करदात्याला विविध प्रसंगांत पैसे, मालमत्ता किंवा भेटवस्तू घ्यावी किंवा द्यावी लागते. अशा या ‘भेटी’कडे प्राप्तिकर कायद्यातून कशा प्रकारे बघितले जाते? करदात्याच्या मनात एक अतिशय सामान्य आणि वारंवार येणारा प्रश्न म्हणजे याची करपात्रता. प्राप्तिकर कायद्यात कोणते व्यवहार भेट म्हणून समजले जातात हे समजून घेतले पाहिजे. कारण प्राप्तिकर कायद्यात ‘भेट’ याची व्याख्या केलेली नाही. प्राप्तिकर कायद्यानुसार कोणत्याही मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने संपत्तीची देवाण-घेवाण करणे म्हणजे भेट असे समजले जाते. एखाद्या व्यक्तीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संपत्ती दुसऱ्याच्या नावाने मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्याने हस्तांतरित केली, तर त्यावर प्राप्तिकर आकारला जाऊ शकतो.

भेटीद्वारे दुसऱ्याच्या नावाने संपत्ती हस्तांतरित करून आपले करदायित्व अवैध रीतीने कमी करणाऱ्या व्यवहारांवर आळा घालण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात काही तरतुदी आहेत. करदात्याने असे व्यवहार टाळले पाहिजेत. प्राप्तिकर कायदा कलम ‘५६’नुसार मोबदल्याशिवाय किंवा अपुऱ्या मोबदल्यात हस्तांतरित केलेली संपत्ती हे संपत्ती स्वीकारणाऱ्याला ‘इतर उत्पन्न’ या उत्पन्नाच्या स्रोताखाली करपात्र आहे. कोणत्या भेटी करपात्र आहेत आणि कोणत्या करमुक्त हे समजून घेतले पाहिजे. तसेच अशा काही व्यवहारांवर उत्पन्नाच्या ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होतात त्यामुळे असे व्यवहार जाणीवपूर्वक केले पाहिजेत. तीन प्रकाराने मिळालेल्या संपत्तीवर करदात्याला कर भरावा लागू शकतो.

Human life, High Court, compensation, mumbai,
तुटपुंजी भरपाई देण्याएवढा माणसाचा जीव स्वस्त नाही – उच्च न्यायालय
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
sebi taken various steps to encourage the dematerialization of shares print
‘डिमॅट’ अनिवार्य करण्याचा विचार : सेबी
Nitin Gadkar
सुरक्षित प्रवासासाठी केंद्राचा मोठा निर्णय! नितीन गडकरींनी उघडली सरकारची तिजोरी, अपघातग्रस्तांची मदत करणाऱ्यांना बक्षीस
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
survey licenses for qualified hawkers are stalled
पिंपरी : डिजिटल स्वाक्षरीअभावी दोन वर्षांपासून परवान्यांंचे वितरण रखडले
maharashtra FASTag mandatory all vehicles
विश्लेषण : राज्यात १ एप्रिलपासून सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक… नेमके काय होणार?

हेही वाचा – टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी आहे?

करपात्र भेटी

१. रोखीने (यात रोख रक्कम, धनादेश (चेक), बँकेच्या माध्यमातून निधी हस्तांतरण यांचा समावेश होतो) मिळालेल्या भेटीची एकूण रक्कम ५०,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर ती करपात्र उत्पन्नात गणली जात नाही. ५०,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम रोखीने मिळाल्यास संपूर्ण रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते.

२. स्थावर मालमत्ता (यात घर, जमीन, वगैरेचा समावेश होतो) कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळाल्यास आणि मुद्रांक शुल्काच्या मूल्यांकनानुसार मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर संपूर्ण मूल्य करपात्र आहे. मालमत्ता अपुऱ्या मोबदल्यात मिळाली असेल आणि मुद्रांक शुल्काच्या मूल्यांकनानुसार असणारे मूल्य हे मोबदल्यापेक्षा (अ) ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल आणि (ब) मोबदल्याच्या १० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी (‘अ’ आणि ‘ब’मधील जी रक्कम अधिक आहे ती) रक्कम उत्पन्नात गणली जाते.

