दुसरा अंबानी अशी म्हणून बाजाराने या व्यक्तीला पदवी बहाल केली होती. साधारण १९८० चा तो काळ होता. लुधियानातून आलेल्या या व्यक्तीने अल्पकाळ मुंबई शेअर बाजारावर राज्य केले होते. पण शेवटी तो अल्पकाळच ठरला. त्या व्यक्तीचे नाव होते अभय ओसवाल.

ओसवाल ॲग्रो लिमिटेड ही कंपनी १९७९ साली स्थापन झाली. एकामागोमाग एक एकएका कंपनीचे शेअर्स बाजारात येऊ लागले. संख्या मोठी कंपन्यांचीही नावेही भरपूर. पुन्हा नावामध्ये बदल करणे हासुद्धा एक खेळ होता. बिंदल ॲग्रो केम ही पुढे नंतर ५ सप्टेंबर १९९५ ला ओसवाल केमिकल्स ॲण्ड फर्टिलायझर लिमिटेड झाली. तर २१ ऑक्टोबर २०११ ला ती ओसवाल ग्रीन टेक लिमिटेड झाली.

US central bank Federal Reserve cuts interest rates market
बाजार रंग : बाजाराचा उत्साह टिकेल का?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
risk of heart disease is increasing at a young age
कमी वयातच हृदयविकाराचा वाढतोय धोका! तो कसा ओळखावा जाणून घ्या…
Anna Sebastian Perayil, EY,
शहरबात… ॲनाच्या मृत्यूच्या निमित्ताने…
death of youth, procession, Vadgaon Sheri, Pune,
पुणे : मिरवणुकीत तरुणांच्या मृत्यू प्रकरणी मंडळाच्या अध्यक्षासह चौघांवर गुन्हा, वडगाव शेरीतील दुर्घटना
police registered rape case against boy and arrested him after victim s husband complaint
धक्‍कादायक ! नात्याला काळीमा फासणारी ही संतापजनक घटना
monkeypox case confirmed in kerala
Monkeypox : केरळमध्ये ३८ वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण; गेल्या आठवड्यात यूएईवरून भारतात झाला होता दाखल
women killed by daughter in Khalapur raigad
रायगड: प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत दिसलेल्या मुलीनेच आईची केली हत्या

हेही वाचा >>>संपत्ती निर्मितीची दशकपूर्ती :  मोतीलाल ओसवाल मिडकॅप फंड

बाजाराने दुसरा अंबानी अशी पदवी बहाल केली असे वर म्हटले आहे. पण ती कोणत्या कारणामुळे दिली गेली हेही लिहिलेच पाहिजे. २८ डिसेंबर १९८२ या दिवशी युनियन कार्बाइडचा चेंबूरचा पेट्रोकेमिकल्स ताब्यात घेण्याचा करार झाला, अशी रिलायन्सकडून बातमी आली. २८ डिसेंबर तर धीरूभाई अंबानी यांचा जन्मदिवस. लगोलग त्यांना अभिनंदनाची तार पाठवली. रिलायन्सच्या भागधारकांना धीरूभाईंच्या वाढदिवसाची मिळालेली भेट असे तारेत लिहिले होते. त्याअगोदर क्षेत्र बदल म्हणून रिलायन्सचा पेट्रोकेमिकल क्षेत्रात २०० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रयत्न अशी बातमी आली होती. परंतु पुढे युनियन कार्बाइडच्या भोपाळच्या प्रकल्पात एक मोठी दुर्घटना घडली. धीरूभाई हुशार होते त्यांनी युनियन कार्बाइडचा चेंबूर प्रकल्प खरेदी करण्याची योजना रद्द केली. दुर्देैवाने काही वर्षांनंतर अभय ओसवाल याने या प्रकल्पाची खरेदी करायचे ठरवले. कोण हा अभय ओसवाल? मुंबई शेअर बाजारात तो का आला? कोणाला काही कळण्याआधी शेअर बाजारात भरपूर पैसा कमावल्यानंतर एकामागोमाग एक धाडसी निर्णय घ्यायला त्याने सुरुवात केली. आणि २०१६ ला मॉस्को येथे खेळ खल्लास झाला. वय होते फक्त ६७ वर्षे.

