• अंशुल आरझारे

आरोग्य आणि शिक्षणाप्रमाणेच गुंतवणूक हेसुद्धा एक महत्त्वाचे जीवन कौशल्य आहे, जे एखाद्याच्या आर्थिक भविष्याला आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. आनंदाची गोष्ट म्हणजे कोरोना साथीच्या आजारानंतर जगभरातील तरुण गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आपण पाहिले आहे. २०२२-२०२३ दरम्यान एकूण म्युच्युअल फंड फोलिओपैकी एक चतुर्थांश फंडामध्ये २५ ते ३५ वयोगटातील तरुणांनी गुंतवणूक केल्याचंही समोर आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बऱ्याचदा जास्त परताव्याच्या आमिषापायी तरुण गुंतवणूकदार अनेकदा इंट्राडे ट्रेडिंग, स्कॅल्पिंग, पोझिशनल ट्रेडिंग आणि क्रिप्टोकरन्सी यांसारख्या अल्पकालीन पर्यायांवर विश्वास ठेवतात. जागतिक संशोधन अहवालांनुसार, जनरल झेड ब्रिगेडमध्ये ५४ टक्के क्रिप्टो गुंतवणूकदार आहेत.

सगळ्याला एका योजनेपासून सुरुवात होते

खरं तर तुमची जीवन उद्दिष्टे परिभाषित करणे महत्त्वाचे आहे, योजनेमुळे तुमच्या गुंतवणुकीची उद्दिष्टे स्पष्ट होण्यास मदत मिळते. तसेच स्टॉक, बाँड, चलन, कमोडिटीज, रिअल इस्टेट, सोने आणि इतर मालमत्ता वर्गांमध्ये गुंतवणूक करण्याच्या पर्यायांचा फायदा घेण्यास मदत करणार आहे. चांगली संशोधन केलेली योजना जीवनातील महत्त्वाचे टप्पे, जसे की, उत्पन्न आणि निव्वळ संपत्ती, कर्जाचे हप्ते आणि आपत्कालीन पैसे यांसारख्या अनिवार्य जबाबदाऱ्या आणि जोखीम घेण्याची क्षमता यांवर अवलंबून असते.

हेही वाचाः Money Mantra : चेकवर सही करताना ‘या’ १० चुका टाळा अन्यथा मोठे नुकसान

जोखीम टाळण्यासाठी गुंतवणुकीत विविधता आणा

जोखीम परताव्याची अनिश्चितता दर्शवते. कमी जोखीम योजना तुलनेने कमी उत्पन्न देतात, परंतु बाजारातील चढउतारांचा त्यांना धोकाही कमी असतो. उच्च जोखीम योजना उच्च परताव्याची क्षमता प्रदान करतात, परंतु उच्च अस्थिरतादेखील देतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फक्त १० टक्के भारतीय गुंतवणूकदारांकडे वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ आहेत. खरं तर ही बाब धोकादायक आहे. वाढ आणि स्थैर्य यांचा समतोल राखण्यासाठी एखाद्याने बॉण्ड्स सारख्या स्थिर उत्पन्न गुंतवणुकीचे आणि इक्विटी यांसारख्या मध्यम ते उच्च जोखीम गुंतवणुकीचे न्याय्य मिश्रण केले पाहिजे. म्हणजे त्यांनी थोडी थोडी गुंतवणूक दोन्ही पर्यायांत करायला हवी.

हेही वाचाः केंद्राकडून लॅपटॉप अन् टॅबलेट आयातीवर ‘या’ तारखेपर्यंत बंदी नाही, मोदी सरकारचा नवा आदेश वाचा

गुंतवणुकीचा दीर्घकालीन विचार करा

दीर्घकालीन गुंतवणूक ही कालांतराने शाश्वत संपत्ती निर्माण करण्यासाठी एक प्रभावी धोरण आहे. अल्पकालीन गुंतवणूक कमी कालावधीद्वारे जलद नफ्यावर लक्ष केंद्रित करतात. काही गुंतवणूकदारांची त्यांची गुंतवणूक केवळ २-३ वर्षांच्या कालावधीसाठी ठेवण्याचा कल असतो, जो लक्षणीय परतावा मिळविण्यासाठी पुरेसा नसतो. परंतु जर गुंतवणूक मूलभूतपणे चांगली असेल, तर दीर्घकालीन फायदा मिळत राहतो.

गुंतवणूक करण्यापूर्वी महत्त्वाच्या गोष्टी ‘जाणून घ्या’

कोणत्याही मालमत्ता वर्गाला निधी देण्याआधी त्याची गतिशीलता समजून घेतली पाहिजे. संशोधन अहवाल आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार प्रत्येक मालमत्ता वर्गाच्या साधक आणि बाधकांचा अभ्यास करणे अत्यावश्यक आहे. ऐकीव किंवा कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावावर गुंतवणूक करू नका. खरं तर काही नावाजलेल्या गुंतवणूकदारांनी परिचित क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करून उल्लेखनीय यश मिळवले आहे. जर तुम्हाला तुमची गुंतवणूक माहीत असेल तर तुम्हाला त्यांच्याशी संबंधित हालचालींचीही चांगली समज असणे आवश्यक आहे. ती गुंतवणुकीची योजना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतल्यास गुंतवणुकीवर थेट परिणाम न करणार्‍या विविध घटकांमुळे उद्भवणार्‍या अल्प मुदतीच्या अस्थिरतेला टाळता येणे शक्य होणार आहे.

…तर तज्ज्ञांची मदत घ्या

गुंतवणूक म्हणजे जोखीम समजून घेऊन परताव्याचा पाठलाग करणे आहे. यामध्ये मालमत्ता वर्गांमध्ये विविधता, जोखीम परतावा समजून घेणे, मालमत्ता वर्गांशी संबंधित तरलता आणि तुमच्या गुंतवणुकीसह खर्च करण्याबरोबरच आवश्यक असलेल्या वेळेचे महत्त्व यांचा समावेश आहे. हे एक जटिल मिश्रण आहे आणि म्हणूनच गुंतवणूक करताना तज्ज्ञांची मदत घेणे नेहमीच फायदेशीर ठरते. खरं तर वर नमूद केलेले पाच मंत्र तरुण गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीवर शाश्वत परतावा मिळवून देण्यास मदत करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे, ज्यामुळे तुम्ही तुमचे दीर्घकालीन व्यवस्थापन करू शकता.

(हा लेख अंशुल आरझारे यांनी लिहिला आहे. एमडी आणि सीईओ, येस सिक्युरिटीज, त्यांनी व्यक्त केलेली मते ही त्यांची वैयक्तिक आहेत)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 essential investment mantras for young investors follow today and get rich vrd
Show comments