रेशमाच्या रेघांनी, लाल-काळ्या धाग्यांनी वस्त्र विणणारी, ज्यात तरुणाईला भुरळ पाडणारी अशी व्हॅन ह्यूसेन, ॲलन सोली, लुई फिलिप, पीटर इंग्लंड अशा एकाहून एक अशा नितांतसुंदर वस्त्र उत्पादन नाममुद्रांतून आपल्या उच्च श्रेणीचा दर्जा विकसित करणारी, प्रतिष्ठित वर्गात ‘उँचे लोग, उँची पसंद’ श्रेणीच्या कापड निर्मितीतील ‘आदित्य बिर्ला फॅशन रिटेल लिमिटेड’ (एबीएफआरएल) कंपनीचा समभाग हा आपला आजचा ‘बातमीतील समभाग’ असणार आहे.

सरलेल्या सप्ताहातील बुधवारी १५ जानेवारीला, कंपनीने ४,३०० कोटींची भांडवल उभारणीची योजना जाहीर केली. त्या समयी भांडवली बाजारातील समभागाचा भाव २६५ रुपये होता. तर १७ जानेवारीचा बंद भाव २७५ रुपये होता. या भांडवल उभारणीत कंपनीच्या प्रवर्तकांना हा समभाग ३१७.४५ रुपयांच्या अधिमूल्यावर देण्यात येणार आहे. यातील (बिट्वीन द लाइन) गर्भितार्थ आकळण्याचा प्रयत्न केल्यास, कंपनीच्या प्रवर्तकांना कंपनीच्या उज्ज्वल भविष्याबद्दल विश्वास, खात्री असल्याने प्रवर्तक १९ टक्क्यांच्या अधिमूल्याने हा समभाग खरेदी करत आहेत. प्रवर्तक महागड्या भावात खरेदी करत असताना, तुम्ही आजच्या भावात त्यावर बाजी लावणार काय?

bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Rupee sinks to record low, settles 66 paise down
रुपयाची दोन वर्षांतील सर्वांत मोठी गटांगळी
crude oil prices at 80 dollar per barrel on global supply concerns
तेल किमती वाढ, चार महिन्यांतील उच्चांकी पातळी; खनिज तेलाचे भाव पिंपामागे ८० डॉलरवर
Mahakumbh mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभमुळे मिळणार २००० कोटींची आर्थिक चालना; अर्थव्यवस्था काय सांगते?
Petrol Diesel Rate In Maharashtra
Petrol Diesel Rate: महाराष्ट्रातील काही शहरांत इंधनाच्या किंमतीत वाढ; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव
Inflow of Rs 41156 crore into equity funds in December Investment in small midcap funds contributed significantly
डिसेंबरमध्ये ‘इक्विटी फंडा’त ४१,१५६ कोटींचा ओघ; स्मॉल, मिडकॅप फंडातील गुंतवणुकीचे मोठे योगदान
Indian Railway Highest Revenue Generating Train
Indian Railways : ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत ट्रेन! कमाई १,७६,०६,६६,३३९; वंदे भारत, शताब्दी एक्सप्रेसलाही टाकले मागे

हेही वाचा : जिम्मा न् विमा : पत्नी, मुलांच्या मालमत्ताधिकाराचा फायरवॉल – एमडब्ल्यूपीए

तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आदित्य बिर्ला फॅशन रिटेल लिमिटेडच्या समभागाचा आढावा घेतल्यास, या समभागाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर हा ३१० रुपयांचा असून या आशादायक बातमीच्या परिणामाने, समभाग ३१० रुपयांवर १५ दिवस सातत्याने टिकल्यास, त्याचे दीर्घ मुदतीचे प्रथम वरचे लक्ष्य हे ३५० ते ३७५ रुपये, तर द्वितीय लक्ष्य हे ४५० ते ५५० रुपये असेल. बाजारात मंदीचा रेटा वाढल्यास समभागाचा बाजारभाव २५० ते २०० रुपयांपर्यंत घसरू शकतो.

निफ्टी व बँक निफ्टी निर्देशांकाचा आढावा

१७ जानेवारीचा बंद भाव: निफ्टी – २३,२०३.२० / बँक निफ्टी – ४८,५४०.६०

महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर: निफ्टी -२३,३००/ बँक निफ्टी – ४९,२५०

उत्साहवर्धक बातमीचा परिणाम: २३,३०० / ४९,२५० चा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर राखत, या निर्देशांकांचे प्रथम वरचे लक्ष्य २३,५००/ ४९,७०० आणि द्वितीय लक्ष्य २३,८००/ ५०,५०० असे असेल.

हेही वाचा : मार्केट-वेध : शेअर बाजारात सेन्सेक्सची २२५ अंशांची कमाई; मात्र सत्रारंभीच्या मुसंडीला, दिवसअखेर पुन्हा गळती!

उदासीन परिणाम: हे निर्देशांक २३,३०० / ४९,२५० च्या महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तराला तोडत, २३,००० ते २२,८०० / ४७,९५० ते ४७,५०० स्तरापर्यंत घसरणे शक्य.

लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक.

Story img Loader