वसंत माधव कुळकर्णी

मागील तिमाहीतील फंडांचा त्रैमासिक आढावा महत्त्वाचा आहे. कसा? तर मागील तिमाहीतील निफ्टीने केलेली कमाई ही गेल्या १० वर्षातील दुसऱ्या क्रमांकावर आहे. या सरलेल्या तिमाहीतील एकूण ५८ कामकाजाचे दिवस होते. या काळात निफ्टीने १,५७४ अंशाची कमाई केली.

Will Meghe Medical Group be taken over by Adani
मेघे वैद्यकीय समूह अदानी टेक ओव्हर करणार? नेमके काय घडले…
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
true friend in volatile market conditions Multi-asset funds
अस्थिर बाजार परिस्थितीतील खरा मित्र – मल्टी ॲसेट फंड
What is the market share in the budget 2025
अर्थसंकल्पात बाजाराचा ‘शेअर’ किती?
Budget is satisfactory but is the curse of self-reliance to producers
अर्थसंकल्प ‘समाधानकारक’ पण आत्मनिर्भरतेचा उत्पादकांना शाप?
Economist Politics Delhi Elections Prime Minister
‘रेवडी’चे राजकीय वजन संपले ?
Shares of these leading companies in the stock market fell by up to 30 percent in a month
शेअर बाजारात या आघाडीच्या कंपन्यांच्या शेअरमध्ये महिन्याभरात ३० टक्क्यांपर्यंत घसरण
Moody Analytics made a statement on fiscal and monetary policy print eco news
वित्तीय, पतधोरणात मोठ्या सुधारणेनंतरच ६.४ टक्के विकासवेग शक्य- मूडीज

‘लोकसत्ता कर्ते’ म्युच्युअल फंडांच्या यादीत इक्विटी, डेट आणि हायब्रीड म्युच्युअल फंडांच्या कामगिरीचा त्रैमासिक आढावा घेतला जातो. तीन वर्षे पूर्ण केलेल्या हजारो फंडांमधून गुंतवणूकयोग्य फंडांची शिफारस केली जाते. वेगवेगळ्या शैलींमध्ये पसरलेल्या फंडांच्या या संक्षिप्त यादीत निवड ही फंडांची कामगिरी, गुंतवणूक पोर्टफोलिओ आणि गुंतवणूक धोरणांवर आधारित केली जाते. ही निवड करण्यासाठी विविध संख्यात्मक आणि गुणात्मक निकष फंड शिफारशींपर्यंत पोहोचण्यासाठी वापरले जातात. इक्विटी आणि हायब्रिड फंडांसाठी जोखीम पातळी (रिस्क) आणि डेट फंडातील कालमर्यादा (ड्युरेशन) यावर आधारित गुंतवणूकयोग्य आणि गुंतवणूक टाळावी अशा दोन गटात उपलब्ध फंड विभागले जातात. ‘सेबी’च्या सर्व वर्गवारी वापरण्याऐवजी ही यादी कमी करण्याच्या उद्देशाने घटकांकडेही लक्ष देले जाते. या यादीचे दर तिमाहीत पुनरावलोकन करण्याचे उद्दिष्ट हे सुनिश्चित करणे आहे की भविष्यात उपलब्ध कोणत्याही चांगल्या संधी गमावू नये आणि सतत चार तिमाही गचाळ कामगिरी करणाऱ्या फंडाला शिफारसप्राप्त फंडांच्या यादीतून वगळले जाते.

हेही वाचा >>> भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी)- भविष्याचा भूतकाळ!

