रिझर्व्ह बँकेच्या गेल्या महिन्यात आलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की भारतीय लोकांनी गेल्या वर्षभरात क्रेडिट कार्ड्स वापरून केलेल्या खर्चात 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जुलै महिन्यात हा आकडा वाढून दीड लाख कोटीपर्यंत पोहोचला आहे. ई-कॉमर्स या माध्यमातून सर्वाधिक क्रेडिट कार्डचा वापर होतो. विविध ऑनलाइन पोर्टल, ॲप या माध्यमातून खरेदी करताना आकर्षक सवलती आणि योजना असल्यामुळे ग्राहक क्रेडिट कार्डचा वापर मोठ्या प्रमाणावर करताना दिसत आहेत. ई-कॉमर्स या माध्यमातून जुलै महिन्यात 95108 कोटी रुपये एवढ्या प्रचंड रकमेचे व्यवहार क्रेडिट कार्डच्या माध्यमातून झाले, तर पॉईंट ऑफ सेल टर्मिनल (म्हणजे तुम्ही एखाद्या दुकानामध्ये, हॉटेलमध्ये किंवा खरेदी करताना मशीनवर कार्ड स्वाईप केलं तर त्याला पॉईंट ऑफ सेल व्यवहार असे म्हणतात) या माध्यमातून 49,628 कोटी एवढ्या रकमेचे व्यवहार झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सगळ्याच बँका आणि नव्याने आलेल्या क्रेडिट कार्ड कंपन्या सतत मार्केटिंग करून नवनवीन कार्ड आपल्याला ऑफर करत असतात. आपल्याकडेही क्रेडिट कार्ड असले तरीही आणखी एक कार्ड असावे असे आपल्याला वाटेल. योग्य क्रेडिट कार्ड कसे निवडाल हे समजून घेऊया.

आणखी वाचा: बाजाररंग: आयपीओमध्ये नशीब अजमावताय…?

कमी लिमिट असलेल्या कार्ड पासून सुरुवात करा

जर तुम्ही पहिल्यांदाच कार्ड वापरायला सुरुवात करणार असाल तर आवर्जून कमी लिमिट असलेल्या कार्डपासून सुरुवात करा. मोठं लिमिट म्हणजे खर्च करण्याची संधी मोठी असते हे खरं आहे, त्याबरोबरच जर ते बिल वेळेवर भरता आलं नाही तर त्यावर तुम्हाला व्याज द्यायला लागतं हे लक्षात घ्या, या व्याजाचा दर 12-18 % इतकाही असू शकतो, हा दर कार्ड नुसार बदलतो.

तुमचा क्रेडिट स्कोर तपासून घ्या

क्रेडिट कार्डचा वापर सुरू करण्याआधी तुमचा सिबील स्कोर/क्रेडिट स्कोर तपासून घ्या, त्यानुसार तुम्हाला भविष्यात कार्ड वापरणे सोपे होईल. जर सुरुवातीलाच तुमचा स्कोर कमी असला तर आपल्या कार्डचे बिल due date च्या आधीच भरले जात आहे की नाही याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. जर तुमचा सिबील स्कोर असाच कमी झाला तर तुम्हाला भविष्यात कर्ज घेताना अडचणी येऊ शकतात.

आणखईी वा

तुमची गरज आणि कार्डची निवड

तुमच्या कामाचे स्वरूप कसे आहे याचा अभ्यास करून मगच कार्ड घ्या, म्हणजे तुम्ही नियमितपणे प्रवास करत असाल तर तुम्हाला रेल्वे बुकिंग मध्ये पॉईंट्स देणारे कार्ड निवडा. काही कार्ड्स हॉटेल बुकिंग मध्ये सूट देणारी असतात. काही कार्ड कोणत्यातरी दुसऱ्या कंपनीशी संलग्न असतात, म्हणजे हॉटेलमध्ये बिलावर सूट मिळते, सिनेमा तिकीट खरेदी केल्यावर त्यात सूट मिळते. तुमच्या लाईफस्टाईलचा अभ्यास करून कार्ड वापरणे योग्य आहे. जर तुम्ही कंपनीच्या कामासाठी किंवा स्वतःच्या बिझनेसच्या निमित्ताने देशात किंवा परदेशामध्ये प्रवास करत असाल तर विमानतळावर विश्रांती घेण्यासाठी लाउंज असतात. क्रेडिट कार्ड कंपन्यांचे टाय-अप असलेल्या लाउंजमध्ये तुम्हाला आराम करता येतो. माफक दरात जेवण सुद्धा मिळू शकते. तुम्ही विकत घेत असलेले क्रेडिट कार्ड अशी सोय करून देत असेल तर असे कार्ड तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरेल.

तुमच्याकडे किती कार्ड्स असावी?

एका व्यक्तीच्या पाकिटात किती कार्ड्स असावी याचा असा काही नियम वा आकडा नाही ! पण मिळतायत म्हणून कार्ड्स घेणे अनावश्यक खर्चाला आपण स्वतःच आमंत्रण देण्यासारखे आहे.

आपले कार्ड दुसऱ्याला वापरायला देऊ नका

अगदी घरातील कुटुंबातील सदस्य, आपली मुले यांना कार्ड वापरायला दिल्यास प्रमाणाबाहेर खर्च होण्याची शक्यता असते.

डिजिटल सिक्युरिटीचे भान बाळगा

कार्डचा क्रमांक, CVV, पिन आणि अन्य माहिती कोणालाही देऊ नका, ऑनलाइन शॉपिंग करताना शक्यतो आपल्या लॅपटॉप कॉम्प्युटरवरूनच करा, माहिती नसलेल्या डिव्हाईस वर खरेदी करणे टाळा.

हे सगळं समजून घेतलं की मग होऊदे खर्च !

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are you doing shopping by credit card then you must read this mmdc psp