Fibe Axis Bank Numberless Credit Card : Axis Bank आणि Fibe यांनी भारतातील पहिले नंबरलेस क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी एकत्र भागीदारी केली आहे. हे कार्ड तंत्रज्ञान जाणणाऱ्या पिढीसाठी खूप प्रभावी ठरणार आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिरिक्त सुरक्षा स्तरासह येणारे हे पहिले क्रेडिट कार्ड आहे. याला Fibe Axis Bank क्रेडिट कार्ड असे म्हटले जात असून, ज्याला कोणताही क्रमांक नाही आणि देशातील अशा प्रकारचे हे पहिले कार्ड आहे.
या कार्डमध्ये अतिरिक्त सुरक्षिततेसाठी कोणती सुविधा?
नंबरलेस क्रेडिट कार्ड म्हणून ग्राहकांना या कार्डमध्ये कोणताही कार्ड नंबर मिळणार नाही, त्याची कोणतीही एक्सपायरी तारीख नसेल किंवा कार्ड प्लास्टिकवर कोणताही CVV नंबर नसेल. हे कार्ड आणि कार्ड मालकाची ओळख उघड करत नाही, ज्यामुळे त्याच्या बेकायदेशीर वापराची शक्यता कमी होते. ग्राहकाच्या ओळखीचे चोरीपासून संरक्षण करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. कार्डवर कोणताही नंबर नसल्यामुळे ग्राहकाला संपूर्ण सुरक्षा आणि गोपनीयतेचे फायदे मिळतात.
हेही वाचाः आनंद महिंद्रा यांना मागे टाकत सोशल मीडियावर रतन टाटा बनले नंबर वन, X वर इतके फॉलोअर्स मिळाले
Fibe Axis Bank क्रेडिट कार्ड कसे अॅक्सेस करावे?
Fibe अॅपवर ग्राहक त्यांच्या Fibe Axis Bank क्रेडिट कार्डचे तपशील सहजपणे ऍक्सेस करू शकतात आणि थोडी माहिती देऊन त्यावर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात. को ब्रँडेड क्रेडिट कार्ड विविध वैशिष्ट्ये ऑफर करतात, ज्यापैकी काही तुम्हाला येथे कळू शकतात.
हेही वाचाः शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ
Fibe Axis Bank क्रेडिट कार्डची वैशिष्ट्ये आणि फायदे
- सर्व प्रकारच्या रेस्टॉरंटमधून ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऑर्डरवर फ्लॅट ३ टक्के कॅशबॅक उपलब्ध आहे.
- तुम्हाला राइड हॅलिंग अॅप्सवर स्थानिक प्रवासावर ३ टक्के कॅशबॅक मिळेल.
- ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्मवर ३ टक्के कॅशबॅकदेखील उपलब्ध आहे.
- याशिवाय ग्राहकांना सर्व ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवहारांवर १ टक्के कॅशबॅक मिळतो.
- रुपेद्वारे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करण्याची सुविधा
- हे कार्ड RuPay द्वारे संचालित असून, जे ग्राहकाला हे क्रेडिट कार्ड UPI शी लिंक करू देते.
- सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मवरून व्यवहारच केले जातात असे नाही, तर हे कार्ड सर्व ऑफलाइन स्टोअर्सवरही स्वीकारले जाते.
- ग्राहकांच्या सोयीसाठी ते टॅप आणि पे वैशिष्ट्य देखील देते.
कार्ड फीबद्दल जाणून घ्या
हे कार्ड शून्य जॉयनिंग फी आणि शून्य वार्षिक शुल्कासह येते आणि ही सुविधा आयुष्यभर उपलब्ध आहे. या कार्डच्या इतर वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाल्यास ते दरवर्षी चार देशांतर्गत विमानतळ लाऊंजमध्ये प्रवेश प्रदान करतात. ४०० ते ५००० रुपयांच्या दरम्यान इंधन अधिभार माफीचा लाभ देते. याशिवाय Axis सर्व कार्डांवर डायनिंग डिलाइट्स, वेन्सडे डिलाइट्स, एंड ऑफ सीझन सेल आणि RuPay पोर्टफोलिओ संबंधित ऑफर करते.