रेशमाच्या रेघांनी, लाल-काळ्या धाग्यांनी वस्त्र विणणारी, ज्यात तरुणाईला भुरळ पाडणारी अशी व्हॅन ह्यूसेन, ॲलन सोली, लुई फिलिप, पीटर इंग्लंड अशा एकाहून एक अशा नितांतसुंदर वस्त्र उत्पादन नाममुद्रांतून आपल्या उच्च श्रेणीचा दर्जा विकसित करणारी, प्रतिष्ठित वर्गात ‘उँचे लोग, उँची पसंद’ श्रेणीच्या कापड निर्मितीतील ‘आदित्य बिर्ला फॅशन रिटेल लिमिटेड’ (एबीएफआरएल) कंपनीचा समभाग हा आपला आजचा ‘बातमीतील समभाग’ असणार आहे. बुधवारी १५ जानेवारीला, कंपनीने ४,३०० कोटींची भांडवल उभारणीची योजना जाहीर केली. त्या समयी भांडवली बाजारातील समभागाचा भाव २६५ रुपये होता. तर १७ जानेवारीचा बंद भाव २७५ रुपये होता. या भांडवल उभारणीत कंपनीच्या प्रवर्तकांना हा समभाग ३१७.४५ रुपयांच्या अधिमूल्यावर देण्यात येणार आहे. यातील (बिट्वीन द लाइन) गर्भितार्थ आकळण्याचा प्रयत्न केल्यास, कंपनीच्या प्रवर्तकांना कंपनीच्या उज्ज्वल भविष्याबद्दल विश्वास, खात्री असल्याने प्रवर्तक १९ टक्क्यांच्या अधिमूल्याने हा समभाग खरेदी करत आहेत. प्रवर्तक महागड्या भावात खरेदी करत असताना, तुम्ही आजच्या भावात त्यावर बाजी लावणार काय?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा