· फंड घराणे – निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड

· फंडाचा प्रकार – इक्विटी फंड

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?
Crime against MNS candidate in Nashik East Constituency
नाशिक पूर्व मतदार संघातील मनसे उमेदवाराविरुध्द गुन्हा, पक्ष सचिवाच्या घरात लूट
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
assembly election 2024 Frequent party and constituency changes make trouble for Ashish Deshmukh
वारंवार पक्ष व मतदारसंघ बदल आशीष देशमुखांना भोवणार
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष

· फंड कधी लॉन्च झाला ? – ८ ऑगस्ट २००७

· एन. ए. व्ही. (१४ डिसेंबर 2023 रोजी) ग्रोथ पर्याय – ७१ रुपये प्रति युनिट

· फंड मालमत्ता ( ३० नोव्हेंबर २०२३ रोजी)– १८०७१ कोटी रुपये.

· फंड मॅनेजर्स – शैलेश राज भान, आशुतोष भार्गव.

फंडाची स्थिरता

· पोर्टफोलिओ टर्नओव्हर ०.४२

· स्टॅंडर्ड डिव्हिएशन १४.०८ %

· बीटा रेशो ०.९९ %

पोर्टफोलिओ टर्नओव्हर म्हणजे एखाद्या फंड मॅनेजरने फंड योजनेमध्ये शेअरची सतत खरेदी विक्री खरेदी सुरू ठेवणे. जेवढे जास्त खरेदी विक्री व्यवहार घडतील तेवढाच फंडाचा खर्च वाढतो. पोर्टफोलिओ टर्नओव्हर जास्त असणे फारसे चांगले मानले जात नाही.

हेही वाचा – गुंतवणुकीतील श्रेयस आणि प्रेयस

स्टॅंडर्ड डिव्हिएशन म्हणजेच एखाद्या फंडाचा परतावा गेल्या तीन वर्षांत किती स्थिर राहिला आहे त्याचे निर्दशक आहे. म्हणजेच दोन फंडाची तुलना करता ज्या फंडाचा हा आकडा कमी आहे तो फंड साधारणतः पुढील काळात दुसऱ्या फंडापेक्षा तसेच परतावे देण्याची शक्यता आहे. उदाहरण घेऊया फंड X आणि फंड Y यांनी १२% परतावा मागच्या पाच वर्षांत दिला आहे. जर स्टॅंडर्ड डिव्हिएशनचा फंड X चा आकडा Y पेक्षा कमी असेल तर फंड X पुढील काळात तसाच सर्वसाधारण परतावा देऊ शकतो तर, फंड Y मधून मिळणारा परतावा बदलू शकतो.

बीटा म्हणजेच गेल्या तीन वर्षांत फंडाने दिलेल्या परताव्यावरून भविष्यात तो फंड किती वर किंवा खाली जाईल याचा अंदाज लावणे, जेवढी बीटा व्हॅल्यू कमी असेल तेवढाच फंड भरवशाचा.

शार्प रेश्यो म्हणजे अधिक रिटर्न्स मिळवण्यासाठी फंडाने किती जोखीम घेतली आहे, अधिकाधिक रिटर्न मिळवण्यासाठी फंड मॅनेजरने घेतलेली जोखीम अधिक असेल तर त्याचे प्रतिबिंब यामध्ये उमटते.

तुमच्यासाठी हा फंड महत्त्वाचा का ?

पूर्वीचा रिलायन्स म्युच्युअल फंडातील रिलायन्स लार्ज कॅप फंड म्हणजेच निप्पॉन इंडिया लार्ज कॅप फंड होय. गेल्या पंधरा वर्षांपासून सातत्यपूर्ण रिटर्न देणे याबाबतीत हा फंड विश्वासार्ह मानता येईल. लार्ज कॅप फंडातील गुंतवणूक ‘अल्फा’ हा फॅक्टर ध्यानात ठेवून केली जाते. अर्थात पोर्टफोलिओमध्ये अनावश्यक बदल न करता दीर्घ काळामध्ये उत्तम परतावा मिळावा हा या फंडाचा उद्देश असतो. आघाडीच्या शंभर कंपन्यातील निवडक ५० ते ६० कंपन्या निवडून उत्तम पोर्टफोलिओची बांधणी हे फंड मॅनेजरचे वैशिष्ट्य आहे व यापैकी पहिल्या ३० शेअर्समध्ये एकूण गुंतवणुकीच्या ७५ ते ८० टक्के गुंतवणूक केली जाते.