३. ठरावीक जंगम मालमत्ता (यात सोने, चांदी, दागिने, चित्रे, शिल्पे, वगैरेचा समावेश होतो) कोणत्याही मोबदल्याशिवाय मिळाल्यास आणि त्याचे वाजवी बाजार मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल, तर संपूर्ण मूल्य करपात्र आहे. मालमत्ता अपुऱ्या मोबदल्यात मिळाली असेल आणि मोबदला हा वाजवी बाजार मूल्यापेक्षा कमी असेल आणि हा फरक ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असेल तर या फरकाएवढी रक्कम उत्पन्नात गणली जाते.

करमुक्त भेटी

१. भेटी (रोख, स्थावर किंवा जंगम मालमत्तेच्या स्वरूपात) ठरावीक नातेवाईकांकडून मिळाल्यास त्या करपात्र उत्पन्नात गणल्या जात नाहीत. या रकमेला कोणतीही मर्यादा नाही, ठरावीक नातेवाईकांमध्ये पती/पत्नी, आई/वडील, भाऊ/बहीण, पती किंवा पत्नीचा भाऊ किंवा बहीण (आणि त्यांचे पती/पत्नी), आई किंवा वडिलांचा भाऊ किंवा बहीण (आणि त्यांचे पती/पत्नी) आणि वंशपरंपरेतील व्यक्ती यांचा समावेश होतो.

२. एखाद्या व्यक्तीला त्याच्या लग्नप्रसंगात भेटी मिळाल्या असतील तर त्या करपात्र नसतील. या भेटी ठरावीक नातेवाईकांकडून किंवा इतरांकडून मिळाल्या असल्या तरी करमुक्त असतील.

३. एखाद्या करदात्याला वारसाहक्काने किंवा मृत्युपत्राद्वारे कोणतीही संपत्ती मिळाल्यास ती मिळालेली संपत्ती करपात्र उत्पन्नात गणली जात नाही.आता प्रश्नोत्तराकडे वळूया

प्रश्न : मला माझ्या एका मित्राने ७५,००० रुपये आणि परदेशात राहणाऱ्या सख्ख्या भावाने १,२५,००० रुपये माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने पैसे भेट म्हणून दिले. मला या भेटीवर कर भरावा लागेल का?

– किरण दिवेकर

उत्तर : ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी या करमुक्त आहेत, ठरावीक नातेवाईकांमध्ये सख्ख्या भावाचा समावेश होतो. त्यामुळे भावाकडून मिळालेल्या भेटीवर कर भरावा लागणार नाही. मित्र हा ठरावीक नातेवाईकांच्या व्याख्येत येत नाही आणि वाढदिवसाचा प्रसंग हा करमुक्त भेटीसाठी पात्र नसल्यामुळे आणि मित्राकडून मिळालेली भेट ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे संपूर्ण रक्कम ७५,००० रुपये, आपल्या करपात्र उत्पन्नात गणली जाईल आणि आपल्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे त्यावर कर भरावा लागेल.

हेही वाचा – बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ

प्रश्न : मी पुण्यात एक सदनिका खरेदी करत आहे, त्याचा मोबदला (करारमूल्य) ८५ लाख रुपये आहे आणि मुद्रांक शुल्कानुसार त्या सदनिकेचे बाजारमूल्य ९५ लाख रुपये आहे. मला प्राप्तिकर कायद्यानुसार काय करावे लागेल?

