तृप्ती राणे

‘म्युच्युअल फंड सही है!’ या घोषवाक्याने आपल्यापैकी अनेकांना या गुंतवणूक पर्यायाची ओळख करून दिली. इतकेच नव्हे त्याबद्दल कुतूहल निर्माण करून त्यात आपण पैसे टाकावेत अशी भुरळही पाडली. म्युच्युअल फंडांमध्ये ‘एसआयपी’ का करावी याबाबत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या गुंतवणूक कार्यशाळा आणि मार्गदर्शन कार्यक्रम होत असतात. परंतु हे उपक्रम महानगर किंवा शहरांमध्ये जास्त प्रमाणात राबवले जातात आणि मुळात नोकरदार माणसांना नेहमीच तिथे जाणं शक्य होते असे नसते. म्हणून आजचा हा लेख.

David Shaw has used concept of quant when managing assets of his investors
बाजारातली माणसं : हेज फंड बाजारातली एक रहस्यकथा – डेव्हीड शॉ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
article about sudhamma life in forest
व्यक्तिवेध : सुधाम्मा
readers reaction on loksatta editorial
लोकमानस : खंक तिजोरी ओरबाडण्याचा कार्यक्रम

मागील लेखामध्ये मी कोणते म्युच्युअल फंड प्रकार, हे कुठल्या ध्येयासाठी, गुंतवणूक काळासाठी आणि जोखीम क्षमतेसाठी उपयुक्त आहेत याची माहिती दिली होती. परंतु तुमच्या एव्हाना लक्षात आलेले असेल की, देशात साधारण ४५ म्युच्युअल फंड घराणी आहेत. त्यात त्यांच्या निरनिराळ्या स्कीम्स असतात ज्या खालील तक्त्यामधून आपल्या लक्षात येतील.

समभाग रोखे हायब्रीड उपायांवर आधारित अन्य
मल्टी कॅप ओव्हरनाइट कन्झर्व्हेटिव्ह रिटायरमेंट गोल्ड
लार्ज कॅप लिक्विड बॅलन्स्ड चिल्ड्रेन इंटरनॅशनल
लार्ज मिड कॅप अल्ट्रा शॉर्ट ड्युरेशन अग्रेसिव्ह इंडेक्स सिल्व्हर
मिडकॅप शॉर्ट ड्युरेशन डायनॅमिक ॲसेट / बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड ऑफ फंड्स
स्मॉलकॅप मीडियम ड्युरेशन मल्टी ॲसेट
डिव्हिडंड यील्ड मीडियम टू लॉन्ग ड्युरेशन आर्बिट्राज
व्हॅल्यू लाँग ड्युरेशन इक्विटी सेव्हिंग्स
कॉन्ट्रा डायनॅमिक बॉण्ड
फोकस्ड कॉर्पोरेट बॉण्ड
सेक्टोरल/थीमॅटिक क्रेडिट रिस्क
करबचत/ ईएलएसएस बँकिंग ॲण्ड पीएसयू
फ्लेक्झी गिल्ट
गिल्ट (१० इयर कॉन्स्टन्ट ड्युरेशन)
फ्लोटर
फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन

वरील नमूद प्रत्येक फंडाची उद्दिष्टे, जोखीम, त्यांनी केलेली गुंतवणूक वेगळी आहे. उदाहरण म्हणजे समभागसंलग्न (इक्विटी) फंडांमध्ये किती टक्के गुंतवणूक लार्ज, मिड व स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये होऊ शकते याच्या ‘सेबी’ने मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जोखीम क्षमतासुद्धा बदलते. लार्ज कॅप फंड हे मिड आणि स्मॉल कॅपच्या तुलनेत कमी पडतात. किंवा क्रेडिट रिस्क फंडांची जोखीम ही गिल्ट फंडांपेक्षा जास्त असते.

जशी जोखीम तसे परतावे असे आपण नेहमीच ऐकत आलेलो आहोत. परंतु कोणती जोखीम कधी घेतली की त्या अनुषंगाने परतावे मिळू शकतात या बाबतीत प्रत्येक गुंतवणूकदाराने खबरदार राहायला हवे. म्युच्युअल फंडांची जोखीम तपासायला त्यांचा पोर्टफोलिओ, सेक्टर प्रमाण, कंपनी प्रमाण, जोखीम-परतावा मापदंड हे पाहणे गरजेचे आहे. फक्त मागील परतावे बघून जर फंड निवडला तर येणाऱ्या काळात तो चांगले परतावे देईल की नाही याची दखल प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि म्हणून गुंतवणूक हवामान हे थोडे फार तरी प्रत्येकाने समजून घेतले तर त्यातून नुकसान कमी होईल किंवा फायदा वाढू शकेल.

