अजून १० दिवसांनी म्हणजेच १ फेब्रुवारी, २०२४ रोजी लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला जाईल. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा अंतरिम अर्थसंकल्प असेल आणि त्यानंतर निवडून आलेले सरकार संपूर्ण अर्थसंकल्प सादर करेल. करदात्यांना काय सवलती मिळणार, अर्थव्यवस्थेसाठी संकल्प कसा असेल, गुंतवणुकीसाठी, शेअर बाजारासाठी काय तरतुदी असतील अशा अनेक प्रश्नांची प्रत्यक्षात नंतर सादर होणाऱ्या पूर्ण अर्थसंकल्पातून उत्तरे मिळतील.

प्रश्न : मी मे २०२३ मध्ये पुण्यात एक सदनिका बुक केली आहे. त्याचा ताबा मला डिसेंबर २०२४ मध्ये मिळणार आहे. मी २०२३-२४ या आर्थिक वर्षात भरलेल्या व्याजाची वजावट मला उत्पन्नातून घेता येईल का?

Dabbawala, Dabbawala backs Uddhav Thackeray,
मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) पाठीशी
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
maharashtra assembly election 2024 uddhav thackeray hoarding
‘प्रकल्प रोखणारे सरकार’ला ठाकरे गटाचे फलकबाजीतून उत्तर
maha vikas aghadi releases manifesto for maharashtra assembly poll 2024
महिला, शेतकऱ्यांवर आश्वासनांची खैरात; मविआचा ‘महाराष्ट्रनामा’ जाहीर
Kharge slams Modi for ignoring dalit leaders in cabinet
मतांसाठीच दलित, आदिवासी हिताची भाषा ; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा आरोप

– सुरेश काळे, पुणे</p>

उत्तर : घराचा ताबा घेतला असेल तरच कलम २४ नुसार गृहकर्जावरील व्याजाची वजावट घेता येते. ज्या वर्षी घराचा ताबा घेतला, म्हणजेच, आपल्या बाबतीत २०२४-२५ या आर्थिक वर्षात (डिसेंबर, २०२४) घराचा ताबा मिळाल्यास २०२४-२५ या आर्थिक वर्षापासून गृहकर्जावरील व्याजाची वजावट आपल्याला घेता येईल. ज्या वर्षी घराचा ताबा घेतला त्या वर्षापूर्वीच्या गृहकर्जाच्या व्याजाची वजावट करदात्याला ताबा घेण्याच्या वर्षापासून पुढील ५ वर्षात विभागून घेता येते. म्हणजेच आपल्याला २०२३-२४ या आर्थिक वर्षात दिलेल्या गृहकर्जावरील व्याजाच्या १/५ (एक पंचमांश) रक्कम अधिक २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिलेली रक्कम अशी वजावट आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेता येईल. हे घर तुमचे राहते घर असेल तर गृह कर्जावरील व्याजाच्या वजावटीची

???? कलम मर्यादा ????

२ लाख रुपये आहे. ही वजावट आपल्याला नवीन करप्रणाली स्वीकारल्यास मिळणार नाही. हे घर भाड्याने दिलेले असल्यास किंवा घरावरील घरभाडे करपात्र असल्यास ही २ लाख रुपयांच्या गृहकर्जावरील व्याजाची मर्यादा लागू होत नाही. अशा गृहकर्जावरील व्याजाची वजावट नवीन करप्रणाली स्वीकारली तरी मिळते. परंतु या व्याजामुळे ‘घरभाडे उत्पन्न’ या उत्पन्नाच्या स्रोतात तोटा असेल तर फक्त २ लाख रुपयांचा तोटाच इतर उत्पन्नातून वजा करता येतो. बाकीचा पुढील वर्षात कॅरी-फॉरवर्ड करावा लागतो.

हेही वाचा – Money Mantra : एचडीएफसी बँकेच्या शेअरमध्ये घसरण, तुमच्या फंडांचा आढावा घेतलात का?

प्रश्न : माझे एक घर मुंबईत आहे. मला ते घर विकून त्या पैशातून माझ्या दोन मुलांसाठी दोन घरे खरेदी करावयाची आहेत. मी एक घर विकून दोन घरात पैसे गुंतवून कर वाचवू शकतो का? मला किती कालावधीत घर खरेदी करावयाचे आहे?