– श्रीकांत कदम

उत्तर : जर एखाद्या व्यक्तीने स्थावर मालमत्ता खरेदी केली आणि मालमत्तेचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य, मोबदल्यापेक्षा ५०,००० रुपयांपेक्षा जास्त आणि मोबदल्याच्या १० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तर मालमत्ता खरेदी करणाऱ्याला दोन्हीच्या फरकाएवढी रक्कम ‘इतर उत्पन्न’ म्हणून करपात्र असेल. आपल्या बाबतीत, सदनिकेचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य, मोबदल्यापेक्षा १० लाख (९५ लाख रुपये वजा ८५ लाख रुपये) रुपयांनी जास्त आहे आणि ते मोबदल्याच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच ८,५०,००० रुपयांपेक्षा (८५ लाख रुपयांच्या मोबदल्याच्या १० टक्के) अधिक आहे. १० लाख रुपये हे तुमचे ‘इतर उत्पन्न’ मानले जाईल आणि आपल्याला आपल्या उत्पन्नाच्या टप्प्याप्रमाणे यावर कर भरावा लागेल. याचा दुसरा मुद्दा असा आहे की, आपल्याला उद्गम कर कापताना सदनिकेचे मुद्रांक शुल्कानुसार मूल्य आणि मोबदला यामधील जी रक्कम जास्त आहे, त्यावर उद्गम कर कापावा लागेल. सदनिकेची विक्री करणाऱ्याला मोबदला जरी आपल्याला ८५ लाख रुपये द्यावयाचा असला तरी उद्गम कर ९५ लाख रुपयांवर १ टक्के इतका कापावा लागेल जर सदनिका विक्री करणारा ‘निवासी भारतीय’ असेल तर.

प्रश्न : मी या वर्षी सेवानिवृत्त झालो आणि मला मिळालेल्या निवृत्ती लाभातून मी २५ लाख रुपये माझ्या पत्नीला दिले आणि तिच्या नावाने ते पैसे मी मुदत ठेवीत गुंतविले. पत्नीला दिलेल्या रकमेवर तिला कर भरावा लागेल का?- विनीत खारगे

उत्तर : ठरावीक नातेवाईकांकडून मिळालेल्या भेटी करमुक्त आहेत. त्यामुळे आपण पत्नीला दिलेल्या २५ लाख रुपयांवर पत्नीला कर भरावा लागणार नाही, परंतु यावर उत्पन्नाच्या ‘क्लबिंग’च्या तरतुदी लागू होतील. या तरतुदीनुसार मोबदल्याशिवाय मिळालेल्या संपत्तीतून पत्नीला मिळालेले व्याजाचे उत्पन्न हे भेट देणाऱ्यालाच, म्हणजे आपल्यालाच, करपात्र असेल.

प्रश्न : माझ्या लग्नात मला आणि माझ्या आई-वडिलांना अनेक भेटी मिळाल्या. काही भेटी रोख स्वरूपात आहेत तर काही दागिन्यांच्या स्वरूपात आहेत. या भेटींवर आम्हाला कर भरावा लागेल का?

– एक वाचक

उत्तर : प्राप्तिकर कायद्याप्रमाणे स्वतःच्या लग्नात मिळालेल्या भेटी करमुक्त आहेत. त्या कोणत्याही स्वरूपात म्हणजेच, घर, जमीन, सोने, रोख रक्कम, वगैरे स्वरूपात असल्या तरी त्या करमुक्त आहेत. तसेच त्या ठरावीक नातेवाईकांकडून, इतर नातेवाईकांकडून, मित्रांकडून मिळाल्या असल्या तरी त्या करमुक्त आहेत. परंतु स्वतःच्या व्यतिरिक्त इतरांच्या (मुलगा, मुलगी, वगैरे) लग्नात मिळालेल्या भेटी मात्र करपात्र असतील. त्यामुळे तुमच्या आई-वडिलांना मिळालेल्या भेटी त्यांना करपात्र असतील. यासाठी आई-वडिलांना त्यांना मिळालेल्या भेटींचे वर्गीकरण करावे लागेल. त्यांच्या ठरावीक नातेवाईकांकडून (पती/पत्नी, आई/वडील, भाऊ/बहिण, पती किंवा पत्नीचा भाऊ, वगैरे) मिळालेल्या भेटी पूर्णपणे करमुक्त असतील. याव्यतिरिक्त व्यक्तींकडून मिळालेल्या भेटी, एकूण ५०,००० रुपयांपेक्षा जास्त असतील तर, संपूर्ण रक्कम करपात्र असेल आणि एकूण ५०,००० रुपयांपेक्षा कमी असतील तर त्या करपात्र असणार नाहीत.

pravindeshpande1966@gmail.com

Story img Loader