आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडाने मागील २२ वर्षांत (ऑगस्ट २००२ ते फेब्रुवारी २०२५) दरमहा १०,००० रुपयांच्या ‘एसआयपी’ गुंतवणुकीच्या २६.४० लाख रुपयांचे १.८६ कोटी रुपये करण्याची किमया साधली आहे. या ‘एसआयपी’चा वार्षिक वृद्धीदर १५.४९ टक्के असून, लार्जकॅप फंड गटात २० वर्षे कालावधीत ‘एसआयपी’वर एचडीएफसी लार्जकॅपनंतर (१६.२४ टक्के) दुसऱ्या क्रमांकाचा वृद्धीदर (१६.००) आहे. त्याचप्रमाणे, १,००,००० एकरकमी गुंतवणुकीचे त्याच कालावधीत १९.४९ टक्क्यांच्या वार्षिक चक्रवाढ वाढीने ४८.५६ लाख करणारा हा फंड आहे. ५ ऑगस्ट २००२ मध्ये सुरू झालेल्या या लार्जकॅप फंडाचे गेल्या ३ वर्षातील ढिसाळ कामगिरीनंतर कामगिरीत सुधारणा झाल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या लार्जकॅप व्याख्येनुसार, एकूण मालमत्तेच्या किमान ८० टक्के गुंतवणूक बाजारभांडवलानुसार पहिल्या १०० कंपन्यांत गुंतविणे सक्तीचे आहे. लार्जकॅपमधील मोठ्या घसरणीनंतर लार्जकॅपचे मूल्यांकन नवीन गुंतवणुकीसाठी आवाक्यात आल्याने गुंतवणूकदारांनी लार्जकॅपची कास धरल्याचे म्युच्युअल फंड घराण्यांची शिखर संस्था ‘ॲम्फी’च्या जानेवारीच्या आकडेवारीत दिसून आले आहे. ७ ते १० वर्षे कालावधीसाठी नव्याने एक रकमी गुंतवणूक किंवा किमान ५ वर्षे ‘एसआयपी’ करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक चांगला पर्याय आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड हा २२ वर्षांपैकी पहिल्या १०-१५ वर्षे चांगला परतावा देणारा फंड होता. फंडाची कामगिरी वर्ष २००४ ते २०१५ उत्तम होती. जानेवारी २०१६ पासून कामगिरी घसरायला सुरुवात झाली. करोनापूर्वी लार्जकॅप फंड गटात फंडाची कामगिरी तळाला होती. ‘सेबी’च्या फंड सुसूत्रीकरणानंतर फंडाच्या कामगिरीत अल्प काळ सुधारणा झाल्याचे दिसले. आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड हा लार्जकॅप फंड म्हणून ओळखण्यात नेहमीच योग्य फंड होता. करोनापश्चात जुलै २०२० ते जून २०२३ दरम्यान हा उत्कृष्ट कामगिरी करणारा फंड होता. जुलै २०२३ ते सप्टेंबर २०२४ दरम्यान फंडाची कामगिरी खालावली. ऑक्टोबर २०२४ पासून फंडाच्या कामगिरी क्रमवारीत मोठी सुधारणा झाल्याचे दिसत आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड २८,००० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करत आहे.

वैयक्तिक गुंतवणूकदारांमध्ये हा एक अतिशय लोकप्रिय लार्ज कॅप फंड आहे. फंडाचा मानदंड ‘निफ्टी १०० टीआरआय’ आहे. महेश पाटील (आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी) हे १७ नोव्हेंबर २००५ पासून या फंडाच्या योजनेचे निधी व्यवस्थापक आहेत.

कालावधी
वर्षे
फंडाचा परतावा
(दसादशे)
मानदंड परतावा
(दसादशे) (दसादशे)
७.८४ ५.२३
१२.९३ १२.२३
१५.२९ १५.०६
१० १०.८९११.३४
१५ १३.०४१२.५६
२० १५.९६ १४.०३

आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडाची ‘ग्रोथ ॲट रिझनेबल प्राइस’ ही फंडाची गुंतवणूक रणनीती आहे. ही रणनीती अचरणात आणताना मुख्यत्वे ३ बाबींकडे लक्ष दिले जाते. फंड मानदंड सापेक्ष कोणतेही उद्योग क्षेत्र टाळत नाही. फंड गुंतवणूक करताना मानदंड सापेक्ष कोणताही उद्योग क्षेत्र टाळत नाही किंवा खूप जास्त गुंतवणूक करीत नाही. बाजाराच्या वेगवेगळ्या आवर्तनात मानदंड सापेक्ष सरस कामगिरी करून ‘अल्फा’ निर्मितीसाठी निधी व्यवस्थापक प्रयत्नशील असतात. फंडाच्या पोर्टफोलिओची विभागणी मुख्यत्वे ३ गटांत असते, ८०-८५ टक्के लार्जकॅप आणि १०-१५ टक्के मिडकॅप असतात. फंडाच्या गुंतवणुकीत त्या-त्या उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांना स्थान दिले आहे. फंडाच्या गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक खासगी बँकांत असून एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक आणि कोटक महिंद्र बँक या बँकिंग क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या बँका आहेत. याबरोबर इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन ॲण्ड टुब्रो, भारती एअरटेल, महिंद्र ॲण्ड महिंद्र आणि आयटीसी या आघाडीच्या कंपन्यांचादेखील गुंतवणुकीमध्ये समावेश आहे. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये साधारणपणे ७० -८० कंपन्या असतात. आघाडीच्या दहा गुंतवणुका एकूण मालमत्तेच्या ४५-५० टक्क्यांदरम्यान असतात. सध्या फंडाने बँकिंग, वाहन, ग्राहक उपयोगी टिकाऊ वस्तू (कन्झ्युमर ड्युरेबल) अभियांत्रिकी आणि बांधकाम आणि आरोग्यनिगा या क्षेत्रात मानदंड सापेक्ष अधिक गुंतवणूक आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंडाची मानदंड सापेक्ष कामगिरी तपासली असता, ‘निफ्टी १०० टीआरआय’ सापेक्ष फंडाच्या सुरुवातीपासून ३ वर्षांचा ‘रोलिंग रिटर्न’ परतावा आणि ५ वर्षाचा ‘रोलिंग रिटर्न’ परतावा तपासला असता २०१८ आणि २०१९ हे वर्ष वगळता सर्व कालावधीत फंडाने (३ वर्षे आणि ५ वर्षे कालवधीत) मानदंडापेक्षा मोठ्या फरकाने अधिक परतावा मिळविला आहे. फंडाने २०२० पासून पुन्हा कामगिरीत सुधारणा केलेली दिसते. एकंदरीत, आदित्य बिर्ला सन लाइफ फ्रंटलाइन इक्विटी फंड हा दोन तपांचा समृद्ध वारसा लाभलेला फंड असून, किमान पाच वर्षे गुंतवणूक राखून ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी योग्य साधन आहे.