समीर नेसरीकर

मध्यंतरी मर्सिडीज बेंझच्या उच्चपदस्थ व्यक्तीने असं विधान केले होते की, ‘एसआयपी’मुळे लक्झरी गाड्यांच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. त्यांचे हे म्हणणे अर्थातच विपणन डावपेचाचा भाग होता. तरी अशाश्वत स्थायीभाव असलेल्या भांडवल बाजारात, ‘एसआयपी’च्या माध्यमातून नोव्हेंबर महिन्यात विक्रमी १३,३०६ कोटी रुपयांची गुंतवणूक ही निश्चितच आश्वासक आहे. ही खरे तर सुरुवातच आहे. देशाच्या अनेक छोट्या शहरात, गावांमध्ये आज म्युच्युअल फंडाचा हळूहळू शिरकाव होतो आहे. पारंपरिक गुंतवणूक साधनांवर मिळणाऱ्या दोन आकडी व्याजदराचा जमाना कसा होता हे आता अर्थइतिहासाच्या पुस्तकात वाचायला मिळेल, अशी एकंदर स्थिती आहे. महागाई मात्र दोन आकडी संख्येत दिसू शकते तेव्हा त्यावर मात करायला भांडवल बाजारात गुंतवणूक करणे आवश्यक आहे.

Mumbai Kurla Bus Accident marathi news
विश्लेषण : बेस्टच्या दुर्दशेला जबाबदार कोण? कंत्राटी गाड्या आणि चालकांचा प्रयोग कसा फसला?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mahindra Thar Earth Edition With More Than 3 Lakh Rupees Discount, See Thar Other Variant Offers
महिंद्रा थारवर मिळतेय ३ लाखांपर्यंत सूट; थार प्रेमींनो आत्ताच उचला संधीची फायदा, जाणून घ्या ऑफर्स डिटेल्स
champions of the earth award madhav gadgil
माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव
jsw e cars marathi news
‘जेएसडब्ल्यू‘कडून सात लाख ई-मोटार निर्मितीचे उद्दिष्ट, प्रस्तावित प्रकल्पाला पर्यावरण विभागाकडून मंजुरी
MG Select shares first look of mg cyberster with electric cissor doors
महागड्या स्पोर्ट्स कारला देणार टक्कर! ‘या’ कंपनीने नव्याकोऱ्या कारचा पहिला लूक केला शेअर, इलेक्ट्रिक डोअर्ससह मिळतील खास फिचर्स
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
mishtann food limited
मिष्टान्न! (पूर्वार्ध)

करोना काळात लाखोंच्या संख्येने उघडलेल्या डिमॅट खात्यांमधून आजचा तरुण बाजारात ‘ट्रेडिंग’ करतो. त्यातून संभवणाऱ्या नफ्या-तोट्याचा विचार बाजूला ठेवला तरी एक पिढी भांडवल बाजाराशी जोडली जात आहे. गुंतवणूक पंडितांचा ‘ट्रेडिंग’वर आक्षेप असतो, कारण ते बहुतांश वेळेला ‘इंज्युरीअस टू वेल्थ’ धाटणीचे असते. सेहवागची पायांची हालचाल जास्त नव्हती पण त्याने ‘हॅन्ड आय कोऑर्डिनेशन’च्या जोरावर अमाप धावा काढल्या. तसे अपवाद इथेही आहेत. याचबरोबरीने चांगल्या समभागांमध्ये आपण दीर्घ कालावधीसाठी अभ्यासपूर्ण गुंतवणूक केली पाहिजे. परंतु सर्वसामान्य माणसांना नोकरी धंद्यातून वेळ मिळत नसल्यामुळे समभागसंलग्न अर्थात इक्विटी म्युच्युअल फंड हा दीर्घकालीन जीवन उद्दिष्टपूर्तींसाठी एक सक्षम पर्याय आज आपल्यासमोर आहे.

