जर तुम्ही नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. काही वर्षातच तुम्हाला ऑनलाइन होर्डिंग्स (Digital Hoardings Business)च्या व्यवसायातून लाखोंची कमाई सुरू होऊ शकते. डिजिटलच्या काळात ऑनलाइन होर्डिंग्सचा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर सौदा ठरू शकतो. या व्यवसायातून अनेक होर्डिंग्स कंपन्यांची कोट्यवधी रुपयांची कमाई होत आहे. तुम्ही ऑनलाइन होर्डिंगचा व्यवसाय कसा सुरू करू शकता (How to start a hoarding business in India) आणि त्यात किती कमाई केली जाऊ शकते हे जाणून घेऊयात.
आउटडोअर अॅडव्हर्टायझिंग स्टार्टअप कंपनी GoHoardings.Com (Gohoardings.com) च्या संस्थापक दीप्ती अवस्थी शर्मा सांगतात की, २०१६ मध्ये त्यांनी फक्त ५०,००० रुपयांपासून डिजिटल होर्डिंगचा व्यवसाय सुरू केला. ही कल्पना यशस्वी झाली आणि अल्पावधीतच कमाई सुरू झाली. डिजिटल होर्डिंग्सचा व्यवसाय सुरू करण्यामागचे कारण सांगताना त्या म्हणतात, “जेव्हा मी यावर संशोधन केले, तेव्हा मला कळले की हे क्षेत्र अतिशय असंघटित पद्धतीने काम करीत आहे आणि या डिजिटल जगात लोकांना सर्व काही घरी बसून हवे आहे. अशा स्थितीत हा व्यवसाय अतिशय फायदेशीर व्यवहार वाटत होता.
हेही वाचाः विश्लेषण : गुंतवणुकीचे पर्याय शोधत आहात? म्युच्युअल फंड देऊ शकतात चांगला फायदा
व्यवसाय कसा सुरू करायचा ते शिका
मार्केटिंग आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे काम सुरू करता येईल, यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या डोमेन नावाने वेबसाइट तयार करायची आहे. त्याचा स्वतःच प्रचार करावा लागतो. होल्डिंग्समध्ये जाहिरातही ऑनलाइन दिली जाऊ शकते. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला काही होर्डिंग्सची जागा भाड्याने घ्यावी लागेल. मग तुम्ही मोठ्या कंपन्यांशी संपर्क साधून त्यांच्या जाहिराती येथे देऊ शकता. जर तुम्हाला कॉम्प्युटर डिझायनिंग किंवा ग्राफिक्सचे ज्ञान असेल तर तुम्ही डिजिटल होल्डिंगचा व्यवसाय सहज सुरू करू शकता. या व्यवसायासाठी तुम्हाला ऑनलाइन प्रमोशन करावे लागेल, त्यानंतर तुम्ही ऑनलाइन ऑर्डर प्राप्त करून पैसे कमवू शकता.
दीप्ती यांची कंपनी असे काम करते
सर्वप्रथम ग्राहकाला GoHoardings.com या वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल. यानंतर वेबसाइटला भेट देऊन तुम्हाला तुमचे स्थान (जेथे होर्डिंग लावायचे आहे) शोधावे लागेल आणि निवडावे लागेल. स्थान निवडल्यानंतर कंपनीला एक मेल पाठविला जातो. त्यानंतर कंपनीकडून साइट आणि स्थानाच्या उपलब्धतेची खातरजमा केली जाते, त्यानंतर ग्राहकांकडून ऑर्डर येतात. लोकेशन साइटवर लाइव्ह जाण्यासाठी आयडी आणि पासवर्ड दिला जातो. ही कंपनी एका महिन्याच्या कालावधीसाठी होर्डिंग लावण्यासाठी सुमारे १ लाख रुपये घेते.