एका वर्षापूर्वी या यादीतून ॲक्सिस लार्जकॅप, ॲक्सिस मिडकॅप, ॲक्सिस फोकस्ड २५ या फंडांना रजा देण्यात आली. त्यानंतर या फंडांच्या कामगिरीत मोठी घसरण झाल्याचा अनुभव गुंतवणूकदारांनाही आला असेल. या फंडांत गुंतवणूक केली असल्यास नक्की काय करावे याचे विवेचन या पुनरावलोकनाच्या निमित्ताने केले जाते. वगळलेल्या फंडातून गुंतवणूक काढून घ्यावी किंवा फक्त ‘एसआयपी’ थांबवावी, याचे विवेचन केले जाते. थोडीशी घसरण असेल तर राखून ठेवण्याची शिफारस केली जाते, किंवा आवश्यक तेथे निधी व्यवस्थापनाकडून प्रसंगी त्यांची बाजू समजून घेतली जाते. फंड यादीचे पुनरावलोकन हा सततचा ध्यास असतो. उदाहरण द्यायचे झाले तर पीजीआयएमच्या कामगिरीत घसरण झाल्यावर नवीन गुंतवणूकप्रमुख विनय पहारिया यांच्याशी सविस्तर चर्चा केली या चर्चेचा गोषवारा लवकरच प्रसिद्ध होईल. डिसेंबर २०२२ मध्ये निर्देशांकांनी शिखर गाठल्यानंतर वर्षाच्या पहिल्या तिमाहीत बाजार कल-विरहित होता. एप्रिल महिन्यांत तेजीचा मागमूस नसताना शेअर बाजाराने मे महिन्याच्या मध्यापासून जोरदार पुनरागमन केले. मेच्या मध्यास सुरुवात लार्ज-कॅपपासून झाली असली तरी मे अखेरीपासून तेजीचा परीघ विस्तारत मिडकॅप आणि स्मॉल-कॅप समभागांनी जोरदार तेजीची सुरुवात केली. परदेशी गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या परिणामांमुळे हे घडले तरी जागतिक बाजार मंदीच्या चिंता दूर सारत असलेले दिसत आहे. रिझर्व्ह बँकेने व्याजदरातील वाढ थांबवली असे वाटत असताना प्रमुख उद्योग क्षेत्रांतील कंपन्यांच्या प्रति समभाग कमाईत वाढ झाल्याचे तीन तिमाहींनंतर दिसले. (संदर्भ : ‘जादू अशी घडे की’ हा १० जुलैचा लेख)

कंपन्यांच्या प्रति समभाग कमाईने ‘यू टर्न’ घेऊन देखील मागील दोन तिमाहीत वगळलेल्या फंडांच्या कामगिरीत सुधारणा दिसून आली नाही. या पुनरावलोकनात, कर-बचत म्युच्युअल फंड (ईएलएसएस) शिफारशींमध्येही झालेले बदल दखल घेण्याजोगे आहेत. ईएलएसएस फंड गटात, एचएसबीसी ईएलएसएस, एलआयसी एमएफ टॅक्स प्लान आणि महिंद्र मनुलाइफ ईएलएसएस या फंडांचा समावेश होता. महिंद्र मनुलाइफ ईएलएसएस यांच्या जोडीला पराग पारीख टॅक्स सेव्हर आणि निप्पॉन इंडिया टॅक्स सेव्हर यांना स्थान देण्यात आले आहे. या त्रैमासिक पुनरावलोकनात दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे, मिरॅ लार्जकॅपची कामगिरी. पुन्हा या तिमाहीत हा फंड खराब कामगिरी (मानदंड ‘निफ्टी १०० टीआरआय’ सापेक्ष) करेल अशी चिन्हे दिसत आहेत. तर फ्लेक्झीकॅप गटात कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप एक वर्षाची कामगिरी चिंताजनक असली तरी दीर्घकालीन तीन वर्षांची कामगिरी मात्र अव्वल आहे. या दोन फंडांच्या कामगिरीवर या तिमाहीत विशेष लक्ष ठेवण्यात येईल. या तिमाहीत निर्देशांकांत बदल झाले आहेत. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या विलीनीकरणामुळे फंड आपल्या गुंतवणुकीत मोठे बदल करीत आहेत.

