मनासारखे घर मिळाले. घर घेण्याचे बजेट देखील बसले. घराच्या निवडीबाबत सर्व बाबी पूर्ण झाल्या. त्यानंतर मुद्दा येतो तो कोणती बँक आपल्याला गृहकर्ज देणार. कर्जाची टक्केवारी काय असेल? आपल्याला हवे तेवढे कर्ज मिळेल की नाही? ही सर्व प्रक्रिया पार पडण्यासाठी साधारण किती दिवस जाऊ शकतात? या सर्वात बिल्डर काय मदत करेल, अशा एक ना अनेक शंका मनात येत असतात.

कोणत्या गृहप्रकल्पात घर घ्यायचे हे ठरवणे जेवढे कठीण असते तेवढेच अवघड काम म्हणजे गृहकर्जासाठी बँक निवडणे व कर्ज मिळणे, असा अनेकांचा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. मात्र, ग्राहकाची कर्ज मिळण्यासाठी धावपळ होऊ नये, त्याला विविध बँकांना भेटी द्याव्या लागू नयेत, प्रत्येक बँकेची प्रक्रिया समजून घेण्यात त्याची दमछाक होवू येऊ नये, तसेच त्याची गृहकर्जाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, यासाठी आता बांधकाम व्यावसायिकच त्यांच्या प्रकल्पाच्या ठिकाणी बँकांच्या प्रतिनिधींना आमंत्रित करून गृहखरेदी दरम्यान गृहकर्ज उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे घरखरेदी करण्याची प्रक्रिया ग्राहकांसाठी आणखीनच सोपी होते. तसेच ग्राहकाला एकाच ठिकाणी अनेक बँकांचे पर्याय उपलब्ध करून दिले तर त्याला गृहकर्जाचा निर्णय घेणे सोयीचे होते. ग्राहकाला विनाविलंब व विनात्रास कर्ज मिळवून देता आले, याचे समाधान बांधकाम व्यवसायिकांना मिळते. गृहकर्जाच्या सुविधेमुळे ग्राहक देखील खुश होतात.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
The authority is taking possession of houses distributed to 21 people with fake documents
घर असतानाही पात्र झालेल्या २१ झोपडीवासीयांविरुद्ध कारवाई ! सर्व घरे ताब्यात घेणार!
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
got elected four times through evms supriya sule on evm tampering allegations by congress
चार वेळा निवडून आले ईव्हीएमवर संशय कसा घेऊ? खासदार सुप्रिया सुळे यांचे विधान
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य

हेही वाचा… Money Mantra: कोणत्या देणगी आणि दानाला करातून सवलत मिळते?

गृहकर्ज उपलब्ध करून देण्यात बांधकाम व्यावसायिकांचा फायदा असा की, त्यांना पुढील बांधकामासाठी त्वरित पैसे उपलब्ध होतात आणि एकदा का गृहकर्ज मंजूर झाले की संबंधित फ्लॅट विकला जातो व त्यांना उर्वरित सदनिकांच्या विक्रीवर लक्ष केंद्रित करता येवू शकते. गृहकर्जाची सुविधा बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्यामार्फतच उपलब्ध करून दिल्याने ग्राहकाचा वेळ आणि श्रम वाचते, हे निश्चित खरे आहे. मात्र त्यामागे व्यावसायिकांचा देखील फायदा आहे. ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक यांना बिल्डरमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या गृहकर्जाचा काय फायदा-तोटा होतो. बांधकाम व्यावसायिकामार्फत गृहकर्ज घेताना कोणत्या बाबी तपासायला हव्यात, हे आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

बांधकाम व्यावसायिकामार्फत गृहकर्ज घेण्याचे फायदे:

१) वेळ आणि कष्ट वाचतात:

गृह कर्ज घेत असताना घर खरेदीदाराला स्वतःचे आणि बांधकाम व्यावसायिकाचे अनेक कागदपत्र बँकेत सादर करावे लागतात. अनेक प्रक्रिया आणि विविध कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर गृहकर्ज मंजूर होते. या सर्व प्रक्रियेत मोठा वेळ जाण्याची शक्यता असते. ग्राहकांची धावपळ देखील होते. बरीचशी प्रक्रिया झाल्यानंतर बँकेने गृह कर्ज नाकारले, असा अनुभव अनेकांना आला आहे. त्यामुळे निराशा येऊन किंवा गृहकर्ज मंजूर न झाल्याने टोकन दिलेली रक्कम परत घेण्याची वेळ अनेकांवर येते. मात्र बांधकाम व्यावसायिकाच्यामार्फत गृहकर्ज उपलब्ध होत असेल आणि हवे तेवढे गृह कर्ज मिळण्यास ग्राहक पात्र असेल तर ग्रहकर्जाची प्रक्रिया अगदी सुलभपणे काही दिवसांतच पार पडते.

