Income Tax Refund Status: देशात आयटीआर मोठ्या प्रमाणात जमा करण्यात आला आहे. आता लोक रिफंडच्या प्रतीक्षेत आहेत. अशा लोकांसाठी प्राप्तिकर विभागाकडून एक अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्या अलर्टमध्ये आयटीआर परतावा वैध खात्यातच येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

प्राप्तिकर विभागाकडून अलर्ट जारी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करताना प्राप्तिकर विभागाने म्हटले की, परतावा फक्त वैध बँक खात्यात जमा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने ई-फायलिंग पोर्टलला भेट देऊन त्यांच्या बँक खात्याचे पासबुक अपडेट करून घेतले पाहिजे.

Flipkart Cancellation Fee Rule Charges
Flipkart Cancellation Fee : ऑनलाइन ऑर्डर रद्द करताच पैसे द्यावे लागणार? फ्लिपकार्टचा ‘हा’ नियम जुना, वाचा कंपनी काय म्हणते
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
gurpatwant singh pannu in us
Gurpatwant Singh Pannu: भारताची मागणी अमेरिकेनं फेटाळली, गुरुपतवंतसिंग पन्नूच्या बँक खात्याची माहिती देण्यास स्पष्ट नकार!
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
Pune and Pimpri Chinchwad may raise PMPML ticket prices due to rising operational deficit
पीएमपी तिकीट दरवाढीचे भवितव्य, ‘दादांच्या ‘ हाती, काय निर्णय घेणार ?
Dombivli tax arrears people, Dombivli property seal,
डोंबिवलीत मालमत्ता कर थकबाकीदारांच्या गाळ्यांना टाळे

हेही वाचाः ८० हजार कोटींचा व्यवसाय नाकारला अन् स्वतःच्या बळावर १५० कोटींच्या कंपनीची स्थापना, कोण आहेत सिमरन लाल?

परतावा मिळण्यासाठी किती वेळ लागतो?

जर तुम्ही सर्व नियमांचे पालन करून तुमचा ITR दाखल केला असेल तर साधारणपणे तुम्हाला सहा महिन्यांच्या आत परतावा मिळतो. मात्र, आता रिफंडची प्रक्रिया पूर्वीपेक्षा खूपच वेगवान झाली आहे. आयटी विभागाकडून परतावा जारी होताच तुम्हाला एक मेल प्राप्त होईल. तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाइटला भेट देऊनही जाणूनही घेऊ शकता. जर तुमचे बँक खाते आधीच अपडेट झाले असेल तर तुमच्या बँक खात्याच्या तपशीलात बदल झाल्यामुळे पासबुक पुन्हा अपडेट करून घ्यावा.

हेही वाचाः अमेरिकेत टूथपेस्ट, डिओ आणि चॉकलेट कुलूप बंद; नेमकं असं काय घडलं?

प्राप्तिकर पोर्टलवर तुमचे खाते कसे पडताळायचे?

  • सर्वप्रथम तुम्हाला इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवर जावे लागेल.
  • यानंतर तुमच्या तपशीलांसह लॉग इन करा.
  • लॉग इन केल्यानंतर प्रोफाइल विभागात जा.
  • तेथे ‘माझे बँक खाते’ निवडा.
  • यानंतर तुम्ही तुमचे खाते पुन्हा पडताळू शकता किंवा बँक खाते जोडू शकता.
  • जरी बँकेची शाखा विलीन झाली किंवा इतरत्र स्थलांतरित झाली, तरी खात्याचे पुनर्वैधीकरण करणे आवश्यक आहे.

Story img Loader