कौस्तुभ जोशी

भारतातील सर्व राज्यातील, सर्व उत्पन्न गटातील कुटुंबांमध्ये सोन्यामध्ये गुंतवणूक करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. याचे प्रमुख कारण आपात्कालीन परिस्थितीत सोने विकून / तारण ठेवून कर्ज घेता येते, आपली गरज भागवता येते. सोन्याचा दुसरा महत्त्वाचा उपयोग म्हणजे दागिने बनवणे. सोने ‘अक्षय’ गुंतवणूक म्हणून ओळखले जाते. कितीही वर्ष जसेच्या तसे ठेवले तरी सोने तसेच टिकते, यामुळे सोन्याला सतत मागणी असते.

What exactly is wealth management
मार्ग सुबत्तेचा : संपत्ती व्यवस्थापन म्हणजे नक्की काय?
For two years Niftys boom bust movement explained in detail to investors
बाजाराचे तंत्र-विश्लेषण : ‘निफ्टी’साठी २५,३०० ते २५,६००चा अवघड…
Markets, Reserve Bank, GDP, Reserve Bank news,
बाजार रंग : बाजार सीमोल्लंघन करतील का?
motilal oswal financial services
माझा पोर्टफोलियो : वित्त क्षेत्रातील भक्कम दावेदार
cotton industry future loksatta article
कापसाचे भवितव्य अधांतरीच…
dilip piramal vip industries
बाजारातली माणसं : ‘व्हीआयपी’ फक्त एकच! – दिलीप पिरामल
Chitra Ramkrishna and Anand Subramanian
बंटी और बबली : आनंदी आनंद गडे – भाग ३
What is NPS Vatsalya Yojana and who can benefit from it
Money Mantra:एनपीएस वात्सल्य योजना काय आहे आणि त्याचा फायदा कुणाला मिळू शकतो?
PNC Infratech Limited, My Portfolio, loksatta news,
माझा पोर्टफोलियो – उज्ज्वल भवितव्य, अंगभूत मूल्य : पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड

बदलत्या काळानुसार सोन्यामध्ये गुंतवणूक करणे कसे बदलत चालले आहे याचा तरुण पिढीने विचार करायला हवा. लग्नाच्या वेळी बांगड्या, मंगळसूत्र, अंगठी असे पारंपारिक दागिने आणि त्याचबरोबर नव्या फॅशनचे अनेक दागिने वरपक्ष आणि वधूपक्षाकडील लोक विकत घेतात व त्यासाठी अक्षरशः लाखो रुपयांचे सोने विकत घेतले जाते. मात्र या सोने विकत घेण्याच्या पद्धतीत काळानुरूप बदल होण्याची गरज आहे. पूर्वीच्या काळी लहान प्रमाणात का होईना दर महिन्याला/ सणावाराच्या दिवशी / साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या दिवशी सोने विकत घेणे ही पद्धत सुरू झाली.

जसे पैसे गाठीशी येतील तसे सोन्यात गुंतवून ठेवावेत असा गुंतवणूकदारांचा कुटुंबांचा कल राहिला, मात्र यापुढील काळात प्रत्यक्ष सोने / वळे / नाणी विकत घेण्यापेक्षा गोल्ड फंड किंवा सॉव्हरीन गोल्ड बाँड यामध्ये गुंतवणूक केली गेली पाहिजे, यातूनच सोने खरेदीतील खरा आनंद आणि फायदा दोन्ही मिळणार आहे.

हेही वाचा : Money Mantra : भांडवली नफ्यावरील करसवलत काय असते? (भाग १)

सोने खरेदीचे पर्याय का बदलायचे ?

सोन्याची वाढती किंमत लक्षात घेता दर महिन्याला किंवा वर्षाकाठी ठराविक मुहूर्तावर सोने विकत घेऊन ते बँकेच्या लॉकरमध्ये साठवून ठेवणे ही किचकट आणि खर्चिक प्रक्रिया आहे. सोने खरेदी करताना आजकाल सर्रासपणे बिलातच व्यवहार केले जातात त्यामुळे त्यावर जो टॅक्स द्यावा लागतो तो लागणारच आहे ही मनाची तयारी करून घ्यावी, मग अशा छोट्या ग्रॅममधील सोने बाळगत बसण्यापेक्षा सोन्यात डिजिटल मार्गाने गुंतवणूक केली माध्यमातून तर त्याचा फायदा तेवढाच मिळतो आणि कष्ट सुद्धा वाचतात.