सर्वसाधारणपणे फ्लेक्सी कॅप फंड हे समभागसंलग्न गुंतवणुकीसाठी जास्त उपयुक्त ठरतात. कारण ते कुठल्याही प्रकारच्या कंपनीमध्ये पैसे घालू शकतात. परंतु स्मॉल कॅप फंडाला ६५ टक्के गुंतवणूक ही स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये ठेवावी लागते. जेव्हा बाजार जोमात असतो तेव्हा स्मॉल कॅप फंड मस्त परतावे देतात, परंतु बाजाराची दिशा बदलली की यांचे परतावे पण धडाधड खाली येतात.

डेट फंड तर समजायला अजून क्लिष्ट आहेत. त्यांची कामगिरी कंपनीची आर्थिक परिस्थिती, गुंतवणूक कालावधी आणि व्याज दर यांच्यावर अवलंबून असते. आणि जेव्हा बाजारामधून पैसे बाहेर जातात, तेव्हा हे सगळेच फंड पडतात. कारण गुंतवणूकदार भीती आणि गरजेपोटी सगळी गुंतवणूक विकून बाहेर पडतो. २०२० साली करोनामुळे, २००८ साली जागतिक वित्तीय संकटामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. येणाऱ्या काळातही असा धोका संभवतो. आणि म्हणूनच पैसे गुंतवायचा आधी या सगळ्या गोष्टींचा विचार झाला पाहिजे.

परंतु हे लक्षात घ्या की ज्याप्रमाणे निसर्गाचं ऋतुचक्र सतत बदलत असतं, तसंच काहीसं गुंतवणुकीचंसुद्धा ऋतुचक्र असतं. महागाई, व्याजदर, जागतिक अस्थिरता, देशांतर्गत परिस्थिती हे सर्व आपल्या गुतंवणुकीवर परिणाम करत असतात. परंतु कोणते परिणाम कायमस्वरूपी आहेत आणि कोणते तात्पुरते आहेत हे समजून घ्या. तात्पुरते परिणाम काही काळ गुंतवणुकीला बाधा करतात, परंतु कायमस्वरूपी परिणाम कधीच परतावे किंवा मूळ रक्कम परत मिळवून देत नाहीत. कुठल्याही चढ्या बाजारातील गुंतवणूक वाढायला जास्त काळ जावा लागतो. आणि जर गुंतवणूकदाराकडे संयम नसेल तर तो तोट्यामध्ये ती गुंतवणूक विकून कायमचा बाजाराला टाटा करतो.

खालील तक्त्यामध्ये काही म्युच्युअल फंड प्रकाराचे परतावे दर्शविले आहेत:

फंड प्रकार १ वर्ष ३ वर्षे ५ वर्षे १० वर्षे

फ्लेक्सी कॅप -१.२१ २२.४१ १०.०० १३.३८

लार्ज कॅप -१.४८ २३.३५ १०.६७ १२.०७

मिड कॅप ३.०४ २८.२९ ११.१० १७.३७

स्मॉल कॅप ०.९२ ३५.३५ ११.८३ १९.११

अग्रेसिव्ह हायब्रिड ०.४६ १८.९० ९.०५ १२.३६

गोल्ड ११.३९ १२.४४ १२.८५ ५.७५

लिक्विड ५.३६ ४.०५ ५.०९ ६.५६

गिल्ट ३.४२ ४.५९ ६.८२ ७.३३

स्रोत : व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन /www.valueresearchonline.com

हाच तक्ता मार्च २०२० मध्ये जेव्हा मार्केट पडलं होतं तेव्हा खूप वेगळा दिसत होता.
तेव्हा प्रत्येक गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंड निवडताना येणाऱ्या काळात काय वाढू शकेल आणि काय कमी होऊ शकेल याचा विचार करून, गुतंवणुकीत सातत्य ठेवून जर संपूर्ण पोर्टफोलिओ सांभाळला तरंच पुढच्या काळामध्ये चांगली संपत्ती निर्मिती होऊन ध्येयपूर्ती होऊ शकेल. नाहीतर एक ना धड आणि भाराभर चिंध्या ही म्हण तर आपल्याला माहीत आहेच!

तृप्ती राणे, सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार

trupti_vrane@yahoo.com