हेही वाचा >>>बाजार रंग: पडझड आहे, भूकंप नाही…

लुधियाना, पंजाब येथील लाला विद्यासागर ओसवाल यांचा हा मुलगा. या घराण्याची एक शाखा वुलनचे (लोकरीचे) कपडे तयार करण्यात अग्रेसर होती. या उद्योगातील मॉन्टे कार्लो हा ब्रॅण्ड त्यांच्याकडे होता. अभय ओसवालचा प्रवास ट्रेडर ते उद्योगपती असा सुरू झाला. बाजारातून कमावलेल्या पैशातून एकामागोमाग एक वेगवेगळे प्रकल्प खरेदी करण्याचा धडाका त्याने सुरू केला. आयसीआय केमिकल या कंपनीचा पश्चिम बंगालमध्ये रिशरा येथे असलेला प्रकल्प याने खरेदी केला. जगजीत इंडस्ट्रीजचा पंजाबात साखर कारखाना होता तोही अभय ओसवालने घेतला. वेगवेगळे कारखाने खरेदी करणे ही मोहीम चालू असताना ट्रेडर म्हणून जे रक्त अंगात उसळत होते ते शांत कधीच झाले नाही. आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणात चालू होता. पोर्टेबल जनरेटर्स आयात करणे, टीव्ही सेट्स आयात करणे हेसुद्धा चालू होते. लुधियानात मोठ्या प्रमाणात विजेचा तुटवडा असायचा त्यामुळे त्या काळात प्रत्येक छोट्यामोठ्या दुकानासमोर पोर्टेबल जनरेटर चालू असायचा. अभय ओसवाल ५०० कोटी रुपयांचा मालक बनला. आज मोठमोठ्या रकमा फार किरकोळ झालेल्या आहेत. आज जर ही रक्कम फार किरकोळ वाटत असली तरी त्यासमयी ती प्रचंडच होती.

व्यवसायाच्या वाढीसाठी त्याने दिल्लीला यायचे ठरवले. आणि जे घडायला नको होते ते घडले. राजकारणात बदल झालेले होते. व्ही पी सिंग यांच्या हातात सत्ता आली होती. “फकीर नही लकीर है” ही घोषणा फार लोकप्रिय झाली होती. परदेशी चलन गैरव्यवहारप्रकरणी अभय ओसवाल यांना दिल्ली विमानतळावरच अटक झाली. छातीत दुखण्याचे नाटक करून एस्कॉर्ट्स हॉस्पिटल या ठिकाणी त्यांना दाखल करण्यात आले. अभय ओसवालचे वकील जामील मिळवण्यासाठी प्रयत्न करीत होते. अचानकपणे हे सगळे कसे घडले, का घडले, कोणामुळे घडले अशा अनेक प्रश्नांना वेगवेगळी उत्तरे मिळत होती. परंतु बाजारात नोंदणी असलेल्या अभय ओसवालच्या कंपन्यांच्या अधोगतीला सुरुवात झाली होती.

या संघर्षाला यशस्वीपणे तोंड देण्याचे आव्हान अभय ओसवालने स्वीकारले होते. पैसा उभा करण्यासाठी २००५ ला इफ्को या सहकारी क्षेत्रातील कंपनीला डीएपी या खताची निर्मिती करणारा प्रकल्प २,१८० कोटी रुपयाला त्यांनी विकला. त्याअगोदर १९९५ ला शहाजापूर या ठिकाणी १,३६८ कोटी रुपयांचा युरिया खत प्रकल्प त्यांनी उभारला होता, तर अभय ओसवालचा मोठा मुलगा पंकज याने ऑस्ट्रेलियात अमोनिया प्रकल्प सुरू केला होता. अभयने आपली मुलगी शालू ही नवीन जिंदलला दिली होती. नवीन जिंदल हेसुद्धा त्या काळात मोठे नाव होते. आणि आजसुद्धा आहे. परंतु सासऱ्याला कठीण प्रसंगी जावयाची मदत होऊ शकली नाही.

