वर्ष २०२० नंतर भांडवल बाजाराकडे खूप मोठ्या प्रमाणात तरुण वर्गाचा ओढा वाढला आहे. नातवाकडून भांडवली बाजारातील आकर्षक नफ्याचे रोमहर्षक प्रसंग ऐकून, काही आजी-आजोबांनीदेखील हा खेळ मनावर घेतला आहे. तरुण भांडवली बाजारातील तेजीच्या प्रेमात आहेतच. मंदी ही फक्त इतिहासात दिसते असे त्यांचे ठाम मत बनले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स एक लाख अंशांची पातळी गाठणार आहे, हा आत्मविश्वास बस, रेल्वे, विमान प्रवासी आणि नाक्यावरचा पानवाला अशा सगळ्यांच्या तोंडी आहे. शेअर बाजारात जोखीम आहेच. मात्र संयमाने डाव खेळल्यास मोठी संपत्तीनिर्मिती शक्य, हा जाणकारांचा अनुभव आहे. अशा वेळी, या क्षेत्रात जे पहिल्यांदाच पदार्पण करत आहेत, त्यांनी कुठे आणि कशी सुरुवात करावी? या प्रश्नाचे उत्तर आहे ‘हायब्रिड’ फंड. या फंड गटात एकापेक्षा जास्त मालमत्ता वर्गाचा समावेश होतो. त्यात काही उपप्रकारही आहेत. आजच्या आणि पुढच्या लेखामधून याबद्दल जाणून घेऊया.

कॉन्झर्व्हेटिव्ह हायब्रिड फंड :

भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या फंड मांडणीनुसार, यात एकूण मालमत्तेच्या १० ते २५ टक्के गुंतवणूक समभाग आणि समभागसंलग्न गुंतवणूक साधने आणि रोख्यांमध्ये ७५ ते ९० टक्के गुंतवणूक असते. ज्या गुंतवणूकदारांना भांडवली बाजारातील अस्थिरतेपासून दूर राहायचे आहे, मात्र पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा (बँक ठेवी-एफडी/ पोस्ट ऑफिस) थोडासा जास्त परतावा अपेक्षित आहे, ते कॉन्झर्व्हेटिव्ह हायब्रिड फंडात गुंतवणूक करू शकतात. वरती नमूद केल्याप्रमाणे गुंतवणुकीचा बहुतांश भाग रोखे मालमत्ता वर्गात गुंतवणुकीसाठी वापरला जातो. काही भागाची समभाग आणि समभागसंलग्न मालमत्ता वर्गात गुंतवणूक होते. जर आपण आयुष्यात आतापर्यंत फक्त पारंपरिक गुंतवणूक साधनांमध्ये पैसे गुंतवले असतील तर आपण आपल्या जाणकार गुंतवणूक सल्ल्लागाराच्या मार्गदर्शनानुसार कॉन्झर्व्हेटिव्ह हायब्रिड फंडात लहान गुंतवणुकीने सुरुवात करू शकता.

inflation rate declined
किरकोळ महागाई दराची उसंत, नोव्हेंबरमध्ये ५.४८ टक्क्यांवर घसरण
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
supreme court marital dispute case
Factors to decide Alimony Amount: घटस्फोटानंतर पोटगीची रक्कम किती असावी? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले ८ महत्त्वाचे घटक
Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
ipo allotment loksatta news
‘आयपीओ’ मिळण्याची शक्यता कशी वाढवावी? कटऑफ किंमत, एकापेक्षा अधिक डिमॅट खाती, कोटा याबाबत निर्णय कसा करावा?
equity funds investment declined
इक्विटी फंडांतील ओघ ओसरला! नोव्हेंबरमध्ये १४ टक्क्यांनी घटून ३५,९४३ कोटींवर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?

हेही वाचा…Money Mantra: इन्शुरन्स पॉलिसी- फ्री लूक परियड म्हणजे काय? तो कसा वापरावा?

लक्षात घ्या, पारंपरिक गुंतवणूक साधनांमधील परतावा महागाईला थोपवू शकत नाही. संपत्तीच्या वृद्धीसाठी आपल्या पूर्वापार चालत आलेल्या मानसिकतेतून बाहेर पडून आपल्या पुंजीची पुनर्रचना करावी लागेल. भारतातील सुदृढ व्यक्तीचे आयुर्मान जर ७५ ते ८० वर्षे धरले तर, तर ज्येष्ठ नागरिकांना एक मोठी खेळी अजून खेळावी लागणार आहे. त्या अनुषंगाने तुमच्या पारंपरिक गुंतवणूक साधनांच्या पोर्टफोलिओचे पुनरावलोकन करणे आवश्यक आहे.

ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंड:

‘सेबी’च्या फंड मांडणीनुसार, यात एकूण मालमत्तेच्या ६५ ते ८० टक्के गुंतवणूक समभाग आणि समभागसंलग्न साधने आणि रोख्यांमध्ये २० ते ३५ टक्के गुंतवणूक असते. १०० टक्के समभाग या मांडणीवर आधारित इक्विटी डायव्हर्सिफाइड म्युच्युअल फंडांपेक्षा या फंड गटात समभाग आणि समभागसंलग्न गुंतवणुकीचे प्रमाण वरती लिहिलेल्या मर्यादेत राहते. त्यामुळेच या फंडातील जोखीम संपूर्णतः समभाग गुंतवणूक अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडांपेक्षा कमी राहते. रोख्यांमधील गुंतवणूक एक स्थिर उत्पन्न देत राहते. कर प्रणालीचा विचार करता हे फंड इक्विटीप्रमाणेच कर निर्धारित होतात, म्हणजेच एक वर्षावरील भांडवली नफा हा दीर्घकालीन समजला जातो. हे गुंतवणूकदारांसाठी फायद्याचे ठरते.

हेही वाचा…Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?

गुंतवणूक करताना मालमत्ता विखरून ठेवली पाहिजे असे कायम सुचवले जाते. समभाग (इक्विटी), रोखे (डेट) या दोन मालमत्ता विभागात ॲग्रेसिव्ह हायब्रिड फंडांची गुंतवणूक असते. समभाग आणि समभागसंलग्न गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करताना, बाजाराची दिशा पाहून फंड व्यवस्थापक किमान ६५ ते कमाल ८० टक्के याचा निर्णय घेतो. जेव्हा बाजार स्वस्त असतो, तेव्हा इक्विटी गुंतवणूक कमाल मर्यादेपर्यंत वाढते. दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये जेव्हा तुम्हाला बाजारातील तीव्र चढ-उतारांना सामोरे जायचे आहे, त्या दृष्टीने रोख्यांचा समावेश असलेली योजना तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असावी. या योजनांमध्ये समभाग आणि समभागसंलग्न गुंतवणुकीचे प्रमाण सरासरी ७० ते ७५ टक्के असल्याचे दिसते. पोर्टफोलिओ बांधताना तुम्हाला प्रत्येक फंड गटाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

हेही वाचा…क्षेत्र अभ्यास : ‘एफएमसीजी’ : फक्त किराणा नव्हे बरेच काही…

जेव्हा फंड व्यवस्थापकाला कोणतेही बंधन नसते तेव्हा तो लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये पैसे कोणत्या प्रमाणात गुंतवितो हे पाहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रोखे गुंतवणुकीमधील सरकारी रोखे (गव्हर्नमेंट सिक्युरिटीज) आणि इतर रोखे साधनांमधील गुंतवणूक किती प्रमाणात केली आहे, हे आपण महिन्याच्या अखेरीस प्रसिद्ध होणाऱ्या फॅक्टशीटमध्ये तपासू शकता. यापुढील लेखात आपण हायब्रिडचे आणखी काही वेगळे पैलू बघूया.

लेखक मुंबईस्थित वित्तीय समुपदेशक आहेत.
sameernesarikar@gmail.com

Story img Loader