सरलेल्या बारा महिन्यांच्या कालावधीत ‘माझा पोर्टफोलियो’ने ९.२ टक्के (आयआरआर १९.५३ टक्के) परतावा दिला आहे. ४४,४६१ रुपयांच्या गुंतवणुकीचे ४,१०९ रुपये नफ्यासह ४८,५७० रुपये झाले आहेत. गेल्या वर्षी १८.७४ टक्के परतावा देणाऱ्या मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने यंदा केवळ ८.९० टक्के तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीने ९.६ टक्के परतावा दिला आहे. सोन्याचा परतावा मात्र २४ टक्के राहिला आहे.

‘माझा पोर्टफोलियो’ सदरात सुचवलेली रोटो पम्प, एलटी फूड्स, अनुप इंजिनीयरिंग, किंग्फा सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि सारडा एनर्जी या कंपन्यातील गुंतवणूक फायद्याची ठरली आहे, तर मायक्रो फायनान्समधील स्पंदना स्फूर्ती फायनान्शियल तसेच मुथूट मायक्रोफायनान्स या दोन्ही कंपन्यांनी मोठे नुकसान केले आहे. एससीआयएलए, ऑइल इंडिया तसेच पीआय इंडस्ट्रीजमध्ये मध्यंतरी वाढ झाली असताना त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी विक्री करून फायदा मिळवला असेल ते भाग्यवान.

विद्यापीठातील निकालांची रखडपट्टी; नव्याने निकाल तयार करण्याची वेळ
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Maharashtra: 784 percent schools in state now have computer facilities, says report
राज्यातील ७८.४० टक्के शाळांमध्ये संगणक वाचन, गणित विषयात प्रगती, शालेय शिक्षण विभागाचा दावा
Axis Focused Fund performance
ॲक्सिस फोकस्ड फंडाची कामगिरी कशी?
Economic Survey FY 2025-26 India GDP Growth Rate
केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून चालू वर्षाचा आर्थिक विकास दर जाहीर; संसदेत पाहणी अहवाल सादर
dsp mutual funds
फंडांचा फंडा: डीएसपी मिड कॅप फंड
loksatta anvyarth quality of school students has deteriorated clear from the asar survey
अन्वयार्थ: कोविडोत्तर निरीक्षणांच्या इयत्ताबदलाचा ‘असर’!
Moody Analytics made a statement on fiscal and monetary policy print eco news
वित्तीय, पतधोरणात मोठ्या सुधारणेनंतरच ६.४ टक्के विकासवेग शक्य- मूडीज

हेही वाचा : आहे मनोहर तरी…..

या सदरातील शेअर हे नेहमीच मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी असल्याने त्यांचे लगेचच मूल्यमापन करणे योग्य ठरणार नाही. शेअर बाजार निर्देशांक रोज नवीन उच्चांक गाठत असतानाच गुंतवणूकदारांनी सतर्क राहून गुंतवणूक केलेल्या कंपन्यांचे आर्थिक निकाल अभ्यासून बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवावे. तसेच वेळोवेळी नुकसान प्रतिबंध अर्थात स्टॉप लॉस पद्धत अवलंबून तोटा मर्यादित ठेवणे अपेक्षित आहे.

अजय वाळिंबे

Stocksandwealth@gmail.com

Story img Loader