ओटीपीद्वारे ई-पडताळणीसाठी तुम्ही ई-फायलिंग पोर्टलवर लॉग इन केले पाहिजे आणि ई-फाइल टॅब अंतर्गत ‘ई-व्हेरिफाय रिटर्न’ वर क्लिक करावे. येथे तुम्ही ई-व्हेरिफिकेशन मोड निवडू शकता आणि प्रक्रिया पूर्ण करू शकता.