ही कथा आहे एका अशा व्यापाऱ्याची, ज्याने ज्या पद्धतीने बँकांना फसविले आहे ते कल्पनेच्या पलीकडील आहे. ज्याच्याकडे कदाचित सगळे काही होते पण संयम नव्हता, त्यामुळे तुमचे-आमचे सुमारे ३,६९५ कोटी रुपये बुडाले. ही कथा आहे विक्रम कोठारी यांची. ज्यांच्या वडिलांनी म्हणजे मनसुख कोठारींनी पान परागची स्थापना केली. त्यांच्या हयातीतच मुलांनी आपले उद्योग वाटून घेतले. दीपक कोठारी यांच्या वाट्याला पान पराग आले तर विक्रम कोठारींना मिळाली रोटोमॅक नावाची स्टेशनरी बनवणारी कंपनी आणि काही आयात-निर्यात करणाऱ्या कंपन्या. तसे बघायला गेले तर १९९२ मध्येच रोटोमॅकची स्थापना झाली होती आणि त्यावर विक्रम कोठारींनी बरीच मेहेनत घेतली होती. कंपनीचे नाव देशात नाही तर परदेशातसुद्धा झाले होते. चांगल्या जाहिराती आणि विपणन व्यवस्थेमुळे कंपनी लवकरच नावारूपाला आली होती. रेनॉल्ड्ससारख्या आंतरराष्ट्रीय नाममुद्रेला रोटोमॅक चांगलीच टक्कर देत होता. सलमान खान आणि रविना टंडनसारखे गाजलेले कलाकार त्याच्या जाहिरातीत दिसत होते. वाचकांपैकी कित्येकांनी आपल्या महत्त्वाच्या परीक्षा याच कंपनीच्या पेनांनी लिहिल्या असतील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा