समीर नेसरीकर

आपण गेले वर्षभर ‘लक्ष्मीची पाऊले’ या सदरातून आर्थिक स्वातंत्र्याचा पाठपुरावा करतोय. वाचकांसाठी म्युच्युअल फंडातील वेगवेगळ्या श्रेणींची मांडणी मी वर्षभर केली. या वर्षातील हा शेवटचा लेख ‘लार्ज कॅप’ फंडासंदर्भात आहे.

RIT INVITs allowed to invest in unlisted companies
रिट्स, इन्व्हिट्सना असूचिबद्ध कंपन्यांत गुंतवणुकीस मुभा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Minister Expenditure , Officer nagpur winter session ,
अधिवेशन काळातील ‘त्या’ उधळपट्टीला आवर, खातेवाटप न झाल्याने अधिकारीही सुखावले
contempt of court notice marathi news
नागपूर : मंत्र्याच्या सूचनेचे पालन करणे जिल्हाधिकाऱ्यांना भोवले, न्यायालयाचा आदेश धुडकावल्यामुळे…
Wahei Takeda, confectionery company,
बाजारातील माणसं – पैशाची गुलामी झुगारणारा गुंतवणूकपंथ : वाहेई टाकाडा
mishtann foods, mishtann foods Sebi,
मिष्टान्न! (उत्तरार्ध)
maharashtra state cooperative bank claim government to pay rs 2200 crore of sugar mills
कर्ज कारखान्यांचे, बोजा सरकारवर; साखर कारखानदारांचे २२०० कोटी फेडण्यासाठी राज्य बँकेचा सरकारवर दावा
vivek oberoi started his own startup
बॉलीवूडने बहिष्कार टाकूनही विवेक ओबेरॉय कसा झाला ३४०० कोटींचा मालक? भर कार्यक्रमात सांगितला बिझनेस प्लॅन

देशातील प्रमुख निर्देशांक निफ्टी ५० आणि सेन्सेक्स हे अर्थव्यवस्थेच्या आरशासमान असतात. कंपन्यांची चांगली कामगिरी अर्थात वाढलेला नफा, कमी झालेले कर्ज, नवीन प्रकल्प, वस्तूंमधील कंपन्यांची मक्तेदारी याचा बाजार अंदाज घेत असतो. शिवाय भविष्यात होणाऱ्या नफ्याचा किंवा तोट्याचा अंदाज बाजाराला लवकर येतो आणि त्याचे प्रतिबिंब समभागाच्या किमतीवर पडते.

बाजार भांडवलानुसार आघाडीच्या शंभर कंपन्यांना ‘लार्ज कॅप’ कंपन्या म्हणून संबोधले जाते. यात रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्र बँक,एशियन पेन्ट्स, लार्सन अँड टुब्रो, टायटन आणि ब्रिटानिया यांसारख्या दिग्गज कंपन्यांचा समावेश होतो. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या २०१७ च्या पत्रकानुसार, म्युच्युअल फंडातील लार्ज कॅप फंडांना कमीत कमी ८० टक्के गुंतवणूक ही लार्ज कॅप कंपन्यांच्या समभाग आणि समभागसंलग्न गुंतवणूक साधनांमध्ये करणे बंधनकारक आहे. बाजारात सूचिबद्ध असणाऱ्या कंपन्यांची यादी त्यांच्या वर्गीकरणानुसार (लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप) ‘ॲम्फी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संस्थात्मक गुंतवणूकदार लार्ज कॅप कंपन्यांचा सखोल अभ्यास करत असतात. लार्ज कॅप कंपन्या मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांच्या मानाने कमी अस्थिर असतात. अशा कंपन्यांनी बाजारातील मंदीची अनेक वादळे पाहिलेली असतात. ज्या नवीन गुंतवणूकदारांना समभागसंलग्न म्हणजेच इक्विटी म्युच्युअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे त्यांनी लार्ज कॅप फंडाचा आधार घ्यावा. भारताची अर्थव्यवस्था जसजशी विस्तारेल, त्याला अनुसरून या कंपन्यांची प्रगती होत राहील. काही लार्ज कॅप फंडांचे गेल्या दहा वर्षांतील वार्षिक वृद्धीदराचे प्रगतीपुस्तक बाजूच्या तक्त्यात देत आहे.