२) बँकेच्या विविध ऑफरचा फायदा मिळतो:

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तसेच घरखरेदीची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी बांधकाम व्यावसायिक अनेक ऑफर देत असतात. अशाच ऑफर बँका देखील देतात. गृहकर्जाचा कमी व्याजदर, गृहकर्जासाठी आकारण्यात येणारे प्रक्रिया शुल्क माफ करणे, आठ दिवसाच्या आत कर्ज मंजुरी अशा अनेक सवलती ग्राहकांना मिळू शकतात. अर्थात काही बँका या सर्व सवलती त्यांच्या शाखेत देखील उपलब्ध करून देतात. मात्र प्रत्येक घर खरेदीदाराला याची माहिती होईलच असे नाही. पण जर बांधकाम व्यावसायिकामार्फत बँका या सुविधा देत असेल तर ग्राहकांना या ऑफरची माहिती सहजासहजी उपलब्ध होते.

३) अल्पावधीत मिळते कर्ज:

आपल्याला हवे आहे तेवढ्या दिवसांतच कर्ज मंजूर झाले आहे, असे प्रत्येकाच्याच बाबतीत होईल असे नाही. कधी-कधी कर्ज मिळण्याची प्रक्रिया अगदी दीड ते दोन महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ देखील लांबू शकते. अशा परिस्थिती प्रत्येक बांधकाम व्यावसायिक ग्राहकाला कर्ज मिळण्याची वाट बघेलच असे नाही. मात्र ही सर्व प्रक्रिया जर बांधकाम व्यावसायाच्यामार्फत पार पडली तर कर्ज मिळण्यासाठी होणारा विलंब नक्कीच कमी होतो. त्यामुळे घरखरेदीची निर्णय लांबत नाही.

४) कायदेशीर बाबींची पूर्तता होते:

गृहकर्जाच्या प्रकरणात कागदपत्रे मोठी महत्त्वाची बाब आहे. कर्जदार आणि बांधकाम व्यावसायिक यांचे दोघांचे आवश्यक ते सर्व कागदपत्रे असल्याशिवाय प्रकरण पुढे जात नाही. हे दोघेही एकाच ठिकाणी असल्याने कर्जाची प्रक्रिया जलद होते.

ठराविक बँकेतूनच कर्ज घेणे बंधनकारक नसते:

बांधकाम व्यावसायिकामार्फत काही ठराविक बँकांमधूनच कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याच बँकेच्यामार्फत गृहकर्ज घेणे बंधनकारक केल्यास ग्राहकाची अडचण होऊ शकते. कारण ग्राहकाचे इतर बँकांशी काही संबंध असतील किंवा त्याला त्या बँकेपेक्षा इतर बँका चांगली ऑफर देत असेल तर तो इतर बँकेचा पर्याय देखील बघू शकतो. मात्र बांधकाम व्यावसायिकाने ठरवून दिलेल्या बँकेतूनच गृहकर्ज घेणे बंधनकारक केले तर ग्राहकाची अडचण होते.

बिल्डरकडून गृहकर्ज घेताना या बाबी अवश्य तपासा:

  • कर्ज देत असताना बँकेने अशा काही अटी टाकल्या आहेत का, ज्याचा बांधकाम व्यावसायिकाला फायदा होऊ शकतो.
  • बिल्डरने कागदपत्रांची व्यवस्थित पूर्तता केलेली आहे की नाही.
  • नियमित व्याजदरापेक्षा जादा व्याजदर ग्राहकाला आकारण्यात येत नाहीये ना.
  • बांधकाम व्यावसियाकाने कर्ज मिळण्यासाठी काही अटींचा भंग केलेला आहे का.
  • बांधकाम प्रकल्पासाठी व्यावसायिकांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी आपल्या सदनिकेचा काही गैरवापर केलेला आहे का
  • कर्जाचा हप्ता कधी असेल, त्याचा व्याजदर किती आहे आणि कर्जाचा कालावधी तपासून घ्यावा
  • शंका असलेल्या बाबींची बँक आणि बांधकाम व्यावसायिक या दोघांकडून खात्री करून घेणे गरजेचे आहे.
  • कर्जदार मासिक हप्ता भरत नाही तेव्हा त्याकडून काही शुल्क आकारले जाते. त्याचे खाते डीफॉल्ट होते आणि बँकेला त्याच्यावर काही कारवाई करायची असते. या प्रक्रियेत पैसा खर्च होतो, त्यासाठी ग्राहकांकडून किती शुल्क आकारले जाते.
  • कोणत्याही बँक किंवा वित्तीय संस्थेच्या ग्राहकाला कर्ज देण्यासाठी अनेक कागदपत्रांची पडताळणी करावी लागते तसेच मालमत्तेचे मूल्यांकनही केले जाते. या गरजा पूर्ण करण्यासाठी बँक कायदेतज्ज्ञांची नियुक्ती करते. त्याचे पैसे कोण भरणार हे विचारून घ्यावे
  • तुमचे कर्ज मंजूर झाल्यावर लॉग इन फी तुमच्या प्रोसेसिंग फीमधून कापली जाते. तर कर्ज मंजूर न झाल्यास लॉगिन शुल्क तुम्हाला परत मिळणार की नाही हे तपासावे
  • गृहकर्जाचे छुपे शुल्क प्रत्येक बँकेनुसार वेगवेगळे असते. या शुल्कांबद्दल जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते.

Story img Loader