हेही वाचा >>> क… कमॉडिटीचा : सरकीला ‘तेलबिया मिशन’चा भाग बनवण्याची गरज

अनेक फंडांनी या आधीच लार्ज-कॅप आयटी समभागांना त्यांच्या मानदंडातील प्रमाणापेक्षा जास्त स्थान दिले असल्याने अशा फंडांची कामगिरी अव्वल असण्याची आशा आहे. दीर्घकालीन कामगिरीच्या जोरावर हे दोन फंड अजूनही कामगिरी सुधारतील असे वाटत असल्याने आतापुरते या दोन फंडांना शिफारसप्राप्त यादीतून वगळण्यात येत नसले, तरी पुढील तिमाही आढाव्यात यांना वगळण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. सध्या ‘एसआयपी’ बंद करू नये असे सूचित करण्यात येत आहे. ऑक्टोबर- डिसेंबर २०२२च्या तिमाही आढाव्यात एक वर्षाच्या कामगिरीवर एसबीआय फोकस्ड इक्विटीच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त करताना या फंडाच्या समावेशाबाबत भविष्यात सूचित करण्यात येईल असे सांगितले होते. ती वेळ आली असल्याने एसबीआय फोकस्ड इक्विटीला या यादीतून काढून टाकण्यात येत आहे. एसबीआय फोकस्ड फंडाने काही गुंतवणूक परदेशातील कंपन्यांत केली आहे. ही रणनीती पूर्णपणे फसली असल्याने या फंडाच्या कामगिरीत मोठी घसरण झाली आहे. यामुळे असमान ‘निफ्टी ५०० टीआरआय’च्या तुलनेत फंडाची (पाच वर्षाच्या कालावधीत १ वर्षाच्या चलत सरासरीच्या तुलनेत) परतावा ८-९ टक्क्यांपर्यंत लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. दीर्घ मुदतीच्या परताव्यातही हा फंड सतत मागे पडत आहे. या चढ-उताराच्या कामगिरीमुळे जोपर्यंत परताव्यात स्थैर्य दिसत नाही तोपर्यंत या फंडाला वगळण्यात येत आहे. फोकस्ड फंड गटात, बंधन फोकस्ड इक्विटी, एचडीएफसी फोकस्ड ३०, एचएसबीसी फोकस्ड इक्विटी फंडाची जागा कालच तीन वर्षे पूर्ण झालेल्या एचएसबीसी फोकस्ड इक्विटी फंडाने घेतली आहे.

हेही वाचा >>> Money Mantra : ICICI ने नवीन फंड उघडला, फक्त १००० रुपयांपासून करता येणार गुंतवणूक

नोव्हेंबर महिन्यात एल ॲण्ड टी आणि एचएसबीसी या दोन फंड घराण्यांच्या विलीनीकरणानंतर निधी व्यवस्थापकांमध्ये बदल झाला होता. या बदलाचे परिणाम दिसू लागले आहेत. भविष्यात एचएसबीसी फोकस्ड इक्विटी फंडाचा विस्तृत आढावा घेण्यात येईल. ॲक्सिस फोकस्ड २५ फंडाची कामगिरी आश्वासक वाटत असली तरी या फंडाचा समावेश करण्याआधी थोडी प्रतीक्षा करावी असे वाटते. कर्त्यांच्या यादीतून वगळलेला दुसरा फंड म्हणजे मिरॅ ॲसेट इमर्जिंग ब्लूचिप. एका वर्षापूर्वी जुलै-सप्टेंबर २०२२ च्या आढाव्यात एकेकाळच्या या विजेत्या फंडाच्या कामगिरीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यावेळच्या झालेल्या मिड-कॅपमधील घसरणीमुळे या फंडाची कामगिरी खालावल्याचे नमूद केले होते. मात्र, सरलेल्या एप्रिल जून २०२३ तिमाहीत मिडकॅपनी चांगली कामगिरी करून देखील या फंडाच्या कामगिरीत फारशी सुधारणा झालेली दिसत नाही. सध्या या फंडाची दीर्घकालीन (पाच आणि तीन वर्षे) तसेच नजीकच्या काळातील (तीन वर्षे कालावधीतील एक वर्ष चलत सरासरी) कामगिरी (जून २०२२) पासून निफ्टी लार्ज अँण्ड मिडकॅप २५० च्या तुलनेत पाच-सहा टक्के खालावली आहे. तथापि, बाजार सध्या मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांसाठी अनुकूल आहे हे लक्षात घेता, फंडाची खालावत असलेली कामगिरी भविष्यातील धोक्यांची चाहूल आपल्याला सावध करते. या सर्व कारणांमुळे, सध्या या फंडात नवीन गुंतवणूक (एसआयपी किंवा एकरकमी) थांबविण्याची शिफारस करण्यात येत आहे.

shreeyachebaba@gmail.com

Story img Loader