फंडाचे नाव गत १० वर्षांचा वार्षिक वृद्धीदर (३० नोव्हेंबर २०२२ रोजी, टक्के)

मिरे असेट लार्ज कॅप १६.३१

एसबीआय ब्लूचिप १४.८९

निप्पोन इंडिया लार्ज कॅप १४.८४

आयसीआयसीआय प्रु ब्लूचिप १४.६१

ॲक्सिस ब्लूचिप १४.२४

फंडाच्या पोर्टफोलिओमधील गुंतवणुकीचे सर्व निर्णय फंड व्यवस्थापक घेत असतो. त्यामुळे त्याच्या कामगिरीचा आढावा घेणे आवश्यक असते. विशेषतः बाजाराच्या पडझडीच्या काळात, निर्देशांकाच्या तुलनेत कमी पडणारा फंड आणि बाजार वरच्या दिशेने जाताना निर्देशांकापेक्षा चांगली कामगिरी सातत्यपूर्ण करणारा फंड व्यवस्थापक निवडणे हे महत्त्वाचे आहे.

केवळ परताव्याच्या गप्पा न करता इथे निफ्टी ५० या निर्देशांकाची साधारण दोन दशकांतील जास्तीत जास्त खालची पातळी (मॅक्झिमम ड्रॉडाउन) काय होती त्याचा उल्लेख करतो आहे. वर्ष २०००-२००१ मधील डॉट कॉम पडझडीत बाजार ५० टक्क्यांपेक्षा अधिक खाली आला, त्यानंतर २००८ मधील जागतिक आर्थिक संकटात बाजार जवळजवळ ६० टक्के तर सन २०२० मध्ये करोनाच्या कालावधीत बाजार ३८ टक्क्यांपेक्षा अधिक घसरला होता. अशा बाजाराच्या प्रतिकूल कालखंडातून प्रत्येक वेळी बाजार सावरला आणि दीर्घकाळात गुंतवणूकदारांचे नशीब बदलून टाकले. जे पूर्वीपासून नियमितपणे बाजारातील तत्कालीन पडझडींकडे दुर्लक्ष करून दीर्घकालीन गुंतवणूक करत गेले, त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान आज लपून राहिलेले नाही. चीनमध्ये पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. समजा अशा काही बाह्य प्रतिकूल कारणांमुळे भांडवली बाजार खाली गेला तर त्याकडे गुंतवणुकीची संधी म्हणून पाहावे आणि प्रत्येक घसरणीमध्ये गुंतवणुकीचा शिस्तबद्ध पर्याय असलेला ‘एसआयपी’सोबतच, टप्प्याटप्प्याने एकगठ्ठा पैसे तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवावे.

नियमितपणे गुंतवणूक करायची आहे, पण पैसे खर्च होतात, अशी कारणे बहुतांश गुंतवणूकदारांकडून दिली जातात. आपल्या मोठ्या संपत्ती निर्मितीमागचे मूलभूत रहस्य हे आयुष्यभर आपला बचत दर (सेव्हिंग रेट) किती आहे यावर ठरते. याकडे विशेष लक्ष दिल्यास आणि ‘इक्विटी ॲसेट क्लास’मध्ये नियमितपणे गुंतवणूक करत गेल्यास आपलेही भविष्य उज्ज्वल असेल, ही खात्री बाळगा.

‘लक्ष्मीची पाऊले’ या सदरातून मला माझे विचार मांडण्याची संधी ‘लोकसत्ता’ ने दिली, त्याबद्ल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. नवीन वर्ष २०२३ मध्ये अशाच काही वेगळ्या अर्थबाबींवर आपल्या गप्पा सुरू ठेवूया. मुंबई-ठाणे, पुण्यासोबतच सांगली, कोल्हापूर, नाशिक, रत्नागिरी ते अगदी तळकोकणातून आणि परदेशातूनही वाचकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे या वर्षाचा प्रवास संस्मरणीय ठरला. नवीन वर्षासाठी सर्वांना शुभेच्छा.

Story img Loader