समुपदेशन करताना वेगवेगळे अनुभव नित्याचेच आहेत. भांडवल बाजार म्हटले की, काही माणसे त्यातील ‘जोखीम’ या मुद्द्यावर अडून बसतात. आपला कष्टाचा पैसा नेहमीच सुरक्षित राहिला पाहिजे, अशी त्यांची आस, मागणी असते. शेअर पडला तर म्युच्युअल फंडाच्या मालमत्ता मूल्यावर (एनएव्ही) परिणाम होतो. माझे त्यांना हे सांगणे असते की, टाटा समूह, रिलायन्स, मारुती या सारख्या कंपन्यांची त्यांच्या भविष्यकालीन योजनांसाठी ‘काही हजार कोटी’ रुपयांची भांडवली गुंतवणूक होत असताना, शेअरचा भाव वाढण्यात आपल्यापेक्षा त्या कंपनीच्या व्यवस्थापनाला जास्त रस आहे. अशा कंपन्यांना भारताच्या उज्ज्वल भविष्याचे चित्र दिसते आहे. हेही पक्के लक्षात ठेवायचे की, कमी कालावधीत भांडवल बाजाराची दिशा सांगणे कठीण आहे. परंतु दीर्घ काळात भारतीय भांडवल बाजाराची स्थापित चांगली कामगिरी सर्वज्ञात आहेच. तेव्हा ज्यांची अजूनपर्यंत म्युच्युअल फंडात गुंतवणूक नाही, त्यांनी जाणीवपूर्वक निर्णय घ्या, आपल्याला एक छोटीसी सुुरुवात करायला काहीच हरकत नाही. सुरुवातीला लिक्विड फंडात गुंतवणूक करा, म्युच्युअल फंड कसे काम करतात हे समजून घ्या. त्यानंतर आपल्याला आयुष्यातील वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी (यात मर्सिडीजही आलीच!) समभागसंलग्न गुंतवणुकीकडे वळता येईल. समभागसंलग्न गुंतवणुकीतील लार्ज कॅप, लार्ज अँड मिड, मिड, स्मॉल, फ्लेक्झी, मल्टी, इंटरनॅशनल श्रेणी स्वतःहून किंवा या क्षेत्रातील तज्ज्ञाकडून समजून घ्या.

लहानपणी आपण सर्वानीच ‘संयमाचे फळ’ नावाची गोष्ट वेगवेगळ्या स्वरूपात ऐकली असेलच. सोबत एक तक्ता जोडत आहे, त्याचे नाव आहे ‘म्युच्युअल फंडातील संयमाचे फळ.’ गेल्या दहा वर्षातील काही समभागसलंग्न योजनांचा वार्षिक वृद्धिदर यात दिला आहे.

फंडाचे नाव गत १० वर्षांचा वार्षिक वृद्धिदर
(३० नोव्हेंबर २०२२ रोजी, टक्के)
एसबीआय स्मॉलकॅप २४.९१
निप्पोन इंडिया स्मॉलकॅप २४.१९
मिरे असेट इमर्जिंग ब्लूचिप २२.२५
आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल टेक्नॉलॉजी २१.८९
कॅनरा रोबेको इमर्जिंग इक्विटीज २०.१०
कोटक इमर्जिंग इक्विटी १९.२८
एचडीएफसी मिड कॅप अपॉर्च्युनिटीज १९.०६
एसबीआय मॅग्नम मिडकॅप १८.९८
फ्रँकलिन बिल्ड इंडिया १८.८०
युटीआय मिडकॅप १८.५६

वरील कोष्टकासंबंधाने जास्त काही लिहायची आवश्यकता नाही. वॉरेन बफे यांनी एकदा म्हटलेले आहे की, ‘अवर फेव्हरेट होल्डिंग पिरियड इज फॉरएव्हर.’ त्यांच्या या उक्तीप्रमाणे आपण सर्व जण समजदार आहातच. उमजून निर्णय घ्या. लेख लिहून पूर्ण केल्यावर एका जुन्या मित्राचा फोन आला. तो राहतो मुंबईतच, तरी त्याच्याशी खूप वर्षांनी बोलणे झाले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने एक बाउन्सर टाकला. ‘तुझी काही आर्टिकल्स वाचली मध्यंतरी, तू म्युच्युअल फंडात खेळतोस ना?’

काय बोलावे यावर!
अर्थसाक्षरतेचे व्रत सोपे नाही. माइल्स टू गो…

(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक आहेत.)

sameernesarikar@gmail.com

Story img Loader