वेगवेगळे प्रकल्प सुरू करणे हे अभय ओसवाल यांच्या रक्तातच होते. ओसवाल ग्रीन टेक या कंपनीने पुढे एनडीटीव्ही यातसुद्धा गुंतवणूक केली. लहान मुलाला संगीताची आवड होती म्हणून लकी स्टार एंटरटेन्टमेंट सुरू केले. हिंदी न्यूज चॅनेलसुद्धा सुरू केले. परंतु शेवटी मोठे शून्य राहिले.

मुंबई शेअर बाजार १५० वर्षांचा जुना आहे. या बाजाराला आयुष्यातली ५० वर्षे दिलेली असल्याने ४० वर्षांपूर्वीची ही माहिती पुन्हा एकदा नव्याने प्रसिद्ध करण्याचे अनेक हेतू आहेत. गेल्या आठवड्यात राधाकृष्ण दमाणी यांच्यावर जे लिहिले होते ते सकारात्मक होते आणि हे नकारात्मक असे अजिबात नाही. बाजारात इतिहासाची पुनरावृत्ती होत असते.

जेव्हा जेव्हा बाजारात तेजीची लाट येते तेव्हा अनेक उद्योजक झटपट पैसे कमावण्यासाठी तेजीच्या लाटेवर स्वार होतात. बाजारात अशा वेळेस विवेकबुद्धी हरवलेली असते. तेजीची लाट ओसरल्यानंतर मग कुठे काय नुकसान झाले हे लक्षात येते. तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. पूर्वी जेव्हा काही कंपन्यांच्या शेअर्सची बाजारातली नोंदणी रद्द व्हायची त्यावेळेस अशा कंपन्यांच्या सर्टिफिकेटसना ‘वॉलपेपर’ असे नाव दिले गेले होते. निर्णय काय चुकले याची जाणीव व्हावी म्हणून अशा कंपन्यांची सर्टिफिकेट्स दर्शनी भागात भिंतीवर फ्रेम करून लावल्यानंतर तरी काही चुका टाळता येतील. या स्तंभात आजपर्यंत पंजाबमधल्या उद्योजकाची माहिती दिलेली नव्हती. देशातल्या सर्व राज्यात अशाच प्रकारची खूप उदाहरणे आहेत. उत्तर प्रदेशात युनायटेड या नावाने ६ ते ७ कंपन्या एकामागोमाग एक बाजारात आल्या होत्या. हैदराबाद पत्ता असलेल्या अनेक औषध कंपन्या आल्या. त्यापैकी फक्त निवडक कंपन्या यशस्वी ठरल्या. कलकत्त्याच्या एका कंपनीने रॉबर्ट बॉश या कंपनीचे तंत्रज्ञान घेऊन वॉशिंग मशीन्स बाजारात आणली होती. तंत्रज्ञान अतिशय चांगले. वॉशिंग मशीन इतके उत्कृष्ट चालायचे की १५ वर्षे झाले तरी मशीन व्यवस्थित असायचे. परंतु कंपनी आजारी पडली. ३५० रुपयाला घेतलेला शेअर एका गुंतवणूकदाराने साडेसात रुपयाला विकला. अशी अनेक उदाहरणे आहेत म्हणून कंपन्यांच्या शेअर्सचा अभ्यास करताना चालवणाऱ्या व्यक्ती कोण त्यांची विचारसरणी काय, याची सतत माहिती असली पाहिजे.

प्रमोद पुराणिक