तुमच्या मुलीच्या लग्नासाठी सोने विकत घ्यायचे आहे तर कसा प्लॅन बनवाल ?

तुमची मुलगी आठ वर्षाची आहे आणि वयाच्या पंचविसाव्या वर्षापर्यंत तुम्हाला सोन्याची तरतूद करायची आहे तर तुम्हाला अंदाजे २०० महिने दर महिन्याला एक ग्रॅम असे सोने विकत घ्यावे लागेल, म्हणजेच २०० ग्रॅम सोने लग्नापर्यंत जमा होईल. दर महिन्याला एक ग्रॅम सोने विकत घेतले तर सोळा वर्षांच्या कालावधीत सोने जमा होते. हा प्लॅन नक्कीच उत्तम आहे पण यात दोन गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे तो प्लॅन शंभर टक्के यशस्वी होऊ शकणार नाही.

पहिला मुद्दा, दर महिन्याला सोन्याचे दर कमी जास्त होत असतात. अशावेळी एक ग्रॅम सोने विकत घेणे त्या महिन्याच्या खर्चाच्या बजेटमध्ये बसले नाही तर ते सोने घेणे टाळले जाते.

हेही वाचा : Money Mantra : बूटस्ट्रॅपिंग म्हणजे काय?

दुसरा मुद्दा, दर महिन्याला ठराविक दिवसाला ठराविक तारखेलाच एक ग्रॅम सोने घेणे आपल्या कामाच्या /नोकरी/ व्यवसायाच्या व्यापामध्ये जमणारही नाही, मग अशावेळी ऑनलाईन गोल्ड फंड हा एक उत्तम उपाय असतो. दर महिन्याला एक ग्रॅम सोने घेण्यापेक्षा दर महिन्याला एका फिक्स रकमेचे सोने विकत घेणे हा पर्याय योग्य आहे. कारण आपल्या पगाराप्रमाणे आपले सोने विकत घेण्याचे बजेट बदलते. जर तुमचा पगार वाढला तर पुढच्या वर्षी जास्त रुपयाचे गोल्ड फंड विकत घ्या.

गोल्ड फंडात एसआयपी करता येते का?

ज्याप्रमाणे इक्विटी म्युच्युअल फंडात दर महिन्याला एका ठरलेल्या तारखेला एका ठरलेल्या रकमेचे युनिट्स घेता येतात तसेच दर महिन्याला गोल्ड फंडाचे युनिटसुद्धा घेता येतात. याचा फायदा असा की तुम्हाला दर महिन्याला सोने विकत घ्यायचे आहे हे लक्षात ठेवावं लागत नाही आणि त्यामध्ये सातत्य राहते.

हेही वाचा : Money Mantra: ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला पैसे मिळवून देणारी योजना

सॉव्हरीन गोल्ड बाँड

तुमची दीर्घकाळ गुंतवणूक करण्याची इच्छा असेल आणि क्षमता असेल तर तुम्ही या पर्यायाचा नक्कीच विचार करू शकता. दिनांक १८ डिसेंबर २०२३ पासून Sovereign Gold Bond – Series III गुंतवणुकीसाठी खुली होत आहे. या बाँडचा ‘ गुंतवणूक कालावधी ‘ हा ८ वर्षे इतका आहे. गुंतवणूक केल्यापासून, पाचव्या वर्षानंतर गुंतवणूक काढून घेऊ शकता. आठ वर्षांचा कालावधी संपला की त्या वेळच्या सोन्याच्या बाजारभावाप्रमाणे (मार्केट रेट ) तुम्हाला पैसे मिळतात. या बाँडमधील गुंतवणुकीवर दर सहा महिन्यांनी २.५०% इतका व्याजदर मिळतो.