देशाची अर्थव्यवस्था ज्या पद्धतीने मार्गक्रमण करत असेल त्याचा अंदाज घेऊन कोणत्या व्यवसायांमध्ये दमदार वृद्धी होऊ शकते त्या व्यवसायांशी निगडीत कंपन्या निवडण्याकडे फंडाचा कल दिसतो. म्हणूनच आकाराने मोठ्या बँका, उत्पादन क्षेत्रातील कंपन्या, खाणकाम आणि खनिज संपत्तीशी संबंधित कंपन्या यामध्ये फंडाने आपली गुंतवणूक वाढवली आहे.

रिस्को मिटरचा विचार करायचा झाल्यास ‘Very High’ म्हणजेच सर्वाधिक जोखीम असलेल्या श्रेणीमध्ये हा फंड मोडतो.

१४ डिसेंबर २०२३ रोजी फंडाचा परतावा (CAGR पद्धतीने)

· एक वर्ष – २५.२३ %

· दोन वर्षे – १९.४८ %

· तीन वर्षे – २४.८९ %

· पाच वर्षे – १६.८१ %

· दहा वर्षे – १७.४० %

· फंड सुरु झाल्यापासून – १२.७७ %

फंडाने गुंतवणूक कुठे केली आहे ?

३० नोव्हेंबर २०२३ रोजी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार एकूण ५३ शेअर्सचा समावेश असणाऱ्या या फंड योजनेत सर्वाधिक पहिल्या पाच शेअर्समध्ये फंडाने एकूण ३१ टक्के गुंतवणूक केली आहे. एचडीएफसी बँक ९.६२ %, आयसीआयसीआय बँक ६.८८ %, रिलायन्स इंडस्ट्रीज ६.३१ %, आयटीसी ४.८२ %, स्टेट बँक ऑफ इंडिया ४.०६% हे आघाडीचे पाच शेअर्स आहेत. टॉप १० शेअर्सचा विचार केल्यास त्यातील पाच शेअर्स बँकिंग कंपन्यांचे आहेत हे लक्षात घ्यायला हवे. अलीकडील काळात युनियन बँक ऑफ इंडिया आणि टाटा टेक्नॉलॉजी या दोन शेअर्सचा पोर्टफोलिओमध्ये नव्याने समावेश झाला आहे.

हेही वाचा – Money Mantra : Sovereign Gold Bond म्हणजे नेमकं काय?

कोणत्या क्षेत्रात किती टक्के गुंतवणूक केली आहे ?

बँक २६ %, एफएमसीजी ८ %, माहिती तंत्रज्ञान सॉफ्टवेअर ६.५ %, पेट्रोलियम प्रॉडक्ट ६.५ %, ऊर्जा ६ %, फार्मा ३.४७ % अशा एकूण दहा सेक्टर्समध्ये फंडाने गुंतवणूक केली गेली आहे.

‘एस.आय.पी.’तील दीर्घकालीन परतावे

तुम्ही या फंडात दरमहा एक हजार रुपयांची गुंतवणूक केली असती तर

· एक वर्षापासून एसआयपी केली असती तर ३८.६८ %

· दोन वर्षे २८.०८ %

· तीन वर्षे २३.९१ %

· पाच वर्षे २२.५५ %

· सलग दहा वर्ष १६.३६ %

असा स्थिर परतावा मिळालेला दिसतो.

  • नुकत्याच एका निर्णयाद्वारे फंड घराण्यांनी जाहिरात करताना दहा वर्षांच्या सरासरी रिटर्नचा (CAGR) समावेश त्यात करावा अशी मार्गदर्शक सूचना करण्यात आली. त्यानुसार निवडक फंडांचे विश्लेषण या लेखमालिकेतून केले जात आहे. फंड योजनेत गुंतवणूक करावी असा सल्ला देणे हा या लेखमालिकेचा उद्देश नाही. या फंडात गुंतवणूक करताना सर्व जोखीम विषयक माहिती वाचून आपल्या जबाबदारीवरच गुंतवणूक करावी.