– एक वाचक

उत्तर : एक घर विकून त्यावर होणाऱ्या दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविण्यासाठी दुसऱ्या नवीन घरात भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक केल्यास कर भरावा लागत नाही. यासाठी कलम ५४ नुसार वजावट घेता येते. या कलमानुसार दीर्घमुदतीच्या भांडवली नफ्याएवढी रक्कम नवीन घरात गुंतविल्यास त्यावर संपूर्ण वजावट मिळून कर भरावा लागत नाही. भांडवली नफ्यापेक्षा कमी गुंतवणूक नवीन घरात केल्यास नवीन घरातील गुंतवणुकीएवढीच वजावट मिळून बाकी रक्कम करपात्र असते. या नवीन घरातील गुंतवणुकीला १ एप्रिल २०२३ पासून १० कोटी रुपयांची मर्यादा घालण्यात आलेली आहे. ही गुंतवणूक मूळ घराची विक्री केल्या तारखेपूर्वी एका वर्षाच्या आत किंवा विक्री केल्यानंतरच्या तारखेपासून २ वर्षात (खरेदी केल्यास) किंवा ३ वर्षात (बांधल्यास) करणे बंधनकारक आहे. ज्या आर्थिक वर्षात मूळ संपत्ती विकली त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी नवीन घरात गुंतवणूक न केल्यास, भांडवली नफ्याएवढी रक्कम कॅपिटल गेन स्कीमच्या अंतर्गत बँकेत जमा करावी लागते. या खात्यात पैसे मुदतीत जमा न केल्यास वजावट मिळत नाही. या कलमानुसार फक्त एकाच नवीन घरात आणि भारतातच गुंतवणूक करता येते. याला एक अपवाद आहे, मूळ संपत्तीच्या विक्रीवरचा भांडवली नफा जर २ कोटी रुपयांपेक्षा कमी असेल तर करदात्याने एकाऐवजी दोन घरात गुंतवणूक केल्यास ती ग्राह्य धरली जाते. या अटींची पूर्तता केल्यास आपल्याला दोन घरांमध्ये गुंतवणूक करता येईल. ही सवलत करदात्याने एकदा घेतल्यास पुन्हा त्याच्या जीवनकाळात परत घेता येत नाही. या कलमानुसार खरेदी केलेले किंवा बांधलेले नवीन घर तीन वर्षांत न विकण्याची अट आहे. काही कारणाने हे नवीन घर खरेदी केल्यापासून किंवा बांधल्यापासून तीन वर्षांच्या आत विकल्यास पूर्वी (मूळ संपत्ती विकताना) घेतलेली वजावट रद्द होते.

प्रश्न : माझी मुलगी परदेशात शिक्षणासाठी जाणार आहे. मला या वर्षात एकूण १० लाख रुपयांएवढी रक्कम पाठवावी लागणार आहे. यासाठी टी.सी.एस. चा दर किती आहे? कोणत्या खर्चाचा समावेश शैक्षणिक कारणांसाठी ग्राह्य धरला जातो?

– श्वेता जोशी

उत्तर : टी.सी.एस. च्या तरतुदीत १ ऑक्टोबर, २०२३ पासून बदल झाले. शैक्षणिक कारणासाठी भारताबाहेर पैसे पाठविल्यास एका आर्थिक वर्षात प्रथम ७ लाख रुपयांवर टी.सी.एस. होणार नाही आणि त्यानंतरच्या रकमेवर ५% दराने टी.सी.एस. गोळा केला जाईल. म्हणजे आपल्या बाबतीत ३ लाख रुपयांवर (१० लाख वजा ७ लाख रुपये) ५% म्हणजेच १५,००० रुपये टी.सी.एस. गोळा केला जाईल. आपण या शिक्षणासाठी आर्थिक संस्थेकडून शैक्षणिक कर्ज घेतले असेल तर या टी.सी.एस.चा दर ०.५०% असेल. शैक्षणिक कारणाच्या खर्चात खालील खर्चाचा समावेश होतो :

अ. परदेशात शिक्षण घेणाऱ्या व्यक्तीचा भारत आणि परदेशी गंतव्यस्थानादरम्यान प्रवास तिकिटांच्या खरेदीसाठी पाठवलेले पैसे,

आ. शैक्षणिक संस्थेला दिलेली ट्युशन आणि इतर फी,

इ. या कारणासाठी इतर दैनंदिन खर्च (आरोग्यसेवा, भोजन, निवास आणि स्थानिक वाहतूक)

हेही वाचा – Money Mantra : प्रश्न तुमचे, उत्तरं तज्ज्ञांची

प्रश्न : माझ्या पत्नीने एक जीवन विमा पॉलिसी घेतली आहे. या पॉलिसीचा हफ्ता मी जर माझ्या खात्यातून भरला, तर मला या हप्त्याची वजावट घेता येईल का?

– महेश शिंदे

उत्तर : कलम ८० सीनुसार पती/पत्नी आणि मुलांच्या विम्याच्या हप्त्याची वजावट करदात्याला घेता येते. त्यामुळे आपल्याला पत्नीच्या विम्याची वजावट घेता येईल. ही वजावट वार्षिक हप्ता विमा रकमेच्या १०% पेक्षा जास्त (विमा १ एप्रिल, २०१२ नंतर जारी केल्यास) किंवा वार्षिक हप्ता विमा रकमेच्या २०% पेक्षा जास्त (विमा ३१ मार्च, २०१२ पूर्वी जारी केल्यास) मिळत नाही.

pravindeshpande1966@gmail.com